विवेक रहाडेच्या नावाने व्हायरल होत असलेली आत्महत्येची चिठ्ठी बनावट; वाचा सत्य

False सामाजिक

बीड तालुक्यात केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. सोशल मीडियावर विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली म्हणून एका चिठ्ठीचा फोटो वायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत बनावट चिठ्ठी असल्याचे समोर आले. 

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील विवेकच्या नावाने व्हायरल होत असलेल्या चिट्ठीमध्ये लिहिले आहे की, “मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. माझा नीटमध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.” 

Maratha youth sucide note Post.png

Facebook Post / Archive 

तथ्य पडताळणी 

विवेक रहाडे या तरूणाने लिहिलेली ही आत्महत्येची चिठ्ठी आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी माय महानगर या संकेतस्थळाने दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार विवेक रहाडे या युवकाची आत्महत्येची चिठ्ठी म्हणून समाजमाध्यमात व्हायरल होत असलेली ही चिठ्ठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

screenshot-www.mymahanagar.com-2020.10.07-18_40_16.png

माय महानगर / संग्रहित

समाजमाध्यमात पसरत असलेल्या या बनावट चिठ्ठीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी देत यांनी दिली. त्यांचा हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

विवेकच्या उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षर आणि आत्महत्येच्या व्हायरल झालेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर जुळत नसल्याचा अहवाल हस्ताक्षरतज्ज्ञांनी दिला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 

संग्रहित

बीड पोलिसांनी याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केलेले  ट्विटही आपण खाली पाहू शकता.

संग्रहित 

याप्रकरणात फिर्याद देणारे पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. 

याबाबत 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Beed Control Room.png
पोलीस नियंत्रण कक्षाने जारी केलेली माहिती

निष्कर्ष

विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात व्हायरल होत असलेली चिठ्ठी ही बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Avatar

Title:विवेक रहाडेच्या नावाने व्हायरल होत असलेली आत्महत्येची चिठ्ठी बनावट; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False