सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये काही लोक एका व्यक्तीचा पाठलाग करत त्याला काठीने मारहाण करतात. दावा केला जात आहे की, मणिपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर लोकांचा आक्रोश अनावर झाला आणि त्यांनी नोएडामध्ये भाजप नेते राहुल पंडित यांना मारहाण केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना मणिपुरशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

या 45 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही लोक एका व्यक्तीचा पाठलाग करत त्याला मारहाण करतात.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “ग्रेटर नोएडामध्ये भाजप नेते रोहित पंडित यांची बेदम मारहाण! त्याला काठीने मारहाण करण्यात आली. मणिपूर बद्दल वाद घालत होते, लोक देऊ लागले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर व्हायरल व्हिडिओ उपलब्ध आहे. व्हिडिओसोबत माहिती दिली आहे की, “ग्रेटर नोएडामध्ये काही लोकांनी भाजपचे स्थानिक जिल्हा उपाध्यक्ष राहुल पंडीत यांनी मारहाण करण्यात आली होती. कासना परिसरातील लाडपूरा गावात काही कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यातून ही मारहाण झाली होती.

तसेच चेतना मंचच्या बातमीनुसार हा सर्व वाद मंदिरासाठी जमीन न दिल्याने झाला होता. गावाबाहेरील वेशीवर चौधरी लखपत असे लिहिलेले नाव पुसून टाकण्यात आले होते. नाव पुसल्यानंतर हे प्रकरण तापले आणि सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली आणि नंतर त्याचे हाणामारीत रूपांतर झाले.

ही बातमी दैनिक भास्करइतर वृतपत्रांनी प्रसारित केली परंतु, “मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अक्रोश अनावर झाल्यावर लोकांनी भाजपा नेता राहुल पंडित यांना मारहाण केली.” असा उल्लेख कोणत्या ही बातमीत केला गेला नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केला दावा खोटा आहे. हा वाद मंदिरासाठी जमीन न दिल्याने आणि गावाबाहेरील वेशीवरील नाव पुसल्याने झाला होता. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भाजप नेत्याच्या मारहाणीचा व्हिडिओ मणिपुरशी संबंधित नाही; चुकीचा दावा व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False