कोरोनासाठी रक्ताची तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलची खोटी यादी व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Coronavirus False Medical
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, कोरोनाची लागण झाली की नाही हे तपासण्यासाठी विविध शहरांमधील हॉस्पीटलमध्ये रक्त तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोबत या रुग्णालयांच्या यादीचे फोटो फिरवले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता ही फेक न्यूज आढळली आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

शासनाने खरंच अशी काही यादी प्रसारित केली याचा शोध घेतला असता ही खोटी माहिती असल्याचे कळाले.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही यादी खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

ट्विटरवरदेखील ही यादी फेक असल्याचे सांगत आरोग्य विभागाने म्हटले की, कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. त्यामुळे कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, कोरोना व्हायरसची लागण झाली की नाही हे तपासण्यासाठी रक्ताची तपासणी केली जात नाही. त्यासाठी घशातील द्राव घेतला जातो व तो प्रयोगशाळेत पाठविला जातो. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारी ती हॉस्पिटलची यादी फेक आहे. त्यावर विश्वास ठेवू नका.

Avatar

Title:कोरोनासाठी रक्ताची तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलची खोटी यादी व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •