केरळमधील भुयारीमार्गाचा व्हिडिओ रत्नागिरीच्या कशेडी घाटाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

एका अद्ययावत भुयारीमार्गाचा (tunnel) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बोगदा रत्नागिरीतील कशेडी घाटावरील असल्याचा दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून, केरळमध्ये नुकेतचे उद्घाटन झालेल्या भुयारीमार्गाचा आहे. 

काय आहे दावा?

एका मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक विशाल भुयारीमार्ग दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “कशेडी घाट NH66 khed-ratnagiri”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओचे बारकाईने निरीक्षण केल्यावर यामध्ये दिसणाऱ्या लोकांचा पेहराव महाराष्ट्रातील वाटत नाही. म्हणून इंटरनेटवर कीवर्ड्सद्वारे सर्च केले. त्यातून केरळमध्ये नुकतेच उद्घाटन झालेल्या एका भुयारीमार्गाची बातमी समोर आली. 

‘मिंट’च्या बातमीनुसार, केरळमध्ये कुथिरन बोगदा हा पहिला भुयारीमार्ग नुकताच सुरू झाला. केरळच्या थ्रीसूर जिल्ह्यात हा भुयारीमार्ग आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकला जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 31 जुलै रोजी ट्विटरवरून या भुयारीमार्गाच्या उद्घाटनाची माहिती दिली होती. सुमारे दीड किमी अंतराचा हा भुयारीमार्ग पिची अभयारण्यात जाणार आहे.

एकुण दोन बोगदे तयार करण्यात आलेले असून, त्यापैकी एक आता सुरू झालेला आहे. 

मग कशेडी घाटाच्या बोगद्याचे काय?

लोकसत्ताच्या सप्टेंबर 2020 मधील बातमीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून 2021 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे उत्खनन सुरू होते.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, केरळमधील भुयारीमार्गाचा व्हिडिओ महाराष्ट्रतील कशेडी घाटाचा म्हणून व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:केरळमधील भुयारीमार्गाचा व्हिडिओ रत्नागिरीच्या कशेडी घाटाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False