FACT CHECK : वाहने अडवून रस्त्यावर नमाज पठण करतानाचा हा फोटो खरंच बंगालचा आहे?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावर सध्या मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येकेकडे निर्देश करणारा एक फोटो फिरवला जात आहे. यामध्ये हजारो लोक भर रस्त्यात नमाज पठण करताना दिसतात. त्यामुळे रस्तावरील वाहनेदेखील खोळंबलेली यामध्ये दिसतात. हा फोटो बंगालमधील असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

फोटोसोबत कॅप्शन दिले की, ही बंगालमधील परिस्थिती आहे. जनसंख्या नियंत्रण लागू करणे खूप गरजेचे आहे.

पण हा फोटो खरंच बंगालमधील आहे का?

तथ्य पडताळणी

फेसबुक पोस्टमधील फोटोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर या फोटोशी साम्य असणारा एक फोटो समोर आला. Olympus Global Open Photo Contest 2017-18 या छायाचित्र स्पर्धेच्या वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. मोहम्मद संजू (Md. Sonju) नावाच्या फोटोग्राफरने हे छायाचित्र बांग्लादेशमध्ये काढले होते.

मूळ छायाचित्र येथे पाहा – Olympus

मग आम्ही छायाचित्रकार मोहम्मद संजू यांनी काढलेले इतर फोटो शोधले. तेव्हा आम्हाला फ्लिकर या फोटो शेयरिंग वेबसाईटवरील त्यांचे अकाउंट मिळाले. येथे त्यांनी खाली दिलेला फोटो शेयर केला होता, 13 जानेवारी 2018 रोजी त्यांनी हा फोटो घेतला होता.

मूळ फोटो हाय रेझ्यूलेशनमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा – फ्लिकर

हे फोटो जानेवारी 2018 मध्ये पार पडलेल्या बिश्वा इज्तेमा (Bishwa Ijtema) या मुस्लिमधर्मीयांच्या सोहळ्यातील आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका शहराच्या जवळील टोंगी या तुरंग नदीतिरावरील गावात दरवर्षी हा सोहळा आयोजित करण्यात येतो. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात लाखो मुस्लिम भाविक सहभागी होतात. गेल्यावर्षी या सोहळ्याला 12 जानेवारी, 2018 रोजी प्रारंभ झाला होता, असे वृत्त ढाका ट्रिब्यूनने दिलेले आहे.

आता फेसबुक पोस्टमधील फोटो आणि मोहम्मद संजू यांचा बांग्लादेशमधील फोटो यांची तुलना करू.

यावरून हे सिद्ध होते की, हा फोटो बंगालमधील नसून, गेल्यावर्षी बांग्लादेशमध्ये काढलेला आहे.

या सोहळ्याचे इतर फोटो तुम्ही गेटी इमेजेस या वेबसाईटवर पाहू शकता. या वेबसाईटवरील काही फोटो खाली इम्बेडेड केलेले आहेत.

Embed from Getty Images

निष्कर्ष

बंगालमधील फोटो म्हणून पसरविले जाणारे छायाचित्र भारतातील नसून, बांग्लादेशातील आहे. मोहम्मद संजू यांनी गेल्या वर्षी बिश्वा इज्तेमादरम्यान हा फोटो काढला होता. त्यामुळे फेसबुक पोस्टमध्ये असत्य दावा करण्यात आला आहे.

Avatar

Title:FACT CHECK : वाहने अडवून रस्त्यावर नमाज पठण करतानाचा हा फोटो खरंच बंगालचा आहे?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •