अत्तर विकण्याच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज फेक; वाचा सत्य
मॉलच्या पार्किंगमध्ये अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा लोकांपासून सावधान राहावे, असा सल्ला मुंबई पोलीसांनी दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटलेले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. मुंबई पोलिसांनी अशी कोणतीही सूचना केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा मेसेज व्हायरल होत आहे.
काय आहे मेसेजमध्ये?
मुंबईचे पोलीस उपाधीक्षक के. आर. नागाराजू यांच्या नावाने सूचना फिरत आहे की, “एखाद्याने तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये किंवा इतर कोठे थांबवले आहे आणि काही अत्तरमध्ये आपल्याला रस आहे का आणि आपल्याला वास घेण्यास कागद दिल्यास घेऊ नका, याचा वास येत नाही. हा एक नवीन घोटाळा आहे, ते लोक पेपर ड्रग्जसह सज्ज आहते. आपण तेथुन निघून जा. ते आपले अपहरण करू शकतील, लुटतील किंवा वाईट गोष्टी करतील.”
तथ्य पडताळणी
मेसेजमध्ये मुंबईतील गुन्हे शाखेचे डीसीपी म्हणून के. आर. नागराजू यांचे नाव दिले आहे. मुंबई पोलिसांच्या वेबसाईटवर तपास केल्यावर समोर आले की, मुंबईत के. आर. नागराजू नावाचे कोणीच उपाधीक्षक (डीसीपी) नाही.
मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे खरंच सात मुली बेपत्ता झाल्या का याचा शोध घेतला. परंतु, मॉलमध्ये अत्तराचा वास देऊन लुटमार किंवा मुलींचे अपहरण झाल्याचे कोणतीही बातमी आढळली नाही. सात मुली बेपत्ता झाल्या आणि बातमी नाही, असे होऊ शकत नाही.
गुगलवर वेगवेगळ्या कीवर्डने सर्च केल्यावर कळाले की, गेल्या दोन दशकापासून अत्तराचा वास देऊन लूटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज पसरत आहे. इंग्रजीमध्ये या अफवेला ‘द नॉकआउट पर्म्युम’ असे नाव आहे.
स्नोप्स वेबसाईटनुसार, अमेरिकेतील अल्बामा येथील एका महिलेने 8 नोव्हेंबर 1999 रोजी मॉलच्या पार्किगमध्ये स्वस्तात पर्फ्युम विकणाऱ्याने तिला अत्तराचा वास देऊन बेशुबद्ध केले आणि 800 डॉलर्स लुटले असा आरोप केला होता. परंतु, पोलिसांना यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. तसेच त्या महिलेची वैद्यकीय तपासणी केल्यावर ती अत्तरामुळे बेशुद्ध झाल्याच्या खुणा आढळल्या नाही.
तेव्हापासून, हा मेसेज वेगवेगळ्या नावाने पसरविला जात आहे. भारतातही अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांच्या नावे फिरत आहे. केरळ पोलिसांच्या नावेदेखील हा मेसेज केरळमध्ये फिरत होतो. फॅक्ट क्रेसेंडोने केरळ पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले होते.
मग के. आर. नागराजू कोण आहेत?
के. आर. नागराजू हे सध्या तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे पोलिस अधीक्षक आहेत. त्यापूर्वी ते वारंगल (पूर्व) आणि रचाकोन्डा येथे डीसीपी होते.
2019 मध्ये जेव्हा नागराजू यांच्या नावे हा मेसेज फिरू लागला तेव्हा बँगलोर मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना नागराजू यांनी हा मेसेज पूर्णतः बनावट असल्याचे सांगतिले. एवढेच नाही तर, हा खोटो मेसेज पसरवून भीती निर्माण केल्याबद्दल त्यांनी तक्रारदेखील दाखल केली आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, मुंबई पोलिसांनी अत्तर विक्रेते ग्राहकांना पेपर ड्रग्जद्वारे बेशुद्ध करून लुटमार किंवा अपहरण करत असल्याचा मेसेज पसरविलेला नाही. तसेच निझामाबादचे पोलिस अधीक्षक के. आर. नागराजू यांच्या नावे फेक मेसेज व्हायरल होत आहे. असे असले तरी अनोळखी व्यक्तींकडून कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी काळजी घ्यावी.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:अत्तर विकण्याच्या नावाखली लुटमार करणाऱ्या टोळीचा मेसेज फेक; वाचा सत्य
Fact Check By: Agastya Deokar
Result: False