संग्रहण

थुंकल्यावरच अन्न हलाल प्रमाणित होते असा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला नाही? वाचा सत्य

सोशल मीडियावर एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला जात आहे की, अन्नामध्ये थुंकल्यावरच ते हलाल प्रमाणित होते असा युक्तिवाद तमिळनाडुतील न्यायालयाने मान्य केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटसोबत केलेला दावा खोटा आहे. तामिळनाडुतील न्यायालयाने अशा कोणत्याही युक्तीवादाला मान्यता दिलेली नाही.  काय […]

Continue Reading

व्हायरल फोटो उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मजूराचा आहे का ? वाचा सत्य

गेले काही दिवसापासून उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 41 मजूर अडकले आहे. अद्याप त्या मजूरांना बाहेर का काढण्यात आले नाही ? असा सवाल विचारताना युजर्स एका वृद्ध मजूराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूराचा […]

Continue Reading

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडला का? वाचा सत्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पर्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिर्वाद घेताना दिसतो. दावा केला जात आहे की, जेव्हा रोहित शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडत होता, तेव्हा त्यांनी रोहित […]

Continue Reading

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या सभेत लोक मोदी – मोदीचे नारे देत होते का ? वाचा सत्य

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सभेत राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भाषणादरम्यान लोक मोदी-मोदीचे नारे देतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की,व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये सभेत कोणीही नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा देत नव्हते. काय आहे दावा […]

Continue Reading

राहूल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी 2020 मध्ये राम मंदिराच्या पायाभरणीला विरोध केला होता का? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर सदस्य काळ्या कपड्यांमध्ये दिसतात.  दावा केला जात आहे की, राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 5 ऑगस्ट 2020 रोजी सर्व काँग्रेस खासदारांनी राम मंदिर पायाभरणीचा विरोध करण्यासाठी संसद भवनात काळे कपडे घालून गेले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

इस्रायली महिलांनी दंगेखोरांना मारण्याचा तो व्हिडिओ ‘स्क्रिप्टेड’; वाचा त्यामागील सत्य

पॅलेस्टाइनमध्ये हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये छेड काढणाऱ्या काही पुरुषांना तीन महिला चांगला चोप देतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, इस्रायलमध्ये अशा प्रकारे दंगेखोरांना तेथील महिला चोख उत्तर देतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत; वाचा सत्य

सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा हा फोटो आहे. असा हा दुर्मिळ फोटो अधिकाधिक शेयर करण्याचे आवाहन पोस्टमध्ये करण्यात आले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस […]

Continue Reading

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते व मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेले आहेत. खाली दिलेल्या […]

Continue Reading

सुप्रिया श्रीनेत यांनी पुजासामग्रीवर जीएसटी का नाही असा सवाल केला नाही; वाचा सत्य

काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या म्हणतात की, “रुद्राक्ष व तुळशी माळा, पवित्र धागा, विना ब्रँडचे मध, कलावा (पवित्र धागा), विभूती, चंदनचा टिका, दिव्याची वात आणि लाकडी चप्पल इत्यादी पूजा साहित्यांवर जीएसटी कर लावला जात नाही.” या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, सुप्रिया श्रीनेत […]

Continue Reading

चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठवल्याचा गृहमंत्रालयाने इशारा दिला का?

एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानकावरील तोडफोडीचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील नौपारा महिषासुर नामक रेल्वे स्थानकाची तोडफोड झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, रेल्वे हॉर्नच्या आवाजाने नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने काही लोकांनी ही तोडफोड करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सीएए आंदोलनातील […]

Continue Reading

उज्जैनमध्ये हिंदू जमावाने मशिदीसमोर पाकिस्तान समर्थकांना विरोध दर्शविण्यासाठी नारे दिले होते का ? वाचा सत्य

उज्जैनमध्ये एका कथित मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारे दिल्यावर दुसऱ्या दिवशी मोठ्यासंख्येने हिंदू मशिदीसमोर जमले आणि “ज्यांना पाकिस्ताना पाहिजे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे” असे नारे देत निषेध केला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानीसाठी काम करतात’ असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

देशात मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा  निवडणूका पार पडणार आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या निमित्ताने छत्तीसगडच्या दौऱ्यावर गेले होते.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, “तुमचे मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात,”  दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी आपल्याच […]

Continue Reading

भारत माता की जय म्हटल्याने वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल

एका वृद्धाला जमावा द्वारे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुंबईच्या भिंडी बाजारमध्ये पिडित वृद्धाने ‘भारत माता की जय’ नारा दिल्याने मुस्लीम जमावाने त्यांना मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना जातीयवादाशी संबंध […]

Continue Reading

हिंदू महिलेला बुरखा घालूनच बसमध्ये येण्यास मुस्लिम महिलांनी सक्ती केली का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसमधून प्रवास करताना बुरखा घातलेल्या मुली साडी घातलेल्या एका महिलेवर ओरडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, मुस्लिम मुलींनी या महिलेने बुरखा घातला नसल्यामुळे बसमधून बाहेर जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

भारत सरकारने रवींद्रनाथ टागोरांचे दहा हजाराचे नाणे चलनात आणले नाही; वाचा सत्य

अहमदनगर येथे एका ग्राहकाने दुकानदाराला रवींद्रनाथ टागोर यांचे दहा हजाराचे नाणे दिले, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत दावा केला जात आहे की, भारत सरकारने दहा हजाराचे नाणे चलनात आणले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील रवींद्रनाथ टागोर यांचे दहा […]

Continue Reading

जॉर्डनमधील कोरोना काळातील खोट्या अंतयात्रेचा जुना व्हिडिओ गाझाच्या नावाने व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक एका व्यक्तीला खांदा देत घेऊन जाताना सायरनचा आवाज येतो आणि खांदेकरी व तो व्यक्ती तेथून पळ काढतात.  दावा केला जात आहे की, इस्रायल-हमास संघर्षादरम्यान गाझापट्टीमध्ये राहणारे काही पॅलेस्टिनी लोक मृत्यूचे नाटक करत खोटी अंतयात्रा काढून जगासमोर स्वत:ला पीडित आणि शोषित दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. […]

Continue Reading

भाजप नेत्यांमधील मारहाणीचा जुना व्हिडिओ काँग्रेस नेत्यांच्या नावाने व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन नेते एकमेकांशी भांडताना दिसतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये अशी मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भांडण करणारे […]

Continue Reading

इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पॅलेस्टिनने भारतीय झेंड्याचा वापर केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

सध्या इस्रायल-हमास संघर्ष विकोपाला गेला असून इस्रायलने 14 ऑक्टोबर रोजी गाझामधील  नागरिकांना उत्तरेकडील प्रदेश रिकामा करून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम महिला भारताचा झेंडा घेऊन जात आहेत. दावा केला जात आहे की, इस्रायली सैनिकांनी आपल्यावर हल्ला करु नये म्हणून पॅलेस्टाईनमधील मुस्लिम महिलांनी गाजापट्टिमधून पलायन करताना सोबत भारताचा […]

Continue Reading

इराणने रोनाल्डोला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

अर्धांगवायू असलेल्या एका इराणी महिलेने जेव्हा पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो रेखाटलेले चित्र रोनाल्डोला भेट दिले त्यावेळी त्यांने या महिलेचे कौतूक करताना मिठी मारली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, रोनाल्डोने या अविवाहीत महिलेला मिठी मारल्यामुळे इराणमध्ये त्याला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

प्लास्टिकपासून बनावट गहू तयार करण्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मशिनमध्ये प्लास्टिक टाकून त्यापासून छोटे छोटे दाणे तयार केले जातात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये प्लास्टिक पासून बनावट गहू तयार केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हडिओ प्लास्टिक पुनर्प्रक्रियेचा […]

Continue Reading

इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या मुलाला हमासविरुद्ध लढण्यासाठी पाठवले का? वाचा सत्य

सध्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष विकोपाला गेला असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत दिसतात. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू देशावर युद्धाचे सावट असताना आपल्या मुलाला देशाच्या संरक्षणासाठी युद्धभूमीवर पाठवत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

हमास व इस्रायलमधील युद्धाचे दृष्य म्हणून जुने आणि असंबंधित फोटो/व्हिडिओ व्हायरल

मागील काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पेटलेल्या युद्धाने सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. तर असंख्य लोक यात जखमी झाले आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि पॅलेस्टाई युद्धाचे दृष्य असा दावा करणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

इस्रायलने बहुमजली इमारतीवर हवाई हल्ल्याचा केल्याचा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

हमासच्या संघटनेने इस्रायलवर शनिवारी पहाटेच्या सुमारास मोठा दहशतवादी हल्ला केला. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका बहुमजली इमारतीवर हवाई हल्ला होतो आणि ती इमारत कोसळते. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ हमासच्या संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

इस्रायलने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

हमास या पॅलेस्टिनी कट्टरपंथी संघटनेने इस्रायलवर शनिवारी मोठा दहशतवादी हल्ला केला. ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर काही ईमारतींवर हवाई हल्ला होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला आहे की, हा व्हिडिओ इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून असा केलेल्या हल्ल्याचा आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना आहे काय […]

Continue Reading

भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर होण्याची फेक बातमी व्हायरल; वाचा सत्य

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे येत्या दोन वर्षांत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिल्याचे बातमीच्या कात्रणामध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा कोणताही […]

Continue Reading

नेपाळच्या संसदमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतो. दावा केला जात आहे की, या व्हिडिओ नेपाळच्या संसद भवनातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नेपाळच्या संसदेचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा व्यक्ती […]

Continue Reading

उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये हत्ती वारल्याची जुनी बातमी व्हायरल; वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक हत्ती जमिनीवर पडलेला असून त्याच्यावर फुल आणि हार चढवलेले आहेत. दावा केला जात आहे की, व्हायरल फोटोमधील हत्ती उज्जैनच्या महाकाल मंदिराचा असून नुकताच त्याचा मृत्यू झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, उज्जैनच्या महाकाल […]

Continue Reading

चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठवल्याचा गृहमंत्रालयाने इशारा दिला का?

एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

व्हायरल व्हिडओमध्ये नृत्य करणारी महिला खरंच वहिदा रहेमान आहे का ? वाचा सत्य

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका जेष्ठ महिलेच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, त्या वहिदा रेहमान आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील नृत्य करणारी महिला वहिदा रेहमान नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ […]

Continue Reading

भाजप पदाधिकाऱ्याने पत्रकाराला ठार मारण्याची धमकी दिली का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पत्रकाराला धमकी देत आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात प्रश्न विचारल्यास जीव गमवावा लागेल’ दावा केला जात आहे की, धमकी देणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

कॅनडा सरकारने RSS वर बंदी घातली नाही; व्हिडिओसोबत भ्रमक दावा व्हायरल

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी भारतावर आरोप केल्यामुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले आहेत. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅनडामध्ये RSS संघटनेवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या कार्यकर्त्यांना कॅनडा सोडण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थिती होते? भ्रमक दावा व्हायरल

महिला आरक्षण विधेयकावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. पुरावा म्हणून संसदेतील एक फोटो शेअर केला जात आहे.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा भ्रामक आहे, पंतप्रधान मोदी महिला आरक्षण विधेयकावरील मतदान प्रक्रियेच्या वेळी उपस्थित होते, तसेच त्यांनी संसद भवनात या विधेयकावर आपले मतदेखील व्यक्त केले. काय […]

Continue Reading

नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कॅन्सर बरा होत नाही; डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

सोशल मीडियावर आरोग्यविषयी सल्ला देणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट असतो. अशाच एका व्हायरल मेसेजमध्ये मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरचा दाखला देत सल्ला दिला आहे की, नारळाचे पाणी गरम करून पिल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. निरोगी राहण्यासाठी जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे आवाहनही यामध्ये केलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली नाही; जुन्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एबीपी न्यूजची बातमी व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2019 मधील बातमीचा आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही. काय आहे दावा […]

Continue Reading

भारतासाठी एका कॉलवर रक्त मिळवण्याची 104 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली नाही

सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की, संपूर्ण भारतासाठी ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेकरिता 104 क्रमांक सुरू करण्यात आला आहे. रक्ताची गरज असल्यास भारतात कुठूनही या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. 104 हा क्रमांक […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये दाखविलेले राम मंदिर खरंच अयोध्येचे आहे का ? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एका राम मंदिराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर अंजना कश्यप यांनी पत्रकारांवर टीका केली का?

