सत्य पडताळणी : मोदी सरकारचा आश्वासनांवर काम करण्याचा स्ट्राईक रेट ८९%

True राजकीय

(फोटो सौजन्य : बीबीसी हिंदी)

बीबीसीच्या अहवालाचा दाखला देत rationalperusal.com या संकेतस्थळाने मोदी सरकारचा आश्वासनांवर काम करण्याचा स्ट्राईक रेट ८९% असल्याचे वृत्त दिले. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

इन्स्टाग्रामवर हा दावा करण्यात आल्याचे आपण खालील लिंकवर पाहू शकता.

View this post on Instagram

#narendramodi #bjp #delhi #namo

A post shared by Narendra Modi (@narendramodi.indian) on

तथ्य पडताळणी

बीबीसीने खरंच अशा स्वरुपाचे वृत्त दिले आहे का हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आम्ही बीबीसीच्या संकेतस्थळावर गेलो. त्याठिकाणी आम्हाला खालील वृत्त दिसून आले.

आक्राईव्ह लिंक

याच वृत्तात भाजपने आपल्या 2014 च्या घोषणापत्रात 346 आश्वासने दिल्याचे म्हटले आहे. या 346 आश्वासनांपैकी 117 आश्वासने पूर्ण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. यापैकी 190 कामे सुरू आहेत तर 39 कामे अपूर्ण आहेत. पूर्ण झालेली बहुतांश आश्वासनं प्रशासकीय प्रकारातील असल्याचंही बीबीसीनं म्हटलं आहे. बीबीसी हिंदीचा मुळ लेखही तुम्ही यासाठी वाचू शकता.

विविध वर्गवारी करत बीबीसीने हा अहवाल केला आहे. यासाठी त्यांनी सरकारी आकडेवारीचा आधार घेतला आहे. शेती, व्यवसाय उद्योग अशा विविध क्षेत्रातील आकडेवारीही बीबीसीच्या संकेतस्थळावर दिसून येते. वेगवेगळ्या क्षेत्रानुसार असलेल्या स्वतंत्र बातम्याही या आकडेवारीसाठी अभ्यासता येऊ शकतात.

काम सुरू आणि पूर्ण झाले ही वर्गवारी एकत्र केल्यास 89 टक्के कामे पूर्ण किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. यालाच rationalperusal.com ने स्ट्राईक रेट असा शब्दप्रयोग केला आहे.

निष्कर्ष

सरकारी आकडेवारीचा आधार घेतल्यास आणि पूर्ण झालेल्या आणि पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या कामाच्या आकडेवारीचा विचार केल्यास हे वृत्त सत्य असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीतून दिसून येते.

Avatar

Title:सत्य पडताळणी : मोदी सरकारचा आश्वासनांवर काम करण्याचा स्ट्राईक रेट ८९%

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True