शरद पवार स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का?

False राजकीय

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्या पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे स्वतःचा पक्ष काँग्रेस मध्ये 13 दिवसांत विलीन करायच्या मार्गावर आहेत, असा दावा करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार हे आपला स्वतःचा पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करणार असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये मोदींचे सरकार 13 दिवसच टिकेल म्हणणारे शरद पवार 13 दिवसांत स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायच्या मार्गावर आहेत, असे म्हटले आहे.

पोस्टबद्दलची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगलवर शरद पवार आपला पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करणार असे सर्च केले. त्यावेळी याविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या दिसून आल्या. महाराष्ट्र टाईम्सने 30 मे 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी ? पवार – राहूल भेट असे म्हटले आहे. या वृत्ताच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हे विलिनीकरण अनिश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सअर्काईव्ह

प्रसारमाध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या आल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांना याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबतचे वृत्त आपण खाली पाहू शकता.

झी 24 तासअर्काईव्ह

दैनिक लोकमतअर्काईव्ह

काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार हे आपला स्वतःचा पक्ष विलीन करणार नाहीत याबद्दल स्वतः त्यांनी प्रसारमाध्यमांना 02 जून 2019 रोजी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. याविषयी स्वतः शरद पवार यांनी ट्विटरवर 30 मे 2019 रोजी ट्विट केले आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमधील शरद पवार आपला स्वतःचा पक्ष 13 दिवसांत काँग्रेसमध्ये विलीन करणार असा दावा असत्य आहे.

Avatar

Title:शरद पवार स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False