प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने 14 टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये आज तक (हिंदी) या चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादिका अंजना ओम कश्यप म्हणतात की, पत्रकारांनी आपल्या अनैतिक वागणुकीमुळे समाजाचे भरून न येणारे नुकसान केले आहे.  दावा केले जात आहे की, इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर […]

Continue Reading

भारताला ‘इंडिया’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नव्हते; वाचा सत्य

दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत आलेल्या मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या आमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे देशाचे इंडिया नाव हटवून आता ‘भारत’ या नावाचा वापर केला जाईल, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेजमध्ये व्हायरल होते आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार […]

Continue Reading

रस्त्यावरील झोपडपट्टी झाकण्याचा फोटो दिल्ली जी-20 शिखर परिषदेचा नसून मुंबईचा आहे; वाचा सत्य

जी-20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीत रस्त्यावरील गरीब वस्त्यांना हिरव्या कपड्यामागे लपविण्यात आले, या दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती व्हायरल फोटो दिल्लीचा नसून, मुंबईतील आहे.  काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये इमारतीला हिरव्या कपड्याने झाकलेले दिसते आणि त्यावर जी-20 शिखर परिषदेची पोस्टर […]

Continue Reading

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये अर्धांगवायूच्या गोळ्या सापडल्याचा व्हिडिओ फेक; विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

ल्युपो/लुप्पो नावाच्या कंपनीच्या केकमध्ये लहान मुलांना अर्धांगवायू होईल अशा गोळ्या सापडल्या, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केकमध्ये पांढऱ्या गोळ्या निघाल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही. तसेच तो खोडसाळपणे कोणीतरी तयार केला होता.  काय […]

Continue Reading

नेदरलँडच्या पंतप्रधानांनी जी-20 दरम्यान स्वतःच फरशीवर सांडलेली कॉफी पुसली का?

नवी दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधानांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नेदरलँडच्या पंतप्रधानच्या हातून कॉफी पडल्यावर ते स्वत: फरशी पुसताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नवी दिल्लीच्या जी-20 शिखर परिषदेदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकविल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? वाचा सत्य

भारतात कोणीही जर पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर त्या व्यक्तीवर कोणतीही सुनवाई न करता थेट देशद्रोहाचा खटला चालविण्याचा गृह मंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतला, असा मेसेज व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, गृह मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. […]

Continue Reading

मराठा आंदोलनात बॉम्बस्फोटच्या कटाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

जालनातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी जाळपोळ आणि पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावदेखील उद्भवला.  या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या एका बातमीचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. या बातमीत म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठान संस्थेने मराठा आंदोलनात गावठी बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट रचला होता. […]

Continue Reading

सुधा मुर्ती मुंबई-बंगळुरू रेल्वेत विनातिकिट प्रवास करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्या बालपणाविषयक एक करुणादायी गोष्ट व्हायरल होत आहे. लहानपणी मुंबई-बंगुळुरू रेल्वेतून त्या विनातिकिट प्रवास करत असताना एका मायाळू प्राध्यापिकेने त्यांची मदत करत त्यांना शिकण्यासाठी मदत केली, असे या व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

व्हाईट हाऊसमध्ये “श्री रुद्रम् स्तोत्राचे” पठण केल्याचा दावा फेक; वाचा सत्य

अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ‘श्री रुद्रम् स्तोत्र’ पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही विदेशी लोक पूजापाठसह स्तोत्राचे पठण करताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसमध्ये करण्यात […]

Continue Reading

ढाब्यामध्ये गटारीच्या पाण्यातून बिर्याणी बनवली जात नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक एका ढाब्यामध्ये गटारीच्या पाण्यावरून वाद  घलताना दिसतात.  दावा केला जात आहे की, या ठिकाणी शमा ढाब्यामध्ये बिर्याणीसाठी गटारीचे पाणी वापरले जाते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. […]

Continue Reading

चंद्रावर अशोकस्तंभचा ठसा असलेला तो व्हायरल फोटो खरा नाही; वाचा सत्य 

चंद्रयान-3 चंद्रावर उतरल्यावर प्रज्ञान रोव्हर तेथे फिरून वैज्ञानिक शोध व माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, असे बोलले जात आहे की, या रोव्हरच्या चाकावर भारतीय राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाची डिझाईन करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर चंद्रावर अशोकस्तंभाचे ठसे दिसणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो चंद्रावरील प्रज्ञान रोव्हरद्वारे उमटलेल्या ठशांचा आहे. […]

Continue Reading

नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला नाही; अॅनिमेशन क्लिप व्हायरल 

इस्रोची महत्त्वकांक्षी चंद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरले. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नासाने जारी […]

Continue Reading

प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक बुद्धीबळ विश्वचषक पटकाविला का? वाचा सत्य

सध्या बुद्धीबळ विश्वचषकामध्ये  भारतीय बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंद आणि नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसन यांच्यापैकी कोण बाजी मारणार सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक विजेतेपद मिळवले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. […]

Continue Reading

चंद्रयान-३: चंद्रावरून पृथ्वी दिसण्याचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

चंद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते हे दाखविण्यात आले आहे. दावा केला जात आहे की, चंद्रयान-3 ने हा व्हिडिओ काढला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

गदर-2 पाहताना ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा दिल्याने मारहाण करण्यात झाली का? वाचा सत्य

गदर – 2 या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चित्रपट सुरू असताना सिनेमा गृहामध्ये मारहाण होताना दिसते.  या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, गदर – 2 या चित्रपटादरम्यान एका व्यक्तीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या म्हणून लोकांनी त्याला चोप दिला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता […]

Continue Reading

स्वातंत्र्यदिनाला दुबईमध्ये बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झळकला नाही का? वाचा सत्य

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर त्या त्या देशाचा झेंडा झळकविला जातो. यंदा मात्र पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाला बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा झळकविण्यात आला नाही, असा दावा केला जात आहे. एका व्हिडिओद्वारे म्हटले जात आहे की, नाराज पाकिस्तानी नागरिकांनी तेथे आंदोलन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

FAKE MESSAGE: येत्या महिन्यात पृथ्वीचे सूर्यापासून अंतर वाढून थंड हवेची लाट येणार का?

सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, कथित “Alphelion Phenomenon” मुळे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर वाढणार असून त्यामुळे थंढी आणि रोगराई पसरणार. 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहील, असे मेसेजमध्ये म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

म्यानमारमधील लोकांनी बेकायदेशीर मणिपूरमध्ये प्रवेश करतानाचा हा व्हिडिओ नाही.

काही दिवसांपुर्वी मणिपूरमध्ये स्थानिक आणि सौनिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा म्यानमारमधील काही लोकांनी बेकायदेशीरपणे मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची घटना समोर आली होता. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओमध्ये बाळाला पाठिवर घेऊन काही महिला थोकादायक पर्वतीतून वाट काढत आहे, दावा केला जात आहे की, अशा प्रकारे जीव धोक्यात घालून म्यानमारमधील लोक बेकायदेशीरपणे मणिपूरमध्ये प्रवेश करतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

बुलेटप्रुफ कारची चाचणी करणारे ते मर्सिडज बेंझ कंपनीचे सीईओ नाहीत; वाचा काय आहे सत्य

कारवर एके-47 बंदुकीने गोळीबार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मर्सिडज बेंझ कंपनीच्या सीईओने स्वतः बुलेटप्रुफ कारमध्ये बसून गाडीची चाचणी केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, बुलेटप्रुफ कारची चाचणी घेणारे मर्सिडिज बेंझचे सीईओ नव्हते.  काय आहे […]

Continue Reading

उंच कड्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागणारे गाव अरुणाचल प्रदेशातील नाही; चीनमधील व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर पाठीवर लहान मुले आणि अवजड सामान घेऊन धोकादायक डोंगरावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अरुणाचल प्रदेशातील एका खेड्यात गावकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातील नसून, […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी भाजप सरकारला जुमलेबाज-लुटारू म्हटले का? वाचा सत्य 

आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत त्यांनी जनतेला जुमलेबाज, धोकेबाज, लुटारू सरकारवर विश्वास न ठेवण्याचे कथित आवाहन केलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून भारताचे नाव INDIA ठेवण्यात आले नाही; वाचा सत्य

नुकतेच भारताने 75 वा स्वातंत्र्या दिन साजरा केला. सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षावाबरोबरच भारताचे इंग्रजी नाव (India) कसे पडले याविषयी एक रंजक मेसेजदेखील व्हायरल झाला. व्हायरल मेसेजनुसार, भारत ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र झाला म्हणून त्याला INDIA (Independent Nation Declared In August) असे म्हणतात. सोबत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये ही माहिती दिल्याचा दाखला दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना समलैंगिक म्हटले नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन गदारोळ सुरू आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही दिसले. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणीदेखील केली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक क्लिप व्हायरल होत आहे ज्याद्वारे दावा केला जात आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सावरकरांबद्दल अपशब्द वापरले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

पाणी साचलेल्या विमानतळाचा फोटो अहमदाबादचा नाही; चेन्नईतील जुना फोटो व्हायरल

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पूराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. अमहदाबाद विमानतळालासुद्धा जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले होते.  दरम्यान, विमानतळावर पाणी साचल्याचा एक फोटो शेअर करून दावा करण्यात येत आहे की तो फोटो अहमदाबाद विमानतळाचा हे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

अत्तर विकण्याच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज फेक; वाचा सत्य

मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा लोकांपासून सावधान राहावे, असा सल्ला मुंबई पोलीसांनी दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई […]

Continue Reading

मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचार: आरोपींच्या अटकेविरोधात मैतेई समाजाने रॅली काढली नाही

मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झाल्याचा व्हिडिओ दोन महिन्यांनी समोर आल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. कुकी समाजातील महिलांवर मैतेई समुदायातील काही लोकांनी अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर रॅलीचे व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कुकी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याच्या विरोधात बहुसंख्य मैतेई गटाकडून मणिपूरमध्ये निषेध रॅली काढण्यात […]

Continue Reading

भाजप नेत्याच्या मारहाणीचा व्हिडिओ मणिपुरशी संबंधित नाही; चुकीचा दावा व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये काही लोक एका व्यक्तीचा पाठलाग करत त्याला काठीने मारहाण करतात. दावा केला जात आहे की, मणिपूर हिंसाचाराच्या  घटनेनंतर लोकांचा आक्रोश अनावर झाला आणि त्यांनी नोएडामध्ये भाजप नेते राहुल पंडित यांना मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

लोकसत्तेचा लोगो वापरुन संभाजी भिडे यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल; वाचा सत्य

शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या नावाने एक आक्षेपार्ह विधान व्हायरल होत आहे. लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोगो असलेल्या ग्राफिक कार्डद्वारे हे विधान पसरविले जात आहे.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, संभाजी भिडे यांनी असे वक्तव्य केलेले नसून लोकसत्ताच्या वेबसाईटनेसुद्ध अशी कोणती ही बातमी दिलेली […]

Continue Reading

छ. संभाजीनगरमध्ये वाघांचा सुळसुळाट? व्हायरल अफवेमुळे नागरिक हैराण; वाचा सत्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) वाघ फिरत असल्याचे व्हिडिओ शेअर करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देणारे मेसेज व्हायरल होत आहेत. वन विभागाकडून शहरातील नागरिकांना रात्री बाहेर न फिरण्याचे आवाहन केले जात असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघ दिसल्याची अफवा […]

Continue Reading

महिलांसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून हिंदू धर्मगुरुला मारहाणीचा खोटो व्हिडियओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अर्धनग्न अवस्थेतील दोन महिला आणि एक पुरुषाला काही लोक मारहाण करत आहेत. दावा केला जात आहे की, महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवणारा हा व्यक्ती भारतीय हिंदू गुरू आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ […]

Continue Reading

जे.जे. रुग्णालयामध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदयविकाराचे निदान होत असल्याचा फेक मेसेज व्हायरल? वाचा सत्य

नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाच्यासाह्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयमध्ये 5 हजार रुपयांमध्ये हृदय विकाराचा निदान करण्यात येत आहे, या दाव्यासह एका संशोधनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे. काय आहे दावा ? दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हृदय विकाराचा निदान […]

Continue Reading

शिमला मिरचीमध्ये जगातील सर्वात लहान विषारी साप सापडला का ? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर शिमला मिरचीमध्ये जगातील सर्वात लहान विषारी साप सापडला या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होते आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की,  व्हायरल व्हिडिओमधील प्राणी मानवांसाठी हानिकारक नाही. काय दावा आहे ? व्हायरल व्हिडिओमध्ये शिमला मिरची कापल्यावर त्यामध्ये एक लहान कीटक दिसतो. […]

