
एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, केरळमध्ये मुस्लिम तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याचा शिरेच्छेद केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. असंबंधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहेत.
काय आहे दावा ?
50 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला काही लोक एका जणाला बेदम मारहाण करीत इमारतीत घेऊन जातात. त्यानंतर एका अंधाऱ्या खोलीत एका व्यक्तीचा तलवारीने शिरच्छेद केला जातो.
या व्हिडिओसोबत म्हटले आहे की, “RSS कार्यकर्त्याला मशिदीत नेऊन त्याचा शिरच्छेद करणारे केरळचे मुस्लिम बहुसंख्य झाले तर संपूर्ण देशाची अशी अवस्था होईल, न्यायालय, राज्यघटना, पोलिस तुमचे रक्षण करणार नाही, तुमच्या मालमत्तेचे रक्षण करणार नाही. तुमचे कर्म.. ही वस्तुस्थिती बघा, आम्हाला देशात हिंदू व्होट बँक हवी आहे, नाहीतर आम्ही इथे दाखवल्याप्रमाणे किंवा अफगाणिस्तानातील हिंदूंसारखे मरू.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्व प्रथम पडताळणीत समोर आले की, हे दोन वेगवगेळ व्हिडिओ आहे.
व्हिडिओ क्र. 1
रिव्हर्स इमेज केल्यावर तरुणाला मारहाणीची घटना 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरतील सिकरी गावामध्ये घडली होती.
अनुज नावाचा लाइनमन घराती वीज केबर बदलण्यास नकार दिल्यामुळे अय्याज आणि सलमान यांनी रफी, खालिद, नाज, आस मोहम्मद, आबिद यांच्यासाथीने अनुजला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचे कपडे फाडले. अनुज सोबत असलेले त्याचे साथीदार योगेश व रहतू तेथून पळून गेले आणि 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत मागविली.
या घटनेनंतर पोलिसांनी लाइनमनला सोडवले आणि 10 जणांवर गुन्हा दाखल केला.

मूळ पोस्ट – अमर उजाला
व्हिडिओ क्र. 2
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, शिरच्छेदाचा व्हिडिओ भारतातील नाही.
ही घटना 2019 पॅराग्वे या देशाच्या तुरुंगमध्ये घडली होती.
ब्राझीलमधील गुन्हेगारी संघटना “प्राइमर कमांडो दी कॅपिटल”च्या (पीसीसी) सदस्यांनी पॅराग्वेमधील रोतेला क्लेन या गुन्हेगारी कुटुंबामधील एका व्यक्तीला बांधून त्याचा तलवारीने शिरच्छेद केला होता.

मूळ पोस्ट – डेली मेल
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. हे दोन वेगवेगळे व्हिडिओ एकत्र जोडून फेक माहिती पसरविली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:केरळमध्ये RSS कार्यर्त्याच्या शिरच्छेदाचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
