गुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

कोरीव स्थापत्यकला असलेल्या एका मंदिराचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, ते अयोध्येतील राम मंदिर आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही.

काय आहे दावा?

सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एका मंदिराचे काम सुरू असताना दिसते. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, अयोध्येतील राम मंदिर.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गुजरातमधील एका जैन मंदिराचा आहे. 

युट्यूबवर व्हायरल व्हिडिओ ‘चुली जैन टेम्पल’ या नावाने उपलब्ध आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये धनगदरा – हलावद महामार्गावरील चुली गावात हे मंदिर आहे. ‘तरंग विहार धाम’ असे या जैन मंदिराचे नाव आहे.

अधिक शोध घेतल्यावर गुगल मॅपवर हे मंदिर आढळले. या मंदिराचे अनेक फोटो गुगल मॅपवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ लिंक – गुगल मॅप

युट्यूबवर गुजरातमधील जैन मंदिराचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यापैकी एक तुम्ही खाली पाहू शकता.

मग अयोध्या राम मंदिराचे काम कुठपर्यंत आले आहे?

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेततर्फे राम मंदिराच्या निर्माणाचे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता. राम मंदिराचे का अद्याप अत्यंत प्राथमिक स्वरुपात आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, गुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल होते आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False