Continue Reading

स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट असल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून स्टारचे चिन्ह (*) असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासोबत दावा केला जात आहे की, असे स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, स्टारचे चिन्ह असलेली 500 रूपयांची नोट बनावट […]

Continue Reading

मणिपूरमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात संघ कार्यकर्त्यांचे फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन कार्यकर्तांचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, त्यांपैकी एक जण मणिपूर महिला सामूहिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

मणिपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते भाजपचा झेंडे जाळत असल्याचा तो व्हायरल व्हडिओ जुना; वाचा सत्य

मणिपूरमध्ये जमावाद्वारे दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काडून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. सत्तारुढ भाजपविरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन सुरू होत आहेत.  दरम्यान, सोशल मीडियावर भाजपचा झेंडा जाळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, मणिपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच भाजप पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा जाळून […]

Continue Reading

वैश्विक किरणांमुळे मोबाईल दूर ठेवण्याची अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

अनेक मोबाईल वापरकर्त्यांना 20 जून रोजी सकाळी 10 वाजता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट मेसेज आला होता. अचानक आलेल्या या मेसेजवरून अनेक वावड्या उठल्या. उलटसुलट चर्चांना उधाण आले.  त्यात भर म्हणून एक मेसेज व्हायरल होऊ लागला की, मध्यरात्री पृथ्वीच्या जवळून वैश्विक किरणे जाणार असल्यामुळे सर्वांना आपापले मोबाईल दूर ठेवावे. सोबत नासा, बीबीसी आणि […]

Continue Reading

केदारनाथमध्ये मुस्लिम घोडेवाहकांनी प्रवाशांवर हल्ला केल्याची खोटा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

केदारनाथ यात्रेला आलेल्या एका प्रवाशाला मारहाण होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओसबोत दावा केला जात आहे की, केदारनाथमध्ये घोडा आणि खेचर वाहून नेणारे मुस्लिम लोक प्रवाशांना पायी प्रवास करू न देता बळजबरीने घोड्यावर बसण्यास भाग पाडतात. नकार दिल्यास ते प्रवाशांना मारहाण करतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो […]

Continue Reading

भारतीय जवान व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धक्क देऊन बंद रेल्वे सुरू केली का ? वाचा सत्य

एका बंद पडलेल्या रेल्वेला सुरू करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचारी आणि भारतीय सैनिकांना धक्का मारावा लागला, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमध्ये आग लागलेल्या डब्ब्यांपासून इतर डब्ब्यांना दूर ढकलण्यात येत होते. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

गुरुग्राममधील मुलीच्या हत्या प्रकरणाशी लव्ह जिहादचा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील मल्हेडा गावात एका मुस्लिम युवकाने एका हिंदू मुलीची चाकू मारून हत्या केली, या दाव्यासह एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीला मारणारा आरोपी मुस्लिम नव्हता. या घटनेत कोणतेही सांप्रदायिक कारण नाही. काय आहे दावा ? […]

Continue Reading

चीनमधील महामार्गाचा फोटो भारताच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील महामार्गांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अशा टीकाकारांना उत्तर एका सुसज्ज महामार्गाचा फोटो शेअर केला जात आहे. त्यासोबत उपरोधकपणे म्हटले की, भारत एकमेव देश आहे जेथे अपघातासाठी चांगल्या रस्त्याला दोष दिला […]

Continue Reading

महाराष्ट्रात सरकारी नोकर भरतीवरील बंदीची 8 वर्षे जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी होत असतानाचा सोशल मीडियावर एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात येत आहे की, शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात सरकारी नोकरी भरतीवर बंदी घातली. राज्याची आर्थिकस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे बातमीत म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी बातमीचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

हिंदूंना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळाल्याची खोटी बातमी व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर एका बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदूंना आता स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची सरकारने परवानगी दिली, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सरकारने अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. काय आहे दावा ? व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, “हिंदूंना […]

Continue Reading

मशिदीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती; बनावट फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मशिदीला भेट देताना डोक्यावर मुस्लिम टोपी घातलेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम टोपी घातली नव्हती. चुकीच्या दाव्यासह बनावट फोटो […]

Continue Reading

मोबाईल व टीव्हीवर जीएसटी कमी केल्याची अफवा व्हायरल; चुकीच्या बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ

‘एक देश, एक कर’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या जीएसटी कर प्रणालीला नुकतेच सह वर्षे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर दावा केला जाऊ लागला की, सरकारने 1 जुलैपासून मोबाईल, टीव्ही आणि इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी दर कमी केल्यामुळे या उपकरणांच्या किंमती स्वस्त झाल्या.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातम्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली नाही; चुकीच्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली, या दाव्यासह सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रिया सुळेंवर कोणतीही टीका […]

Continue Reading

US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकाराला उत्तर देणे टाळले नव्हते; अर्धवट क्लिप व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका आणि इजिप्त दौरा पूर्ण करून भारतात परतले असून या दौऱ्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अशाच एख व्हिडिओमध्ये व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातील मुस्लिम व इतर अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले असा दावा केला जात आहे.  […]

Continue Reading

जामावाद्वारे छेडछाड झालेल्या महिलांचा व्हिडिओ नेमका कुठला ? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जामावाद्वारे 3 महिलांचा भर रस्त्यावर छळ केला जात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. अनके युजर्सने या व्हिडिओला हिंदु-मुस्लिम रंग देऊन सांप्रदायिक दावेसुद्धा केले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

Altered Video: चित्रपटामधील संभाषण शरद पवारांच्या दिल्ली बैठकीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल

सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये कटकारस्थान करत आहेत, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पवारांसह विरोधीपक्षांतील काही नेते मंडळी दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोलतो की, “निवडणूक जिंकण्यासाठी […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले नाही; खोट्या दाव्यासह टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले होते, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होते आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील चक्रीवादळ बनावट आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? चक्रीवादळाचा […]

Continue Reading

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसचा विरोध करत नरेंद्र मोदींची स्तुती केली का? वाचा सत्य

माजी पंतप्रधान डॉ. मनमोह सिंग यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत नरेंद्र मोदींची स्तुती केली. अशा ट्विटचा स्क्रिनशॉर्ट व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, माजी पंतप्रधान डॉ.मनमोह सिंग यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन हे ट्विट केले की काँग्रेस त्यांना मनाप्रमाणे काम करू देत नव्हती आणि नरेंद्र मोदी स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

सावरकरांचा धडा असलेले पाठ्यपुस्तक डी. के. शिवकुमार यांनी फाडले नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिवकुमार एक पुस्तक फाडताना दिसतात. या व्हायरल व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, “मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकातील भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात छापलेले ‘वीर सावरकर’ यांच्यावरील पुस्तक फाडले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डी. के. […]

Continue Reading

रात्रीच्या वेळी महिलांना घरी सोडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ‘मोफत राईड योजना’ सूरू केली नाही; वाचा सत्य

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्रीच्या वेळी घरी सोडण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली आहे, या दाव्यासह एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, या पोस्टरमधील माहिती भ्रमक आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अशी कोणताही योजना सुरू केली नाही. काय आहे दावा […]

Continue Reading

नवीन नाणे चलनात आले नसून ते ‘स्मारक नाणी’ आहेत; बनावट नोटांचा व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी दिनी टपाल तिकिट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे 28 मे रोजी अनावरण केल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, भारत सरकारने दोन हजाराच्या नोटा वितरणातून मागे घेतल्यानंतर नवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

अमेरिकेत 21 तोफांची सलामी दिले जाणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते आहेत का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला 21 तोफांची सलामी देऊन देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच जागतिक नेत्याला 21 तोफांची सलामी देण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पंडित नेहरूंनी आदिवासी महिलेच्या हस्ते भाभा अणु प्रकल्पाचे उद्धाटन केले होते का? वाचा सत्य

सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि एक महिला दिसते. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका आदिवासी महिलेला भाभा अटॉमिक अणु प्रकल्पाचे उद्धाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

व्हिडिओमधील मुलगी किशोर कुमारची नात नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक मुलगी “दीवान हुआ बादल” हे गीत गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गाण गाणारी मुलगी अमित कुमारची मुलगी आणि किशोर कुमारची नात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले आहे की, व्हायरल व्हिडिओमधील गीत गाणारी मुलगी किशोर कुमारची नात […]

Continue Reading

दुचाकीस्वार मृतदेह नाही तर पुतळा घेऊन जात आहे; इजिप्तमधील फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, राजस्थानमध्ये एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवर ठेवून घेऊन गेला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. हा फोटो भारतातील नसून इजिप्त आहे आणि तो […]

Continue Reading

Scripted Video: हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलने मारले

महाराष्ट्र टाइम्सने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलेने मारले असे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. हा स्क्रिप्टेड व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

केरळमध्ये RSS कार्यर्त्याच्या शिरच्छेदाचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, केरळमध्ये मुस्लिम तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याचा शिरेच्छेद केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. असंबंधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहेत. काय आहे दावा ? 50 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही […]

Continue Reading

दोन हजाराची नोट बदलण्यासाठी विशेष फॉर्म भरण्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

आरबीआयच्या घोषणेनुसार 23 मेपासून बँकेत दोन हजारच्या नोटा बदली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एका फॉर्मच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी बँकेत विशेष फॉर्म भरणे अनिवार्य आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा निव्वळ अफवा आहे. […]

Continue Reading

इसिसच्या कैदेतून मुलींना सोडविण्याचा सीरियामधील व्हिडिओ भारतीय लष्कराच्या नावाने व्हायरल

दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भारतीय लष्कराने बांग्लादेशमध्ये इसिसच्या कैदेतून 38 हिंदू मुलींना सोडविले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचा नाही. हा व्हिडिओ सीरियातील आहे.  काय आहे […]

Continue Reading

चाकात लपविलेल्या दोन हजाराच्या नोटा जप्त केल्याचा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर होताच सोशल मीडियावर याविषयी विविध व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. अशाच एका क्लिपमध्येमध्ये चाकामध्ये लपविलेल्या दोन हजाराच्या नोटा काढत असल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, आरबीआयच्या निर्णयानंतर लोक असा काळा पैसा बाहेर काढत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

‘गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही’; दिग्विजय सिंह यांचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते गाईला माता मानण्याविषयी आक्षेप घेत म्हणतात की, “गोमांस खाण्यात काही चुकीचे नाही.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्थवट आहे. दिग्विजय सिंह सावरकरांच्या पुस्तकात काय लिहिले ते सांगते होते. काय […]

Continue Reading

केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओचे सत्य

महिलांचा जमाव एका व्यक्तीला बेदम चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या दाव्यासह पसरविला जात आहे. काही जण केरळमध्ये महिलांनी भाजप आमदाराला नागडा करून मारल्याचे म्हणत आहेत, तर काही जण ही घटना बारामतीमध्ये घडल्याचे सांगत आहेत. शिवाय हाच व्हिडिओ हिंदु मुलींनी छेड काढणाऱ्या मुस्लिम तरुणाला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणूनदेखील शेअर होत आहे.  फॅक्ट […]

Continue Reading

दोन हजराच्या नोटा अद्याप चलनातून बाद नाही; वाचा आरबीआयचा निर्णय नेमके काय सांगतो

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 2000 रुपयाच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने शुक्रवारी (19 मे) एक परिपत्रक काढून नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.   या निर्णयामुळे सोशल मीडियावर सकारात्मक आणि नकारात्म अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी पुन्हा एकदा नोटबंदी तर जाहीर झाली नाही ना […]

Continue Reading

कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बुरखा घालून दगडफेक केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. अशाच व्हायरल दाव्यामध्ये म्हटले आहे की, काँग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम समुदायाला बदनाम करण्यासाठी बुरखा घालून पोलिसांवर दगडफेक केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. तेलगंनामधील जुनी घटना […]

Continue Reading

भाजपच्या झेंड्यावर गाय कापण्याचा व्हिडिओ कर्नाटकचा नसून मणिपूरचा आहे; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक खोटे दावे शेअर केले जात आहे. अशाच एका व्हायरल व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये मुस्लिमांनी भाजपच्या झेंड्यावर गाईची हत्याकरून काँग्रेसचा विजय साजरा केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कर्नाटकमधील नाही. जुना […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये भाजप नेताच्या कारमध्ये ईव्हीएम सापडल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीl काँग्रेसने 135 भागांवर विजय मिळवला तर भाजपला 66 जागावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी 10 मे 2023 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्हातील मसाबिनल गावात लोकांनी एक कार अडवून ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की,“कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या वाहनामध्ये ईव्हीएम सापडल्याने संतप्त मतदारांकडून यंत्रणांची तोडफोड करण्यात आली.”  फॅक्ट […]

Continue Reading

पश्चिम बंगालमधील बोगस मतदानाचा जुना व्हिडिओ कर्नाटकच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 135 जागांसह कर्नाटकमध्ये एकहाती विजय मिळवला. सत्तारुढ भाजपच्या वाट्याला केवळ 66 जागा आल्या. यानंतर सोशल मीडियावर कर्नाटकामध्ये बोगस मतदान आणि ईव्हीएम मशीनची पळवापळवीचे दावे केले जात आहेत.  यातच भर म्हणजे अनेक मतदारांच्या नावाने बोगस मतदान करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कर्नाटक […]

Continue Reading

‘उद्धव ठाकरे पळून गेले’: एबीपी माझाच्या नावाने बनावट ग्राफिक कार्ड व्हायरल, वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावर आपला निर्णय देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी करण्याचे राज्यपालांचे निर्देश बेकायदेशीर होता; परंतु ठाकरेंनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने त्यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करता येणार नाही.  या पर्श्वभूमीवर एबीपी माझाचा लोगो वापरून दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरे स्वत: पळून गेल्याने त्यांचे […]

Continue Reading

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला जमलेली गर्दी म्हणून नरेंद्र मोदींच्या सभेचा जुना व्हिडिओ व्हायरल

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून काही आघाडीच्या कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर 23 एप्रिल पासून आंदोलन सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर एका विराट गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन म्हणून ही रॅली काढण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

‘यूपीमध्ये भाजप सरकार आल्यास गुंडांचे राज्य येईल’ असे नरेंद्र मोदी म्हणाले नाहीच; वाचा सत्य

सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना म्हणतात की, “उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यास दंगली, माफीया आणि गुंडांचे राज्य येईल.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे.  काय आहे दाव ? […]

Continue Reading

कर्नाटकमध्ये “मोदी हटओ, देश बचाओ” अशी बनावट जाहिरात व्हायरल; वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान 10 मे रोजी पार पडले. तत्पूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान “मोदी हटओ, देश बचाओ” असा संदेश देणारी जाहिरात व्हायरल झाली. दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही जाहिरात तयार केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताणळीअंती कळाले […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपर समर्थन केले का? वाचा सत्य

भारतात ईव्हीएम हा नेहमीच एक वादाचा विषया राहिलेला आहे. सध्या सोशल मीडिवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बैलेट पेपर नाव वाचून मतदान करतात, या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बैलेट पेपरचे समर्थन करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

अखिलेश यादव यांनी 2000 मशिदी बांधण्याचे आश्वासन दिले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल

उत्तर प्रदेशमध्ये चार मे रोजी नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 37 जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कथित जाहिर केलेल्या आश्वासनपत्रातचे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.  त्यामध्ये अखिलेश यादव “2000 मशिदी बांधण्यात येतील आणि मागासवर्गीयांचे आरक्षण कमी करून ते मुस्लिम सामाजाला दिले जाईल” असे वादग्रस्त आश्वसन दिल्याचा दावा केला जात आहे. […]

Continue Reading

पाईपमधून वाट काढणाऱ्या दुचाकीस्वारांचा व्हिडिओ पुण्याचा नसून मुंबईचा आहे; वाचा सत्य

खराब रस्ता आणि वाहतुकीला अडथळा झाल्याने लोकांनी अजब शक्कल लढविल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्यावर ठेवलेल्या पाईपमधून दुचाकी चालवत असल्याचे दिसते.  अनेक युजर हा व्हिडिओ पुण्यातील वाहतुकीची दुर्दशा म्हणून शेअर करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांनी ‘महाशक्ती मला मोठ्या बाजार समित्या देणार’ असे विधान केले नाही; वाचा सत्य

राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला असून शिंदे आणि भाजप यांच्या महाशक्ती गटाने 31 समित्यांवर विजय मिळवला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक विधान व्हायरल होत आहे. सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीने त्यांना “आता पेक्षा मोठ्या बाजार […]

Continue Reading

पाणी गळतीमुळे छत्री धरलेल्या रेल्वेचालकचा व्हायरल फोटो वंदे भारत ट्रेनचा नाही; वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर रेल्वेत छत्री धरून बसलेल्या रेल्वेचालकाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी उद्धाटन केलेल्या वंदे भारत ट्रेनचे छत गळू लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सात वर्षांपूर्वीचा झारखंडमधील […]

Continue Reading

व्हीआयपी कंपनीने लव जिहादचा पुरस्कार करणारी जाहिरात केलेली नाही; बनावट व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, केरळमध्ये व्हीआयपी कंपनीने ‘लव्ह जिहाद’चा पुरस्कार करणारी जाहिरात प्रसारित केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महिलेच्या कपाळवरून टिकली काढून डोक्यावर ओढणी टाकतो. सोबत म्हटले जात आहे की, ईदनिमित्त व्हीआयपी कंपनीने ही जाहिरात तयार केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

भाजपच्या प्रचार वाहनावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ कर्नाटकचा आहे का ? वाचा सत्य

कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवरून आलेली असताना प्रचाराला उधान आलेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार वाहनावर होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कर्नाटकमधील नाराज मतदारांनी हा भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कर्नाटकचा […]

Continue Reading

उत्तर प्रदेशचा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहची गर्दी म्हणनू व्हायरल; वाचा सत्य

नुकतीच मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर मुस्लिम बांधवांच्या गर्दीच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गर्दीचा हा व्हिडिओ नाशिकच्या शाहजानी ईदगाहचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नाशिकचा नाही. ही गर्दी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद […]

Continue Reading

बिबट्याचा तो व्हिडिओ पुण्यातील नाही, कर्नाटकचा व्हिडिओ इकडे व्हायरल; वाचा सत्य

पुण्याच्या भोसरी भागातील संत तुकाराम नगरमध्ये एका रस्त्यावर बिबट्या दिसला, या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ही क्लिप पुण्याची नसून ती कर्नाटकमधील आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे. काय आहे […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नाहीत; वाचा सत्य

स्वामी विवेकानंद यांचा दुर्मिळ व्हिडिओ म्हणून एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती स्वामी विवेकानंद नसून ते स्वामी योगानंद आहेत. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

हा व्हिडिओ अतीक अहमदच्या मुलाच्या अंतयात्रेचा नाही; वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील माजी खासदार व कुख्यात गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असद अहमद गेल्या आठवड्यात पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. त्यानंतर असदच्या अंत्ययात्रेला जमलेल्या विराट गर्दीचा व्हिडिओ म्हणून एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडियो असदच्या अंत्ययात्रेचा […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये बनावट काजू बनवले जात नसून ते ‘काजू नमक पारे’ आहेत; वाचा सत्य

भेसळयुक्त खाद्यपदार्थांची समस्या गंभीर असून सोशल मीडियावर याविषयी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, काजुचे तुकडे आणि भिजलेल्या शेंगदाण्याची पेस्ट वापरून कृत्रिम काजू बनवताना दाखविले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये कृत्रिम काजू बनवले जात […]

Continue Reading

“खोटं बोलून राज्य करणे हा भाजपचा अजेंडा”; पंतप्रधानांच्या नावाने खोटे वक्तव्य व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपलाच घरचा आहेर देत “गरीबांना खोटी स्वप्न दाखवून राज्य करणारा पक्ष” असे म्हटल्याचा दावा एका क्लिपसोबत केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य भाजपविषयी नव्हे तर, काँग्रेसला उद्देशून […]

Continue Reading

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी एक दावा व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठी वाहिनीचे ग्राफिक्स वापरून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच सवाल केला.  व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की “उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, बोंबलत का […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही; वाचा सत्य

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये ते खलिस्तानची मागणी करणाऱ्या अमृतपाल सिंहला कथितरीत्या समर्थन देत असल्याचे दिसते. व्हायरल क्लिपमध्ये ते पत्रकारांशी बोलताना अमृतपाल सिंहने खलिस्तानबाबत केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

अंबानींच्या पार्टीत टिश्यू पेपर्स म्हणून 500 रुपयांच्या नोटा वापरल्या होत्या का ? वाचा सत्य

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ३१ मार्च रोजी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सेलेब्रिटी यांच्यासह राजकीय नेतेदेखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकपत्र’ या वृतपत्राने दावा केला की, या कार्यक्रमात 500 रुपयांच्या नोटा टिश्यू पेपर म्हणून वापरण्यात आल्या.  फॅक्ट […]

Continue Reading

MODI DEGREE: नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद संपता संपत नाही. त्यांच्या पदवीच्या अधिकृततेविषयी शंका उपस्थित करणारे आक्षेप आणि आरोप अधुनमधून केले जातात. अशाच एका नव्या दाव्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पदव्युत्तर पदवीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे, असे म्हटले आहे.  1983 साली मोदींच्या एम. ए. पदवीवर सही करणारे कुलगुरू प्रा. के. एस. शास्त्री दोन वर्षे आधीच म्हणजे 1981 सालीच निवृत्त […]

Continue Reading

व्हिडिओ गेमची क्लिप भारतीय लष्कराचे आधुनिक वाहतूक तंत्रज्ञान म्हणून व्हायरल; वाचा सत्य

रॉकेट घेऊन जाणाऱ्या ट्रकला पूराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्यासाठीचे नवे तंत्रज्ञान दाखवणारी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतीय लष्कराने विकसित केलेल्या नवीन शस्त्रवाहतूक तंत्रज्ञानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, व्हायरल क्लिप एका व्हिडिओ […]

Continue Reading

चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला.  शिंदे गटाच्या महिलांनी कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना कथितरीत्या मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट इशारा दिला की, “या पुढे […]

Continue Reading

APRIL FOOL: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची अफवा; वाचा सत्य

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू? शिंदे सरकार जाणार? वाचून आश्चर्य वाटले ना. वाटायलासुद्धा पाहिजे. सोशल मीडियावर अशा वावड्या उठल्या आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ शेअर करून अफवा पसरविली जात आहे की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

हैदराबादमधील जुना व्हिडिओ संभाजीनगरमध्ये दंगेखोरांच्या अटकेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दोन गटांतील भांडणाचे पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. शहरातील किराडपुरा भागात उफाळलेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून 17 वाहनांची जाळपोळ झाली. शहर पोलिसांनी सुमारे 500 जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे दाखल केले असून दोषींचे अटकसत्र सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिस काही लोकांना रस्त्यावरून फरफटत ओढून […]

Continue Reading

दहा रुपयाचे नाणे बंद झाले नाही; वर्षानुवर्षे एकच अफवा व्हायरल

बाजारात बनावट दहा रुपयाचे नाणे आल्यानंतर सरकारने दहाचे नाणे चलनातून बाद केले, अशी अफवा काही वर्षांपासून राज्यात पसरलेली आहे. परिणामी अनेक दुकानदार व व्यापारी ग्राहकांकडून दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत.  विशेषतः ग्रामीण भागात दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास नकार मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सरकारने दहा रुपयाच्या नाण्यावर बंदी घातलेली नाही. […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी 2013 साली खरंच खासदारकी वाचविणारा अध्यादेश फाडला होता का? वाचा सत्य

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या वक्तव्यामुळे गेल्या आठवड्यात मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. लोकसभा सचिवालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, लोकप्रतिनिधी कायद्याचे (1951) कलम 8 आणि संविधानातील कलम 102(1) अंतर्गत राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा कागद फाडणारा एक […]

Continue Reading

विराट कोहली यांच्या आई आणि भावाने धीरेंद्र शास्त्रींची खरंच भेट घेतली का ? वाचा सत्य

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या कुटुंबाने वादग्रस्त बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते, असा दावा करण्यात येत आहे. सोबत पुरावा म्हणून एक व्हिडिओसुद्धा शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती आणि महिला विराट […]

Continue Reading

तुर्कीमध्ये भूकंपानंतर भ्रष्ट बिल्डर्सना सरकारने खुलेआम गोळ्या घातल्या का? वाचा सत्य

तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भीषण भूकंपामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकामागून एक आलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे हजारो इमारती कोसळल्या.  सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैनिक सामान्य लोकांना खुलेआम गोळ्या घालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तुर्कीमध्ये इमारतींमध्ये भूकंपविरोधक साहित्य वापरण्याऐवजी त्याजागी वाहनांचे टायर्स (चाक) वापरणाऱ्या […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य

अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ 16 मार्च रोजी लष्करी हवाई दलाच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए. या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, ते अरुणाचल प्रदेशमधील चित्ता हेलिकॉप्टर दुर्घटनेचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो […]

Continue Reading

बसमध्ये जागा न मिळाल्याने चालकाच्या जागी बसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ स्क्रीप्टेड; वाचा सत्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात 50 टक्के सवलत दिली आहे. या बातमीनंतर महिला मोठ्या संख्येने बसमध्ये प्रवास करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.  अशाच गर्दीमुळे एका महिलेने बसमध्ये जागा न मिळाल्याने वाहन चालकाच्याच जागी जाऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला उठवण्याचा प्रयत्न केल्यावर ती जागा […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेलसाठी दावेदार असे अस्ले तोजे म्हणाले नव्हते, खोटी बातमी व्हायरल

नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नुकतेच भारतात दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले होते.  या पार्श्वभूमीवर अस्ले तोजे यांनी पंधप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्कारसाठी मोठे दावेदार आहेत, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी अशा पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

जुनी पेन्शन योजना परत लागू करावी यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी 14 मार्च रोजी बेमुदत संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “संपावर जातात आणि कर्मचाऱ्यांना काम न करता फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.” दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.  या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

तमिळनाडुमध्ये बिहारी कामगारांना मारहाण म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

तमिळनाडुमध्ये हिंदी भाषिक कामगारांना मारहाण केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उघडपणे हल्ल्यांचे हिंसक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहेत की, या घटना तमिळनाडूमधील असून तेथे उत्तर भारतातून आलेल्या बिहारी कामागारांना असे मारले जात आहे.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नितीन गडकरींच्या नावावर खोटे विधान व्हायरल; वाच सत्य

बहुचर्चित कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रसाने यांचा पराभव केला. यासह गेल्या 28 वर्षांपासून बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपला गमवावी लागली. प्रतिष्ठेची बनलेल्या या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर येत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ लागली. या पोस्टमध्ये गडकरी यांनी कथितरीत्या […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ यांनी पोलिस हवालदाराच्या अंत्यसंस्काराची राख कपाळाला लावली नाही; वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील बसपा आमदार राजू पाल खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी भर दिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. पूर्व खासदार अतीक अहमद यांच्या साथीदारांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये उमेश पाल यांचा सुरक्षारक्षक पोलिस हवालदार संदीप निषाद यांचासुद्धा मृत्यू झाला.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमाने दावा केला जात आहे की,  […]

Continue Reading

इंदूरमधील होळीचा व्हिडिओ कसबा पेठेतील विजयी रवींद्र धंगेकर यांची ही मिरवणूक म्हणून व्हायरल

नुकतेच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. यानंतर हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, आमदार धंगेकर यांनी काढलेल्या जंगी विजयी मिरवणुकीचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) नुकतीच जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, पाण्याचे कारंजे आणि चित्रकारीने नटलेल्या शहरातील देखाव्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.  असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे की, तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणूक: एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणूक आयोगबद्दल खोटे विधान व्हायरल

बहुचर्चित कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रस्सीखेच आज अखेर संपली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबापेठतून विजयी झाले. तत्पूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक वादग्रस्त विधान व्हायरल होऊ लागले.  सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने त्यांना कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल असे सांगितले. […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबला आपला भाऊ म्हटले? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘औरंगजेब’ला त्यांचा भाऊ म्हणून संबोधतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्यावर मुघल सम्राटाचे कौतुक केले म्हणून टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, अर्धवट क्लिप व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबविषयी […]

Continue Reading

गंगामाई साखर कारखान्यातील आगीत 70 कामगारांचा मृत्यू झालेला नाही; वाचा सत्य

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बाभुळगावच्या गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी भीषण आग लागली होती. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाले.  या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत 70 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) याविषयी फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

औरंगाबाद शहराचे नामांतर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रडून खंत व्यक्त केली नाही; जुना व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. अनेक वर्षांपासून रखडलेला हा निर्णय पूर्णत्वास गेल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या.  या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा रडू कोसळताणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, औरंगाबादचे नाव अधिकृतरीत्या छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर “हे फार वाईट घडलं” असे […]

Continue Reading

नरेंद्र मोदी व अमित शाहा निवडून आले तर पाकिस्तान बरबाद, असे केजरीवाल म्हटले नव्हते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे परत निवडणूक जिंकले तर ते दोघे मिळून पाकिस्तानला बरबाद करून टाकतील.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताणळीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. […]

Continue Reading

मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.  या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

नदीत गेल्यामुळे दलित महिलेला मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

नदीकाठी एका महिलेला तीन ते चार पुरुष मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला दलित असून तिने नदीत आंघोळ केल्यामुळे भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला बेदमपणे मारहाण करण्यात आली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

नेपाळने गौतम बुद्धांचे छायाचित्र असलेल्या नोटा जारी केलेल्या नाहीत; बनावट फोटो व्हायरल

नेपाळ सरकारने तेथील शंभर आणि एक हजार रुपयांच्या नोटेवर गौतम बुद्धांचे छायाचित्र प्रकाशित केले, असा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहेत. काय आहे दावा ? व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, नेपाळ सरकारने गौतम बुद्धांचा सन्मान […]

Continue Reading

राहुल गांधीसोबतची व्यक्ती नॅथन अँडरसन नाही; जर्मन नेत्यासोबतचा जुना फोटो व्हायरल 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी रोजी लोकसभेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अडाणी यांचे एकत्रीत फोटो दाखवून त्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर लोकसभेत एकच गदारोळ माजला.  या पर्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी अदानी समुदायाविरोधात गौप्यस्फोट करणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ […]

Continue Reading

उंच कड्यावरून रोज प्रवास करावा लागणारे गाव भारतातील नाही; चीनमधील व्हिडिओ व्हायरल

लहान मुलाला पाठीवर घेऊन धोकादायक डोंगरावर चढणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, भारतातील एका खेड्यात गावकऱ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद झाल्यानंतर आयोग आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत की, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या समर्थनात निर्णय देत जाहीर केले की शिवसेना केवळ उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला फसवे म्हटले का? जुना व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतियक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते “अर्थसंकल्प” अतिशय फसवा असल्याचे म्हणतात. यावरून दावा केला जात आहे की, फडणवीसांनी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

अमेरिकेतील जुना व्हिडिओ तुर्कीत भूकंपामध्ये इमारत कोसळण्याचा म्हणून व्हायरल

तुर्की आणि उत्तर-पश्चिम सिरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरसुद्धा तेथे वारंवार हादरे जाणवत आहेत. भूकंपाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर तेथील भयावह परिस्थितीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.  अशाच एका क्लिपमध्ये दोन इमारती कोसळतानाचा दिसतात. हा व्हिडिओ तुर्की भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

मुस्लिम खेळाडुंनी टिळा न लावल्याच्या व्हिडिओला विनाकारण दिला गेला धार्मिक रंग; वाचा सत्य

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला नागपूर येथे 9 फेब्रुवारी रोजी सुरूवात होत आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ तीन फेब्रुवारीलाचा नागपूर येथे दाखल झाला. या बहुप्रतिक्षेत सामन्याला मात्र एका वेगळ्याच्या वादाची किनार लागली आहे.  भारतीय संघ नागपुरच्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर तेथील स्टाफने त्यांचे टिळा लावून स्वागत केले. याप्रसंगाचा व्हिडिओ शेअर करून अनेकांनी संघातील दोन मुस्लिम […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती निर्मला सीतारमण यांचे वडिल नाहीत; वाचा सत्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, निर्मला सीतारमण यांचा एका ज्येष्ठ व्यक्तीशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ती व्यक्ती सीतारमण यांचे वडिल आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

दुबईमध्ये पठाण चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीचा हा व्हिडिओ नाही, वाचा सत्य

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला झालेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  गर्दीचा असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करून म्हटले जात आहे की, सौदी अरेबियामध्ये पठाण सिनेमा पाहण्यासाठी लोकांची अशी झुंबड उडाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

धीरेंद्र शास्त्री यांनी मिठी मारलेली ही महिला कोण होती? वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य

बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिल्यानंतर सध्या ते खूप चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बागेश्वर बाबा एका महिलेला मिठी मारत आहेत, असा नेटकरी […]

Continue Reading

नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दोन्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये एक गुप्त बैठक झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो तीन वर्षांपूर्वी लोकसभेच्या […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी इंग्लंडमध्ये पोंगल साजरा केला का? कॅनाडातील व्हिडिओ व्हायरल

दक्षिणेकडील राज्यांमध्ये नुकतेच पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील व्हिडिओद्वारे माध्यमातून पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केल जात आहे की, ऋषी सुनक यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केळीच्या पानावर जेवण करीत पोंगल साजरा केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी पगडी बांधण्यास नकार दिला नव्हता; ते सेल्फी देण्यास नाही म्हणाले होते

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १० जानेवारी रोजी अमृतसर येथे पोहचली तेव्हाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी कोणती तरी गोष्ट करण्यास मनाई करताना दिसतात. या सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुवर्ण मंदिरात गेल्यावर मानाची पगडी घासण्यास नकार दिला. असेही म्हटले जात आहे की, राहुल गांधी कॅमेरा समोर […]

Continue Reading

रशियातील जुना व्हिडिओ नेपाळ विमान अपघाताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

नेपाळमध्ये पोखरा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात 68 प्रवशांसह 4 क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर या विमान दुर्घटनेचे कथित व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स आणि फोटो व्हायरल होऊ लागले.  अशाच एका क्लिपमध्ये विमान कोसळताना दिसते आणि सोबत दावा केला जात आहे की, हे दृश्य नेपाळ विमान अपघाताचे आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना […]

Continue Reading

ओवैसी कृष्ण भजन गातानाचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

‘एआयएमआयएम’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा कृष्ण भजन गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यासपीठावरून ते ‘अरे द्वारपालो’ गाताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.   पडताळणीअंती कळले की, हा व्हिडिओ बनावट आहे. ओवैसी यांच्या भाषणाला एडिट करून त्यात गाणे लावण्यात आले आहे.  काय आहे दावा […]

Continue Reading

नांदेडमध्ये दहशतवादी पकडले का? रेल्वे स्टेशनवरील मॉक ड्रिलचा व्हिडिओ व्हायरल

दहशतवाद्यांकडून गेल्या वर्षी नांदेडला येणारा मोठा शस्त्रास्त्रसाठी हरियाणा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा शहरात दहशतवादी पकडल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. रेल्वेस्थानकावरून काही लोकांना अटक करून घेऊन जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नांदेड येथून पोलिसांनी दहशतवद्यांना ताब्यात घेतले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

फाटक्या कपड्यातील विद्यार्थ्याचा फोटो खरंच भारतातील आहे का ? वाचा सत्य

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, पोषक आहार, पुस्तके आणि मोफत गणवेश अशा विविध सवलती उपलब्ध करूनही त्या सर्व घटकांपर्यंत पोहचत नसल्याचा तक्रार नेहमीच केली जाते. याचेच उदाहरण म्हणून शाळेच्या बाकावर फाटक्या कपड्यांमध्ये बसून शिकणाऱ्या एका मुलाचा फोटो शेअर होत आहे. हा फोटो भारतातील सरकारी शाळांची दयनीय स्थिती दर्शवित असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

स्टेजवर उभे न राहू दिल्याने दलित बॉडीबिल्डर पुरस्काराला लाथ मारून निघून गेला का? वाचा सत्य

सोशल मीडियावर सध्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक विजेता पुरस्काराला लाथ मारून कार्यक्रमातून निघून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा विजेता दलित असल्यामुळे त्याला स्टेजवर कोपऱ्यात उभे राहण्यासा सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने पुरस्कार फेकून निषेध व्यक्त केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला नाही; जुना व्हिडिओ व्हायरल 

तब्बल एका वर्षांच्या विश्रामानंतर कोरोना विषाणुचे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या नव्या सबव्हेरिएंटने हाहाकार माजवलेला आहे. भारत सरकारदेखील त्यामुळे सतर्क झाले असून, पुन्हा एकदा कोविड नियमावली जारी करण्याचा विचार केला जात आहे.  अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लॉकडॉऊनची घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

नटराज कंपनी घरबसल्या 30 हजार रुपये पगाराची नोकरी देत नाही; फसव्या जाहिराती व्हायरल

सोशल मीडियावर सध्या घरी बसून हजारो रुपये कमविण्याची संधी देणाऱ्या जाहिराती व्हायरल होत आहेत. यात दावा केला जात आहे की, नटराज कंपनीद्वारे घरी बसून पेन/पेन्सिल पॅकिंग करण्याचे काम देण्यात येत आहे. यासाठी आगाऊ 15 हजार आणि मासिक 30 हजार रुपये पगार मिळणार, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

दोन महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही; तो तर उत्तर प्रदेशमधील आहे

न्यायालय परिसरात महिला वकिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ही घटना महाराष्ट्रातील असून, महिला न्यायाधीशाने सदरील महिला वकिलाच्या होणाऱ्या पतीला जामीन नाकारला म्हणून या दोघींमध्ये हाणामारी झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ […]

Continue Reading

लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला मारणारा हा तरुण मुस्लिम नाही; वाचा सत्य

श्रद्धाची वालकरच्या निर्मम हत्या प्रकरणानंतर हिंदू–मुस्लिम प्रेमसंबंधांना विरोध आणि लव्ह जिहादच्या आरोपांमध्ये वाढ झाल्याची दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एका तरुण जोडप्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशला मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, सदर हिंदू तरूणी लग्नाला नकार देत असल्यामुळे  तिच्या मुस्लिम प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. या व्हिडिओला ‘लव्ह जिहाद’चा रंग […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमधील मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी असणार का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील मदरशांचे शैक्षणिक दिनदर्शिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मदरशांमध्ये आता शुक्रवारऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उतर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली आहे.  आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

COVID-19: कोविडचा XBB सबव्हेरिएंट पाचपट जास्त घातक आहे का? वाचा सत्य

सुमारे एक वर्षाच्या विश्रामानंतर कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा बीएफ-7 सब-व्हेरिएंट तर सिंगापुरमध्ये XBB सब-व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला आहे. भारतातही कोरोना लाटेचा संभाव्य धोका ओळखता खबरदारीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर या नव्या व्हेरिएंटविषयी एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा करण्यात येत आहे की, XBB सब-व्हेरिएंट आधीच्या […]

Continue Reading

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  या मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची ‘नॅनो’ मोर्चा अशी हेटाळणी केली.  फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर […]

Continue Reading

एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हायरल क्लिपमध्ये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मागे ढकलताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर […]

Continue Reading

थायलंडमधील हायवेचा फोटो समृद्धी महामार्गाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये त्याचे उद्घाटन केले. तत्पूर्वी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी या लोकार्पण सोहळ्याचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये भाजप नेत्यांसह महामार्गाचा एक विहंगम फोटोसुद्धा वापरण्यात आला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून तो फोटो खरंच समृद्धी […]

Continue Reading

आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत […]

Continue Reading

व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नाही; वाचा सत्य

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा 4 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये दाखल झाली. तेथील जलवार जिल्ह्यातील चावली येथे मोठ्या प्रमाणात लोक यात्रेत सामील झाले. यानंतर सोशल मीडियावर गर्दीचे काही फोटो व्हायरल होऊ लागले. दावा केला जात आहे की, व्हायरल होत असलेले फोटो भारत जोडो यात्रेला जमलेल्या विराट गर्दीचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

भाजप नेते परेश रावल यांचा माफी मागतानाचा व्हायरल व्हिडिओ पाच वर्षे जुना; वाचा सत्य

गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजप माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी 29 नोव्हेंबर रोजी वलसाड जिल्ह्यात एका रॅलीमध्ये भाषण करताना बंगाल विषयक वादग्रस्त विधान केले होते.  “गॅस सिलेंडरचे काय करणार? बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का?” असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. परेश रावल यांनी शब्दांचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत माफीसुद्धा […]

Continue Reading

स्वतःच्याच देशाविरोधात वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीला इस्रायलच्या लष्कराने गोळी मारून अपंग केले का?

इस्रायल हा देश कडव्या राष्ट्रप्रेमासाठी प्रसिद्ध आहे. याचे उदाहरण म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका जखमी महिलेचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, इस्रायलमधील एका अभिनेत्रीने इस्रायलविरोधी वक्तव्य केल्यामुळे तेथील लष्कराने तिला गोळी मारून कायमचे अपंग केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  आमच्या […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

सौदी अरेबियाच्या फुटबॉल खेळाडुंना 10 कोटींची ‘रोल्स रॉईस’ मिळाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वांना चकित करत सौदी अरेबिया संघाने बलाढ्या अशा अर्जेंटिना संघाला 2-1 ने पराभूत केले. त्यामुळे लियोनल मेस्सीच्या संघावर मात करण्याची कामगिरी करणाऱ्या या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  अशातच सगळीकडे चर्चा पसरली की, सौदी अरेबियाच्या विजयामुळे आनंदून गेलेले राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडुला दहा कोटी रुपयांची आलिशान ‘रोल्स […]

Continue Reading

चार वर्षांपूर्वीचा जुना फोटो शाहरुख खान औरंगाबादमध्ये दाखल झाला म्हणून व्हायरल

अभिनेता शाहरुख खान चार वर्षांच्या खंडानंतर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पुढील वर्षी शाहरुखचे पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पैकी ‘जवान’ सिनेमाचे औरंगाबादजवळील बिडकीन येथे चित्रिकरण सुरू आहे.  सोशल मीडियावर बिडकीन येथे शाहरुख खानच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. काही उत्साही चाहत्यांनी तर शाहरुख तेथे पोहचला असा फोटोसुद्धा शेअर केला […]

Continue Reading

फिफा विश्वचषकात प्रेक्षकांनी मैदानावर आग लावली का? जुना व्हिडिओ व्हायरल

वादाच्या भोवऱ्यात सापडेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेविषयी विविध दावे केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये मैदानावरील आगीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पाडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे कळले आहे. हा व्हिडिओ […]

Continue Reading

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे पोस्टर झळकले का? वाचा सत्य

कतारमध्ये सुरू असलेला फिफा विश्वचषक 2022 फुटबॉलऐवजी इतर गोष्टींसाठीच जास्त चर्चेत आहे. स्टेडियममध्ये कोणत्या वस्तू आणू शकता आणि कोणते कपडे घालू शकता यावरून गोंधळ सुरू आहे. या व्यतिरिक्त फुटबॉल सामन्यांदरम्यान राजकीय विधान करण्याचाही ट्रेंड दिसत आहे.  सोशल मीडियावर सध्या एक फुटबॉल प्रेक्षक भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर हातात घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल […]

Continue Reading

हा व्हिडिओ इंडोनेशियामधील ज्वालामुखी उद्रेकाचा नाही; ती कॉम्प्युटर ग्राफिक्सने तयार केलेली क्लिप आहे

इंडोनेशियामध्ये 21 नोव्हेंबर रोजी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 268 लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ज्वालामुखी उद्रेकानंतर आलेल्या कथित भूकंपाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इंडोनेशियामधील सुमात्रा येथे पाण्याच्या आत झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाचा आहे. यात पाण्याच्या आतून बाहेर पडणारा ज्वालामुखी किनाऱ्यावर येताना दिसतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

मतदारांचे पाया पडणारे हे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत; दिल्लीतील जुना फोटो व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी प्रचाराची रणधुमाळी जोर पकडत आहे. सर्वच पक्षांचे नेते सभा आणि रॅली काढण्यात व्यस्त असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरोघरी जाऊनही ते प्रचार करीत आहेत.  अशाच एका व्हायरल फोटोमध्ये एक नेता महिलेच्या पाया पडत आहे. हा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ते गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू […]

Continue Reading

श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याचे समर्थन करणारा ‘तो’ तरुण मुस्लिम नाही; त्याचे नाव विकास कुमार

वसईतील श्रद्धा वालकर (26) या तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावालाने निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण गाजत असतानाच या खूनप्रकरणी आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण स्वतःचे नाव राशीद खान असे सांगतो. हा व्हिडिओ सांप्रदायिक दाव्यांसह शेअर केला जात आहे की, मुस्लिम युवक श्रद्धाच्या मारेकऱ्याची बाजू घेत आहे. […]

Continue Reading

RBI ला न विचारताच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, असे रघुराम राजन म्हणाले का? वाचा सत्य

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेशी प्रदीर्घ सल्लामसलत करूनच नोटंबदीचा निर्णय घेण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर आरबीआय माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे केंद्राला खोटे ठरवणारे एक कथित विधान व्हायरल होत आहे. यात रघुराम राजन कथितरीत्या म्हणतात की, नोटबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा मी गव्हर्नर होतो आणि आरबीआयला विचारात न घेताच […]

Continue Reading

इंडोनेशिया जी-20 परिषदेत महिलेने ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर दाखवले होते का? वाचा सत्य

नुकतेच इंडोनेशियामध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यात आल्याचा दावा करणारा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला ‘गो बॅक मोदी’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेऊन उभी दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा फोटो बनावट आढळला. […]

Continue Reading

टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य

‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’च्या अध्यक्षा प्रा.रंजना प्रविण देशमुख यांच्या नावाने टोलविषयक एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टोल नाक्यावर शुल्क भरल्यानंतर प्रवासात जर वाहन खराब किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास वाहनधारकांना मोफत मदत करण्याची टोल कंपनीची जबाबदारी असते.  एवढेच नाही तर इंधन संपल्यास टोलपावतीवरील हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून 5 ते 10 लिटर […]

Continue Reading

आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य

सोन्याचे विमान, सोन्याचा पलंग, नोटांचा ढीग, हिऱ्यांनी मढवलेला जिना आणि मातीच्या कबरीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहेत की, इतक्या अफाट संपत्तीचा मालक असलेला कुवैतमधील अब्जाधीश शेवटी रिकाम्या हातानेच जग सोडून गेला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, इंटरनेटवरील एकमेकांशी काहीही […]

Continue Reading

FAKE NEWS: मुस्लिमांनी खरंच कोर्टात मान्य केले की थुंकल्याशिवाय हलाल पूर्ण होत नाही?

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदयाने उच्च न्यायालयात मान्य केले की, अन्नात थुंकल्याशिवाय ते अन्न हलाल प्रमाणित होत नाही. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले की, तमिळनाडू उच्च न्यायालयात एका केसच्या सुनवाईत अशी कबुली देण्यात आली. या पोस्टच्या माध्यमातून मुस्लिम हॉटेलविक्रेत्यांवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर होती. आम आदमी पार्टीचे गुजरात राज्यप्रमुख गोपाल इटालिया यांनीसुद्धा सुरत येथून अर्ज दाखल केला. नामांकन भरण्याआधी त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती.  विशाल गर्दीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इटालिया यांच्या नामांकन रॅलीमध्ये इतक्या […]

Continue Reading

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये मुंडे यांचा फोटो घेऊन चालले. या फोटोवरून […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?

महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

गुजरातच्या भाजप आमदाराने मोदींवर दंगली करण्याचा आरोप केला का? वाचा या व्हिडिओचे सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमधील भाजप आमदारानेच मोदींवर खोट्या मुस्लिमांकडून दंगली घडवून आणतात असा आरोप केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.   आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला आहे. हा […]

Continue Reading

हे अरुणाचल प्रदेशमधील पंचतारांकित इटानगर विमानतळ नाही; वाचा या व्हिडिओचे सत्य

एका आकर्षक बनावटीच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे सुरू होणारे नवे विमानतळ आहे. विशेष म्हणजे या विमानतळासाठी पारंपारिक बांबूचा वापर करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

दक्षिण कोरियातील फोटो केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारसभांनी जोर धरला आहे. नुकतेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची राजकोटमध्ये सभा झाली. यानंतर विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होऊ लागला असून त्यासोबत दावा केला जात आहे की, तो केजरीवाल यांच्या राजकोट येथील सभेला जमलेल्या गर्दीचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

चीनमधील ‘ड्रॅगन परेड’चा व्हिडिओ केरळमधील नौका दीपोत्सवाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

दिव्यांनी उजाळलेल्या नौकांचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, केरळमध्ये नुकतेच 240 होड्यांवर अशी रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ केरळमधील नाही.  काय आहे दावा? दिव्यांच्या रोषणाईने नटलेल्या होड्यांचा हा व्हिडिओ […]

Continue Reading

मुस्लिम विक्रेता हिंदू ग्राहकांच्या ज्युसमध्ये वंध्यत्वाच्या गोळ्या टाकायचा का ? वाचा सत्य

एका मुस्लिम ज्युस विक्रेत्याला धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो हिंदू ग्राहकांना वंध्यत्वयुक्त गोळ्या टाकून ज्युस विकत होता. विक्रेत्याकडून कथितरीत्या विशिष्ट रसायनदेखील आढळल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. सोबत म्हटले जात आहे की, लोकांनी त्याला रंगेहाथ पकडल्यावर त्याने कबुल केले की, हिंदुंची लोकसंख्या कमी करण्यासाठी तो असे करायचा. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीन नोव्हेंबर रोजी एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर सोशल मीडियवार इम्रान खान यांचे जखमी फोटो शेअर करण्यात येऊ लागले.  दावा करण्यात येत आहे की, इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आणि सुमित्रा महाजन येणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, ही निव्वळ […]

