ही व्यक्ती समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनीही जीवंत आढळली आहे का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

एका जखमी अवस्थेतील व्यक्तीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात फार वेगाने पसरत आहे. ही व्यक्ती तामिळनाडूतील सिद्धार योगी असून ती तीनशे वर्षापुर्वी समाधीस्त झाली होती. वेल्लियूर मंदिराच्या नुतनीकरणासाठी माती खोदत असताना ते जीवित अवस्थेत आढळून आले. सिद्धार हे योगासनात बसलेले दिसून येतात. अशा माहितीसह हा व्हिडिओ समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोलाही हा व्हिडिओ याचा खरेपणा जाणून घेण्यासाठी व्हॉटस्अपवर प्राप्त झाला असून फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

screenshot-web.whatsapp.com-2020.02.22-12_04_14.png

समाजमाध्यमात पसरत असलेली माहिती

तथ्य पडताळणी

या व्हिडिओबाबत अधिक जाणून घेण्यासाठी इन्विड टूलचा वापर करत यातील काही दृश्ये घेतली आणि ती रिव्हर्स इमेज केली. त्यावेळी आम्हाला 26 जून 2019 रोजीचे ब्रिटनमधील डेली मेल या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. यातील वृत्तानुसार मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीप्रमाणे दिसणाऱ्या या रशियन व्यक्तीला एका अस्वलाच्या गुफेतून वाचविण्यात आले आहे. अस्वलाने त्याला पाठीचे हाड मोडल्यावर गुफेतच सोडून दिले. जवळपास एक महिन्यानंतर या व्यक्तीला तेथून वाचविण्यात आले.

image4.png

Archive

त्यानंतर डेली मेलनेच 29 जून 2019 रोजी याबाबत आणखी एक वृत्त प्रकाशित केल्याचे दिसून आले. या वृत्तानुसार या व्यक्तीला तीव्र स्वरुपाचा सोरायसिस हा त्वचाविकार झालेला आहे. त्याला अस्वलाने मारलेले नाही. हा व्यक्ती रशियाचा नागरिक नसून कझाकिस्तानचा आहे. 

image2.png

Anchor

स्कॉटिश सन या संकेतस्थळाने 29 जून 2019 रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित करताना म्हटलं की, व्हिडिओ आणि छायाचित्रात दाखवण्यात आलेल्या व्यक्तीवर कोणत्याही अस्वलाने हल्ला केलेला नाही अथवा तो एक महिना तो हल्ला झाला त्याठिकाणी जखमी अवस्थेत नव्हता. ही व्यक्ती तीव्र स्वरुपाच्या सोरायसिसची रुग्ण आहे. 

image1.png

Archive 

निष्कर्ष

ही व्यक्ती तामिळनाडूतील सिद्धार योगी असल्याची आणि वेल्लियूर मंदिराच्या नुतनीकरणासाठी खोदकाम सुरू असताना ती जीवित अवस्थेत आढळून आल्याचा दावा असत्य आढळला आहे. ही व्यक्ती कझाकिस्तानची असून तीव्र सोरायसिसने ग्रस्त रुग्ण आहे.

Avatar

Title:ही व्यक्ती समाधी घेतल्यानंतर 300 वर्षांनीही जीवंत आढळली आहे का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •