कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

Coronavirus False आंतरराष्ट्रीय वैद्यकीय

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करत असल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चार नवेगवेगळी दृश्ये दिसत आहेत. यातील पहिल्या दृश्यात हातात पिस्तूल घेऊन काही पोलीस अधिकारी चालताना दिसत आहेत. दुसऱ्या दृश्यात एक महिला बोलत असताना दिसते आणि आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. शेवटच्या दृश्यात एक महिला आक्रोश करताना दिसत असून जखमी व्यक्ती आणि रुग्णवाहिका दिसते. हा व्हिडिओ नेमका कशाचा आहे? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी

या व्हिडिओत चार वेगवेगळी दृश्ये दिसत असल्याचे आम्हाला सुरुवातीलाच दिसून आली. ही चार वेगवेगळी दृश्ये आम्ही खाली दिली आहेत.

image5.png

पहिले दृश्य Clip 1: पोलीस आपल्या वाहनाजवळ पिस्तूलात गोळ्या भरत आहेत आणि त्या तपासत आहेत. (कालावधी : 0 ते 15 सेकंद)

दुसरे दृश्य Clip 2:  हेच तीन पोलीस कर्मचारी एका इमारतीमध्ये (अपार्टमेंट कॉम्प्लेक्स) जाताना दिसत आहेत. (कालावधी : 16 ते 21 सेकंद)

तिसरे दृश्य Clip 3:  जमिनीवर पडलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. मागे गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. (कालावधी : 22 ते 34 सेकंद)

चौथे दृश्य Clip 4:  एक व्यक्ती पदपथावर पडलेली दिसत आहे. गोळीबारासारखा आवाज ऐकू येत आहे. (कालावधी : 34 सेकंद ते व्हिडिओ संपेपर्यंत)

पहिल्या भागाचे विश्लेषण  (क्लिप 1 आणि 2)पहिली आणि दुसरी क्लिप ही एकाच इमारतीच्या छतावरुन चित्रित करण्यात आली असावी. दुसऱ्या क्लिपकडे जात असताना 15 व्या सेकंदाला लक्षात येते की, वाहनावर चिनी भाषेत पोलीस (POLICE, 警察) असे लिहिलेले आहे. त्यानंतर आम्हाला चीन सरकारची अधिकृत माध्यम संस्था असलेल्या CGTN या वाहिनीवरील एक वृत्तांत दिसून आला. या वृत्तांतानुसार एक फेब्रुवारी रोजी पूर्व चीनच्या झेझियांग प्रांतात (वुहानपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर) यीवू सिटी येथे वास्तविक घटना घडली आहे. (या व्हिडिओत दिसणारी जी 1796 ही कार या शहरातील पोलीस दलाची आहे)

image2.png

घटनेचा तपशील :

एक फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी पोलिसांना नागरिकांकडून एका कुत्र्याविषयी तक्रार मिळाली. हा कुत्रा शेजारच्यांना आजुबाजूच्यांना त्रास देत होता. त्यामुळे पोलीस तिथे पिस्तूल आणि कोरोना व्हायरसपासून संरक्षण करणारा पोषाख घालून पोहचले. या कुत्र्यापासून नागरिकांना धोका असल्याने पोलिसांनी त्याला पिस्तूलातून गोळ्या घालत ठार केले. या घटनेच्या व्हिडिओतील काही भाग आता संपादित करुन त्याला वेगवेगळ्या क्लिप जोडून तो चुकीच्या माहितीसह व्हायरल करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

image7.png

सीजीटीएनच्या संकेतस्थळावरील सविस्तर वृत्त / Archive

image3.png

सीजीटीएनचे ट्विट / Archive सीजीटीएनची फेसबुक पोस्ट / Archive

दुसऱ्या भागाचे विश्लेषण  (क्लिप 3)

तिसऱ्या आणि चौथ्या क्लिपमध्ये गोळीबाराचा आवाज समान असल्याचे लक्षात येते. या आवाजाकडे दुर्लक्ष करत लोक रुग्णांकडे लक्ष देत आहेत. हाच व्हिडिओ 26 जानेवारी 2020 रोजी एका चिनी ट्विटर हॅण्डलवर अपलोड करण्यात आल्याचे आम्हाला दिसून आले. त्या खाली लिहिले आहे की, वुहानच्या ग्रामीण भागातील लोक रुग्णालयापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरत आहेत आणि घरातच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यांचा आजाराने मृत्यू झालेल्या अधिकृत आकड्यात देखील समावेश नसेल. मागे नववर्षानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी होत आहे आणि त्यांचा निरागसपणे मृत्यू होत आहे.

आम्ही ट्विटवरील या व्हिडिओची आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील त्या भागाची तुलना केली आहे. या तुलनेतुन हे स्पष्ट होत आहे की, हा व्हिडिओ वैद्यकीय पथक रुग्णांची तपासणी करत असतानाचा आहे. मागे येणारा आवाज हा गोळीबाराचा नसून चिनी नववर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या फटाक्याच्या आतिषबाजीचा आहे. 

त्यानंतर आम्ही दोन्ही क्लिपमधील ध्वनीपातळी तपासून त्याची तुलना केली.    त्यात लक्षात आले की व्हायरल क्लिपची ध्वनी पातळी गनशॉट ध्वनीच्या प्रभावाचे वर्णन करण्यासाठी सुधारित केली गेली आहे. 

2020-02-15.png

तिसऱ्या भागाचे विश्लेषण  (क्लिप 4)

त्यानंतर सीजीटीएन वृत्तवाहिनीने व्हायरल व्हिडिओबाबत दिलेला एक वृत्तांत आम्हाला दिसून आला. हा वृत्तात चौथ्या क्लिपबाबतचा आहे. सीजीटीएन वृत्तवाहिनीच्या पथकाने या घटनास्थळास भेट दिली. या व्हिडिओच्या शीर्षकात “हुबेई चकमकीचा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध झाले” असे म्हटले आहे. लेखात मोटारसायकलीचा अपघात ऑनलाईन अफवेत कसा परावर्तित झाला याची माहिती देण्यात आली आहे. वुहानपासून तीन तासाच्या अंतरावर असणाऱ्या हुबेईच्या वुझू या शहरात 29 जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. व्हायरल व्हिडिओत चुकीचा अर्थ लावत तो पसरविण्यात आला.

या वृत्तानुसार, आपल्या चुलतभावाबरोबर जात असलेल्या एका 15 वर्षीय मुलाचे (पिवळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसणारा) आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो सिमेंटवर जाऊन आदळला. वुझू हॉस्पिटलचे कर्मचारी रूग्णवाहिकांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले परंतु ते त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. सीजीटीएनने याबाबत दिलेला सविस्तर वृत्तात आपण खाली वाचू शकता. 

image4.png

आपण हे फॅक्ट चेक इंग्रजीतही येथे वाचू शकता. तथ्य पडताळणी करणाऱ्या बूम या संकेतस्थळानेही इंग्रजी भाषेत हे फॅक्ट चेक केलेले आहे.

निष्कर्ष

चीनमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे. वेगवेगळ्या क्लीप एकत्र करत हा बनावट व्हिडिओ बनविण्यात आला आहे.

Avatar

Title:कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना चीन सरकार ठार करतंय का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False