Continue Reading

जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी दिवाळीला हातात फटाके फोडले का? चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

IAS टॉपर आणि सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी हातात फटाके फोडतानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिवाऴीत हातातच रॉकेट पेटवत असताना त्यांना पोळले. या व्हिडिओला खरे मानून जबाबदार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने हातात फाटाके फोडले म्हणून यूजर्स टीना डाबी यांच्यावर टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

मुस्लिम युवकांनी कानपुर पोलिसांवर दगडफेक केली नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

कानपूर शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कानपूर पोलिस गस्त घालत असताना दोन युवक इमारतीवरुन त्यांच्यावर दगडफेक करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे, या व्हिडिओमधील युवक मुस्लिम […]

Continue Reading

सुधा मुर्ती मुंबई-बंगळुरू रेल्वेत विनातिकिट प्रवास करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य

प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्या बालपणाविषयक एक करुणादायी मेसेज व्हायरल होत आहे. लहानपणी मुंबई-बंगळुरू रेल्वेतून त्या विनातिकिट प्रवास करत असताना एका मायाळू प्राध्यापिकेने त्यांची मदत करत त्यांना शिकण्यासाठी मदत केली, असे या व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताविषयी केलेले एक कथित विधान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, सुनक यांच्या नावाने खोटे विधान […]

Continue Reading

केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगत आहे.  याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये अरविंद केजारीवाल यांच्या रॅलीत त्यांचे समर्थक नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून प्रचार करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

एलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवल्याचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य

एलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटरची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी येताच ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी केली. यानंतर सोशल मीडियावर वावड्या उठू लागल्या की, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटवली. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रक काढून स्वतः माहिती दिली, असा देखील दावा करण्यात येत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी हिंदु पद्धतीने पंतप्रधान निवासात प्रवेश केल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य 

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नीसह पंतप्रधान निवासस्थानात हिंदू पद्धतीने पूजा करून गृहप्रवेश केला, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक व त्यांची पत्नी अक्षता यांच्यासोबत भगवे कपडे परिधान धार्मिक लोक दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी दीप प्रज्वलन करून पंतप्रधान कार्यालयात प्रवेश केला का? वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी दारात दीप प्रज्वलन केले, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुनक दारात दिवे ठेवताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर […]

Continue Reading

बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगात टाका असे अरविंद केजरीवाल म्हणाले का?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी गुजरातमधील एका कार्यक्रमात बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळल्यामुळे ‘आप’ पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  यानंतर आता ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये ते आरोपींना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य करतात. दावा केला जात आहे की, केजरीवाल […]

Continue Reading

‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपची परंपरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच पक्षावर टीका करताना भाजप ‘तोडा आणि राज्य करा’ हे धोरण घेऊन चालणारा पक्ष असल्याचे म्हटले, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये काँग्रेसची प्रशंसा करताना ते म्हणतात की ‘जोडा आणि विकास करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा युवकांना होणारी मारहाण पाहतानाचा व्हिडिओ खोटा; वाचा सत्य

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते कार्यालयात बसून टीव्हीवर बेरोजगार युवकांना पोलिसांनी केलेली मारहाण पाहताना दिसतात. एवढेच नाही तर, हे पाहून ते हसतदेखील आहेत.  हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री चव्हाण यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमध्ये PET परीक्षेसाठी विद्यार्थी रेल्वेला लटकून गेले का? जुना व्हिडिओ व्हायरल

नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. सुमारे 37 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेला बाहेरून लटकून जाणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील केंद्रावर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून परीक्षा देण्यासाठी जावे लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

 ‘आप’चे नेते गोपाल ईटालिया यांचा जेलमधील जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविरोधात अपशब्द वापरल्यामुळे आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच दिल्लीत महिला आयोगाच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.  यानंतर त्यांच्या जेलमधील एक फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, दिल्ली पोलिसांनी इटालिया यांना अटक केल्यानंतरचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो […]

Continue Reading

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील विराट गर्दीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे सत्य काय?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे. विविध राज्यातून जात असेलेल्या या यात्रेबद्दल सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत.  याच संदर्भात विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांच्या कर्नाटकमधील सभेला जमलेल्या गर्दीचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रिया पाहून नरेंद्र मोदी मझारवर चादर अर्पण करायला गेले होते का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ एका मझारवर चादर अर्पण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या लोकप्रियतेला पाहून मोदींनी मशिदींमध्ये जाणे सुरू केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली. आमच्या पडताळणीत […]

Continue Reading

अरविंद केजरीवाल यांनी उलटा धनुष्यबाण पकडला नव्हता; बनावट फोटो होतोय व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दसरा मेळाव्यातील एक फोटो टिंगलटवाळीचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत केजरीवाल यांनी उलटा धुनष्यबाण पकडल्याचे दिसते. या फोटोवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.    फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा फोटो एडिट केलेला आहे.   […]

Continue Reading

नरेंद्र मोदींनी एकाच रेल्वेचे दोन वेळेस उद्घाटन केले नाही; चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका रेल्वेचे उद्धघाटनदेखील केले. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मोदी यांनी 2019 मध्ये ज्या रेल्वेचे उद्घाटन केले होते त्याच रेल्वेचे दोन वर्षांनी पुन्हा उद्घाटन केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून या दाव्याची सत्यता विचारली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

दिवाळीत चीनचे विषारी फटाके न खरेदी करण्याचे गृहमंत्रालयाने आवाहन केलेले नाही

एका व्हायरल मेसेजमध्ये गृह मंत्रालयाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून चीनने भारतात आरोग्याला धोकादायक असणारे फटाके पाठविले आहेत. दमा आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतील असे विषारी वायू या फटक्यांमध्ये असल्यामुळे ते न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

FAKE: सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तो फोटो खोटा; वाचा सत्य

शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची कोण बसले यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा कथित फोटो व्हायरल झाला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या फोटोवरून श्रीकांत शिंदे “सुपर सीएम” झाल्याची जाहीर टीका करण्यात आली. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीच्या खासदार […]

Continue Reading

या फोटोत राहुल गांधींसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी मुलगी नाही; वाचा सत्य

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर विविध दाव्यासह व्हायरल होत आहेत. अशाच एका फोटोत राहुल गांधी यांच्यासोबत एक मुलगी दिसत आहे.  युजर्स दावा करत आहेत की, या मुलीचे नाव “अमूल्या लियोना” असून सीएए आंदोलनादरम्यान तिने हैदराबादमध्ये भर स्टेजवरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. अशा मुलीसोबत राहुल […]

Continue Reading

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना राजस्थानमध्ये झाली; गुजरातमध्ये नाही

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. असाच एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये या पुतळ्याची विटंबना झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा […]

Continue Reading

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे 87 टक्के भारतीयांना कॅन्सर? WHO च्या नावाने फेक बातमी व्हायरल

पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे येत्या दोन वर्षांत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, अशी बातमी व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा इशारा दिल्याचे बातमीच्या कात्रणामध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असा कोणताही […]

Continue Reading

सांगलीमध्ये कथित ‘बच्चा चोर’ साधूंवरील हल्ल्याचा म्हणून मध्य प्रदेशमधील व्हिडिओ व्हायरल

सांगली जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात ही घटना घडली. यानंतर 14 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर साधूंना मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.  अशाच एका व्हिडिओमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्या काही जणांना काठ्यांनी मारले जात आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सांगली […]

Continue Reading

Fake News: केवळ मोदीच देशाचा विकास करू शकतात अशी बीबीसीचे पत्रकार मार्क टुली यांनी स्तुती केली का?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात काँग्रेस ने उभे केलेल्या सर्व विषारी सापांना संपवण्याचे काम सुरू केले आहे. या कामी हिंदूंनी त्यांना साथ द्यावी”, असे बीबीसीचे पत्रकार मार्ट टुली यांनी कथितरीत्या एका लेखात म्हटल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

नेपाळच्या संसदेत नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, नेपाळच्या संसदेत तेथील खासदाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. सोबत एका नेत्याचा भाषण करतानाचा व्हिडिओ दिलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. हा व्हिडिओ नेपाळचा नसून, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेतील  आहे.  […]

Continue Reading

‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ असा व्हिडिओ डाऊलोड केल्यावर फोन फॉरमॅट होतो का? वाचा सत्य

‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ नावाचा व्हिडिओ स्वीकारू नका कारण त्यात मोबाईल फॉरमॅट करणारा व्हायरस आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ 9266600223 या क्रमांकावरून येत असल्याचे म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. असा कोणताही व्हायरस […]

Continue Reading

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नोकर भरतीचा फेक मेसेज व्हायरल; वाचा सत्य 

मुंबई अग्निशमन दलामध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकर भरती सुरू झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई अग्निशमन दलामध्ये 774 अग्निशामकांची सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटल आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई अग्निशमन दलामध्ये […]

Continue Reading

एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला का? जुना व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यानंतर सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितल्याची बातमी व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आपल्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत फडणवीसांना राजीनामा देण्याची मागणी करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने नोकराला मारहाण केली का? वाचा या व्हिडिओमागील सत्य

नोकराने पगार मागितला म्हणून उत्तर प्रदेशमधील जौनपुरचे भाजप आमदार विपुल दुबे यांनी नोकराला बेदम मारहाण केली, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला काठीने मारहाण केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, मारहाण करणारा ही व्यक्ती जौनपुरचे भाजप […]

Continue Reading

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात पत्रकार परिषद घेतली का? वाचा सत्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की. व्हायरल व्हिडिओ जुना असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात […]

Continue Reading

रिक्षाचालकाचा तो व्हायरल फोटो एकनाथ शिंदे यांचा नाही; वाचा सत्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकीर्द रिक्षाचालक म्हणून सुरू झाली होती. ठाण्यातून रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास चर्चेचा विषय आहे. अशातच एका रिक्षाचालकाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, हा 25 वर्षांपूर्वीचा एकनाथ शिंदे यांचा रिक्षा चालवतानाचा दुर्मिळ फोटो आहे.    फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष करून अपमान केला का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे निरोप समारंभात दुर्लक्ष करून त्यांचा अपमान केला, असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रामनाथ कोविंद हाथ जोडून सर्वांना अभिवादन करताना दिसतात. त्याचवेळी नरेंद्र मोदी त्यांच्याकडे न पाहता छायाचित्रकारांकडे पाहत आहेत, असे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

वेळ पडली तर शिवसेना राष्ट्रवादीच्या निशाणीवर निवडणूक लढवणार, असे संजय राऊत म्हणाले नाही

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट तयार केल्याने शिवसेना नेमकी कोणाची यावरून संग्राम सुरू आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक निशाणी वापरण्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “वेळ पडली तर शिवसेना पुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर लढवणार”, असे संजय राऊत म्हणाले. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राचा […]

Continue Reading

ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर तर ओसंडून वाहणाऱ्या नद्या, वस्त्यांमध्ये साचलेले पाणी, दरड कोसळण्याचे व्हिडिओंचा पूर आलेला आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये महिला वाहून गेल्याची घटना शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील अक्सा बीच (Aksa Beach) येथे घडलेल्या घटनेचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

अक्कलकुवा-अंकलेश्वर रोडवरील पूल पूरात वाहून जातानाचा हा व्हिडिओ नाही; तो तर जम्मुचा

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच एक पूल कोसळतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अक्कलकुवा आणि अंकलेश्वर रोडवरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

पूरात जीप वाहून जाण्याचा ‘तो’ व्हिडिओ नांदेडचा नसून, पाकिस्तानातील आहे; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले असून आतापर्यंत पूरबळींची संख्या 89 झालेली आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक नद्या-नाले, तलाव भरून वाहत असून लाखो लोकांना पूराचा फटका बसलेला आहे.  अशाच एके ठिकाणच्या पूराच्या पाण्यात जीप वाहून जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

शिंदे सरकार येताच अडाणी ग्रुपने मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला नेले का? वाचा सत्य

शिवसेनेतून बंड करून भाजपच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. त्यातच एक भर म्हणून आता पोस्ट फिरत आहे की, अडाणी ग्रुपने मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला शिफ्ट केले. सोबत पुरावा म्हणून साम टीव्हीच्या बातमीचा व्हिडिओ फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीचा जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल; वाच सत्य

