राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील विराट गर्दीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे सत्य काय?

False राजकीय | Political

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चर्चेत आहे. विविध राज्यातून जात असेलेल्या या यात्रेबद्दल सोशल मीडियावर विविध दावे केले जात आहेत. 

याच संदर्भात विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांच्या कर्नाटकमधील सभेला जमलेल्या गर्दीचा हा फोटो आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हे फोटो जुना असून, चुकीच्या दाव्यासह तो व्हायरल होत आहे. 

काय आहे दावा?

राहुल गांधी यांच्या फोटोसह गर्दीचे दोन फोटो शेअर केले जात आहेत. एक फोटो दिवसाचा तर एक रात्रीचा फोटो आहे. सोबत म्हटले आहे की, “ही दृश्य आहेत राहुल गांधी यांच्या आजच्या कर्नाटक येथील बेल्लारीमधील भव्य सभेची. मोदी विरोधी आणखी कसली लाट उसळली पाहिजे; ही गोदी मीडिया जाणीवपूर्वक भारत जोडो यात्रेला कव्हरेज देत नाही.”

मूळ पोस्ट –  फेसबुकफेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

दोन्ही फोटोंची एक-एक करत पडताळणी करूया. 

पहिला फोटो

गुगल रिव्हर्स इमेज सर्चे केल्या असता कळाले की, हा फोटो गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दाव्यासह शेअर केला जात आहे. एका वेबसाईटनुसार, नायजेरियाचे तत्कालिन राष्ट्रपती मोहम्मद बुहार यांची 2015 साली  कानो शहरात सभा झाली होती. या सभेला जमलेल्या गर्दीचा हा आहे. 

परंतु, एका कानो ऑनलाईन वेबसाईटनुसार, हा फोटो बुहार यांच्या सभेचा नसून, ख्रिश्चन धर्मप्रसारक रेनहार्ट बॉन्क यांच्या कार्यक्रमाचा आहे. एका पत्रकारनेसुद्धा 2015 साली स्पष्ट केले होते की, गर्दीचा हा फोटो राष्ट्रपतीच्या सभेचा नसून, बॉन्क यांच्या कार्यक्रमाचा आहे. 

या ट्विटमधील वेबसाईटला भेट दिली असता कळाले की, हा फोटो खरंच 2009 साली झालेल्या कार्यक्रमाचा आहे. बाँक यांच्या कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ओग्मोबॉसो शहरात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नायजेरियातील लाखो लोक सहभागी झाले होते.

मूळ वेबसाईट – Milost

दुसरा फोटो

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रात्रीच्या गर्दाचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे. त्यानुसार, 13 ऑक्टोबर 2021 रोजी तेलंगणामध्ये रेवंथ रेड्डी यांच्या सभेला जमलेली ही गर्दी आहे. म्हणजेच हा फोटो एक वर्षे जुना आहे. 

राहुल गांधी यांची यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी कर्नाटकमधील बेल्लारी शहरात रॅली पार पडली.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, राहुल गांधी यांच्या बेल्लारी येथील सभेची विराट गर्दी म्हणून जुने फोटो शेअर केले जात आहेत. त्यातील एक फोटो नायजेरियामधील आहे, तर दुसरा फोटो 2021 मधील आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’तील विराट गर्दीच्या ‘त्या’ व्हायरल फोटोचे सत्य काय?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False