शेतकरी आंदोलनामध्ये श्रीरामांविरोधात बॅनर झळल्याचा दावा खोटा; जुना फोटो झाला शेयर

False राजकीय | Political

दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविरोधात सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या अनेक दाव्यांचे फॅक्ट क्रेसेंडोने सत्य समोर आणले आहे.

अशाच एका दाव्यानुसार, सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात श्रीरामाविरोधातील बॅनर झळकले. या कथित बॅनरचे फोटो फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये एका बॅनरचा फोटो शेयर केलेला आहे. त्यात ‘न मोदी, न योगी, न जय श्रीराम, देश पर राज करेगा मजदूर किसान’ अशी घोषणा लिहिलेली आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले जात आहे की, मोदी-योगी ठीक आहे. पण रामाला आक्षेप असणारा हा नक्की कोणता शेतकरी म्हणायचा? आमचा शेतकरी तर रामनाम घेऊन कामाला सुरुवात करतो, एकमेकांना “राम राम” घालतो. मग त्याला राम कधीपासून नकोसा झाला? हे नक्की शेतकऱ्यांचं आंदोलन आहे की शेतकऱ्यांच्या आडून लाल-हिरवी माकडं आपलं काळं काम करताहेत?’

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो दोन वर्षांपूर्वीचा म्हणजे 2018 मधील आहे. 

नवजीवन नावाच्या वृत्तवेबसाईटवर खालील फोटो आढळला. 30 नोव्हेंबर 2018 रोजीच्या बातमीनुसार, हा फोटो अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे (एआईकेएससीसी) आयोजित किसान मुक्ती मोर्चामधील आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मांगण्यासाठी हजारो शेतकरी त्यावेळी दिल्लीच्या रामलील मैदानावर जमले होते.

मूळ लेख – नवजीवन इंडिया | अर्काइव्ह

अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिसा अशा विविध राज्यांतून 28-29 नोव्हेंबर 2018 रोजी शेतकरी दिल्लीत जमा झाले होते.

बॅनरवर AIK* असे लिहिलेले दिसते. त्यानुसार शोध घेतल्यावर कळाले की, अखिल भारतीय किसान महासभा (AIKM) या संघटनेची ती आद्याक्षरे आहेत. फेसबुकवर या संघटनेच्या पेजवरूनसुद्धा 2018 साली या बॅनरचे फोटो शेयर करण्यात आले होते. 

मजदूर किसान एकता जिन्दाबाद

Posted by All India Kisan Mahasabha on Monday, 3 December 2018

मूळ पोस्ट – फेसबुक 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, दोन वर्षांपूर्वीच्या आंदोलनाचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे चुकीच्या माहितीसह शेयर केला जात आहे.

Avatar

Title:शेतकरी आंदोलनामध्ये श्रीरामांविरोधात बॅनर झळल्याचा दावा खोटा; जुना फोटो झाला शेयर

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False