सत्य पडताळणी- मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ते धुतले गेले होते का?

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक फोटो असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या फोटोसंदर्भात मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ते धुतले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडियोच्या कव्हर फोटोत काही लोक रस्त्यावर दूध टाकताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने याबद्दल सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काईव्ह

पोस्टमध्ये फेसबुकवर अमूल दूधाच्या टॅंकरमधून रस्त्यावर दूध सांडतानाचा फोटो देण्यात आलेला आहे. हा फोटो व्हिडिओसाठी कव्हर फोटो म्हणून वापरण्यात आलेला आहे. तसेच या फोटोविषयी मंत्री के आने से पहले जब दुध से सडक को धोया गया, असे म्हटले आहे. पोस्टमधील व्हिडिओमध्ये भारतातील वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये दहशतवाद, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तरुणांमध्ये मोबाईलबद्दल असणारी क्रेझ, दुचाकी चालवताना हेलमेट न वापरणारे लोक, बालकांचे कुपोषण, अन्न नासाडी, शेतकऱ्यांचे प्रश्न, याविषयी माहिती सांगितली आहे.

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये असे म्हटले की, मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ता धुण्यात आला. पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला फोटो संदर्भात कोणते मंत्री येणार, कोणता रस्ता दुधाने धुतला, कुठल्या भागामध्ये मंत्री येणार होते या विषयीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने पोस्टविषयीच्या सत्यतेबद्दल प्रथम दर्शनी शंका निर्माण होते. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

या फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज करुन सर्च केले. त्यानंतर हा फोटो महाराष्ट्रातील स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा असल्याचे समोर आले आहे. टाईमस् ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, 16 जुलै 2018 रोजी महाराष्ट्रात दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यानचा हा फोटो आहे. या विषयी अधिक झी 24 तास, सामना येथे वाचू शकता.

TIMES OF INDIA l अर्काईव्ह

कधी झाले होते हे दूधासाठी आंदोलन?

महाराष्ट्रात स्वाभिमान शेतकरी संघटनेने दूध दरवाढी संदर्भात 16 जुलै 2018 पासून 4 दिवसांचे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन दुधाचे दर पाच रुपयांनी वाढवून मिळावे यासाठी करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर फेकून देण्यात आलेल्या होते.

पोस्टमधील व्हिडियोमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये भारतातील सामाजिक प्रश्नांविषयी सांगताना 1.45 मिनीटांपासून ते 1.52 मिनीटांपर्यंत दुधाने देशातील रस्ते धुतले असे म्हणण्यात आले आहे. तसेच अन्न नासाडी हा प्रमुख सामाजिक प्रश्न घेऊन, त्या विषयाभोवती संबंधित अनेक सामाजिक समस्यांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे.

निष्कर्ष :  पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला फोटो हा महाराष्ट्रातील स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढ आंदोलानाचा आहे. या आंदोलनात अनेकांनी रस्त्यावर दूध ओतून तत्कालिन सरकाकचा निषेध केला होता. त्यामुळे पोस्टमध्ये म्हणण्यात आलेला मंत्री येण्यापुर्वी रस्ते दुधाने धुतले हा दावा असत्य आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी- मंत्री येण्यापूर्वी दुधाने रस्ते धुतले गेले होते का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False