शिवसेनेतून बंड करून राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. सोबत पुरावा म्हणून शिंदे आणि पवार यांचा एकत्र फोटोदेखील शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

मुंबईत तुंबलेले पाणी आणि उसळणाऱ्या लाटांचे जुने व्हिडिओ यंदाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य

मुंबई शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा गुरुवारी (7 जुलै) सकाळी जोर वाढला. याचा परिणाम म्हणून लोकल सेवा विलंबाने धावत असल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या रस्त्यावर साचलेले पाणी, पाण्यातून धावणारी लोकल रेल्वे, आणि गेटवे ऑफ इंडियावरील लाटांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे तीन्ही व्हिडिओ सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे […]

Continue Reading

पाकिस्तानमध्ये पुलावर घसरून पडणाऱ्या गाड्यांचा व्हिडिओ पुण्यातील अपघात म्हणून व्हायरल

पुलावर एका मागून एक दुचाकी घसरून पडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जण हा व्हिडिओ पुण्यातील सांगत आहेत, तर काहींनी तो मुंबईचा म्हटलेला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ना पुण्याचा आहे, ना मुंबईचा. तो तर पाकिस्तानातील असल्याचे समोर […]

Continue Reading

झी न्यूजची फेक न्यूजः राहुल गांधी यांनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना माफ करण्याची मागणी केली नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर हत्याकांडातील आरोपींना “लहान मुलं” म्हणून माफ करण्याची मागणी केली, अशी खोटी बातमी व्हायरल होत आहे. राहुल गांधी पत्रकारांशी बोलतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कन्हैयालाल यांची हत्या करणाऱ्यांना त्यांनी “छोटे बच्चे” म्हटले आणि त्यांना माफ करा असे म्हटले. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर […]

Continue Reading

दरड कोसळण्याचा तो व्हिडिओ ना परशुराम घाटाचा, ना अनमोड घाटाचा, ना राजापुरचा; तो तर आसामचा व्हिडिओ

पावसाळा सुरू होताच पूर आणि दरड कोसळण्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागतात. असाच व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोकणातील राजापुरमधील रानतळे येथे दरड कोसळण्याचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ राजापूर येथील नाही. तो […]

Continue Reading

फेक न्यूजः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला का?

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गातील जालना-नांदेड दरम्यानचा भाग रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून एकनाथ शिंदेंनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले होते; मुघल सम्राट औरंगाबजला नाही

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते “औरंगजेब देशासाठी शहीद” झाला असे म्हणतात. या क्लिपसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी कळाले की, हा […]

Continue Reading

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओ कोकणातील कशेडी घाटाचा नाही; तो तर केरळमधील भूयारीमार्ग आहे

डोंगरमाथ्यामधून कोरून तयार केलेल्या नव्या बोगद्याचा एक व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोकणातील कशेडी घाटातील असल्याचा दावा केला जात आहे. कोकणातील सर्वात मोठा बोगदा असे या व्हिडिओसोबत म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून, केरळमध्ये गेल्या […]

Continue Reading

नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत का? वाचा सत्य

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांमध्ये प्रथमच असा बहुमान भारतीय पंतप्रधानांना मिळाल्याचे मेसेजमध्ये म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य […]

Continue Reading

वाफेच्या इंजिनप्रमाणे हवेत पराग कण उडवणारे फुल खरे आहे की VFX व्हिडिओ? वाचा सत्य

सोशल मीडियावर एका जादुई फुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहेत की, तमिळनाडुच्या जंगलामध्ये उगवणारे ऊदई पवई नावाचे हे फुल वाफेच्या इंजनप्रमाणे हवेत पराग कण सोडते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हे काही खरे फुल नसून, व्हीएफएक्स व्हिडिओ […]

Continue Reading

VIDEO: मलेशियातील शिवलिंगाचा व्हिडिओ तमिळनाडूमधील व्हायरल; वाचा सत्य

जंगलामध्ये स्थित एका विशाल शिवलिंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हे तमिळनाडूमधील ओशिवलिंगम आहे. तेथे 365 दिवस महादेवाच्या पिंडीवर पाऊस पडतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडुमधील नाही.  दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाचा व्हिडिओ शेअर करून […]

Continue Reading

रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली का? वाचा सत्य

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची बँक ऑफ इंग्लंडच्या गव्‍‌र्हनरपदी नियुक्ती झाली, अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टला खरे मानून यूजर्स राजन यांचे अभिनंदन तर, भारत सरकारवर टीका करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

आंध्रप्रदेशातील स्वामी समर्थांच्या मूर्तीचा फोटो मुंबईतील मठाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

सोशल मीडियावर स्वामी समर्थ आणि त्यांच्या पादुकांचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा जात आहे की, मुंबईतील महालक्ष्मी परिसरातल्या श्री स्वामी समर्थ मठातील हा अतिशय जुना व दुर्मिळ फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती कळाले की, हा फोटो मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील मठाचा […]

Continue Reading

नदीकिनारी मृतदेहाच्या विटंबनेचा हा फोटो योगी आदित्यानाथ यांच्या कार्यकाळातील नाही; वाचा सत्य 

मशिदींवरील भोग्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. आधी मशिदींवरील आणि  त्यानंतर इतर प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 11 हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले.  या कारवाईचे स्वागत करताना राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती करत ट्विट केले होते की, “उत्तर […]

Continue Reading

रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय आल्याने बंगालमध्ये स्टेशनची तोडफोड? या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच…

मशिदीवरील भोंगे, सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण, आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा असे एक ना अनेक मुद्दे तापत असताना रेल्वे स्टेशनच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जातोय की, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने तेथील मुस्लिमांनी स्टेशनची अशी तोडफोड केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

अब्दुल सत्तार यांचा ‘अर्वाच्य शिवीगाळ’ करतानाचा 5 वर्षे जुना व्हिडियो व्हायरल; वाचा सत्य

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार एका जणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सत्तार कथितरीत्या एका व्यक्तीला धमकावत असताना हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचे ऐकू येते. सध्या सुरू असलेल्या ‘अझान विरुद्ध हनुमान चालिसा’ वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करून […]

Continue Reading

FAKE NEWS: राज ठाकरेंच्या भाषणामुळे फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज पठणास विरोध सुरू झाला का?

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज अदा करण्याविरुद्धच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर नमाज अदा करणे सुरू असताना फ्रेंच नागरिक त्यांचे राष्ट्रगीत गात आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी हा व्हिडिओ शेअर करून राज ठाकरेंच्या भूमिकेचा फ्रान्समध्ये परिणाम झाल्याचा दावा केला.  फॅक्ट […]

Continue Reading

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या डॉक्टरचा व्हिडिओ मुंबईचा नाही; वाचा सत्य

एका हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेली महिला डॉक्टर जमिनीवर कोसळल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही घटना नुकतीच मुंबईतील विनायक हॉस्पिटलमध्ये घडली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता यांचाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

कोल्हापुरतील विजयी काँग्रेस उमेदवारीची ही मिरवणूक नाही; ही तर इंदूरमधील होळी

नुकतेच कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला हरवून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजारावर मताधिक्क्याने विजय मिळवला. यानंतर हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या उमेदरावारीच अशी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

केईएम हॉस्पिटलमध्ये काही तासांत पक्षाघाताच्या रुग्णाला बरे करणारी मशीन? जुना मेसेज पुन्हा व्हायरल

मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये फक्त काही तासांमध्ये पक्षाघाताच्या रुग्णाला पूर्णपणे बरे करणारी मशीन आली, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. जगभरात काही निवडक ठिकाणीच अशी मशीन उपलब्ध असून, केईएम हॉस्पिटलमध्ये तिचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

मॉक ड्रिलचा व्हिडिओ अहमदनगरमध्ये बँक चोरांना रंगेहाथ पकडतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

बँकेतून पळून जाणाऱ्या तरुणांना पोलिस दबा धरून पकडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, अहमदनगर येथील बँकेत दरोडा टाकणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना पोलिसांनी असे रंगेहाथ पकडले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. ही केवळ […]

Continue Reading

FAKE NEWS: मुलींना नमाज पठण करायला लावणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांना चोप दिला का? 

भगव्या शाल असणारे कार्यकर्ते एका व्यक्तीला सुनावत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, महाराष्ट्रातील एका ख्रिश्चन शाळेत मुस्लिम शिक्षकाने विद्यार्थिनींना जबरदस्तीने नमाज पठण करायला लावल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याच शिक्षकाला त्या मुलींना भगवी ओढणी घालायला लावली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

चहाच्या मळ्याचा हा नयनरम्य फोटो भारतातील नाही; ही तर चीनमधील चहाची शेती

चहाच्या मळ्याचा एक सुंदर फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, हा फोटो भारतातील आहे. या फोटोद्वारे म्हटले जात आहे की, अशा सौंदर्यपूर्ण शेतीमुळेच भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो भारतातील नाही. हा तर […]

Continue Reading

औरंगाबादमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या खोट्या पोस्ट व्हायरल; उत्तराखंडमधील खून चुकीच्या माहितीसह व्हायरल 

सूटकेसमधील मृतदेहाचे फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, औरंगाबादमध्ये मुस्लिम युवकाने एका हिंदू मुलीला फसवून लग्न करून तिची हत्या केली. व्हायरल पोस्टमध्ये मुलीचे नाव स्नेहा नागरे आणि आरोपीचे नाव समीर बेग म्हटलेले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

पुण्यातील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे आरोपी मुस्लिम नव्हते; वाचा सत्य

गेल्या आठवड्यात पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात एका 11 वर्षीय पीडितेवर तिचे वडील, 14 वर्षीय भाऊ, आजोबा आणि चुलत मामाने अत्याचार केला.  या घटनेबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, नात्याला काळीमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मुस्लिम कुटुंबामध्ये घडला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी  […]

Continue Reading

‘हिंदूचे फालतू सण बंद करा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले का? अर्धवट व्हिडिओद्वारे फेक न्यूज व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मीडियाशी बोलतानाची 30 सेकंदाची क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिंदू सण आणि फटाक्यांविषयी बोलत आहेत. हा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हिंदु सणांविरोधात अपशब्द काढत ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]

Continue Reading

सोनिया गांधी यांच्याकडे ‘भारताला ख्रिश्चन राष्ट्र’ करण्याचे पुस्तक दाखवणारा तो फोटो फेक; वाचा सत्य

सोनिया गांधी यांचा असा फोटो शेयर केला जात आहे ज्यामध्ये त्यांच्यामागील कपाटात येशू ख्रिस्तांची मूर्ती, बायबल आणि भारताला ख्रिश्चन राष्ट्र कसे करायचे (How to convert India into Christian Nation) अशी पुस्तक दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की हा फोटो बनावट आहे. […]

Continue Reading

“जन्माने मी भाजपचा सदस्य” असे अरविंद केजरीवाल म्हणाले का? अर्धवट व्हिडिओ व्हायरल

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करून दावा केला जात आहे की, केजरीवाल यांनी अखेर मान्य केले की ते जन्माने भाजपचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धामध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला का?

रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगभरातील देश रशियावर आर्थिक निर्बंध घालून आक्रमण थांबविण्याचे आवाहन करीत आहेत. यामध्ये भारताची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच अमेरिकेतील लोकप्रिय न्यूज चॅनेल सीएनएनच्या एका कथित बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे, की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताला रशिया-युक्रेन युद्धापासून […]

Continue Reading

युक्रेनचा सैनिक पत्नीला सोडून जातानाचा हा खरा व्हिडिओ नाही; हा तर चित्रपटातील सीन

रशिया युक्रेन युद्धामुळे सोशल मीडियावर असंबंधित आणि जुन्या व्हिडिओ/फोटोंचा सुळसुळाट सुरू आहे. अशा अनेक व्हायरल क्लिप्सची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केलेली आहे.  त्यात भर म्हणून आणखी एक भावनिक व्हिडिओ शेअर होत आहे. यात एका सैनिक युद्धासाठी रवाना होण्यापूर्वी पत्नीला साश्रुनयनांनी निरोप देत आहे. या व्हिडिओला युक्रेन युद्धाशी जोडले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

युक्रेनमधील लोक मरण्याचे नाटक करत नव्हते; हा व्हिडिओ ऑस्ट्रियामधील आहे

टीव्ही पत्रकार बातमी देत असताना व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, युक्रेनमधील लोक युद्धात मृत्यू झाल्याचे नाटक करत आहेत.  व्हायरल व्ह