पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली का? वाचा सत्य

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली आहे, अशी माहिती असलेले एक वृत्तपत्राचे कात्रण समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरोखरच त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

PAKISTANI MODI.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली आहे, याचा शोध घेतला. त्यावेळी बीबीसी हिंदीने 27 ऑगस्ट 2018 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानलेल्या भगिनी कमर मोहसीन शेख म्हणाल्या की, त्या मुळच्या पाकिस्तानी रहिवाशी होत्या. त्या 22 किंवा 23 वर्षाच्या असताना भारतात आल्या. मागील 24 वर्षापासून त्या पंतप्रधान मोदींना राखी बांधत आहेत. त्यांना भारतात येऊन आता 37 वर्ष झाली आहेत.

संग्रहित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानलेल्या भगिनी कमर मोहसीन शेख या सध्या अहमदाबाद येथे राहत असल्याचे वृत्त दैनिक जनसत्ताने दिले असल्याचेही दिसून आले.

संग्रहित

image2.png

त्यानंतर न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळाने एक ऑगस्ट 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार कोरोना महामारीमुळे कमर मोहसीन शेख यांना यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता आली नाही. पाकिस्तानमध्ये जन्मलेला कमर मोहसीन शेख लग्नापासून अहमदाबादमध्ये आपल्या कुटूंबियांसह राहतात. एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना त्यांनी मागील 35 वर्षापासुन आपला परिचय असल्याचे स्पष्ट केले. कराचीहून दिल्लीला आल्या त्यावेळी त्यांची मोदींसोबत पहिली भेट झाली. तेव्हापासून मोदी त्यांना बहीण मानतात. कोरोना महामारीमुळे यंदा 25 व्या वर्षी आपल्याला राखी बांधण्याची संधी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

new indian.png

संग्रहित

या माहितीतुन हे स्पष्ट झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची मानलेली बहीण कमर मोहसीन शेख यांनी पाकिस्तानमधून नव्हे तर अहमदाबादमधुन राखी पाठवलेली आहे.

निष्कर्ष 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमधुन त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानातून त्यांच्या मानलेल्या बहिणीने राखी पाठवली का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False