ब्रेडला थुंकी लावतानाचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे फिलिपिन्समधील; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

ब्रेड पाकिटे फोडून ती पुन्हा बंद करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. या व्हिडिओसोबत दावा करण्यात येत आहे की, ब्रेड विक्रेता पाकिट उघडून कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी त्याला थुंकी लावत आहे. त्यानंतर ती पाकिटे बंद करत आहे. फॅक्ट क्रेसेंडोन हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे. तो भारतातील आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

Archive

तथ्य पडताळणी

ब्रेडच्या पाकिटांचा हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी abs-cbn news या संकेतस्थळावर 20 सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार फिलिपिन्समधील गार्डेनिया या ब्रेड उत्पादक कंपनीने याबाबत खूलासा केला आहे. दुकानातील जुनी शिळी ब्रेडची पाकिटे काढून घेत त्याजागी नवी ताजी ब्रेडची पाकिटे ठेवण्यात येतात. या जुन्या विल्हेवाट लावण्याच्या शिळ्या ब्रेडच्या पाकिटातील काही स्लाईस या कर्मचाऱ्याने काढून घेतल्या होत्या. 

screenshot-news.abs-cbn.com-2020.04.10-12_40_20.png

abs-cbn news संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

फिलिपिन्समधील या ब्रेड उत्पादक कंपनीने आपला खूलासा फेसबुकवरही प्रसिध्द केला असल्याचे दिसून येते. आपण हा खूलासा खाली पाहू शकता.

Archive

युटुयुबवर उपलब्ध असलेले विविध व्हिडिओ देखील ही घटना फिलिपिन्स येथे घडल्याची आणि ही व्यकती गार्डेनिया या ब्रेड उत्पादक कंपनीची असल्याची पुष्टी करतात. 

Archive

यावरुन स्पष्ट होते की, हा व्हिडिओ भारतातील नसून फिलिपिन्समधील आहे. जगात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील हुबई येथे 17 नोव्हेंबर 2020 रोजी आढळला. हा व्हिडिओ त्यापुर्वीचा म्हणजेच जुना आहे.

निष्कर्ष

हा व्हिडिओ भारतातील नसून फिलिपिन्समधील आहे. तो कोरोनाची साथ येण्यापूर्वीचा म्हणजेच जुना आहे. 

Avatar

Title:ब्रेडला थुंकी लावतानाचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे फिलिपिन्समधील; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False