माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय

माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांना कोरोनाची लागण झाली, असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. राम मंदिरासंदर्भात निर्णय देणाऱ्या गोगोई यांना भूमीपूजनाच्या दिवशीच कोरोना झाला, असादेखील अनेकांनी प्रचार केला.

फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता या सर्व अफवा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रंजन गोगोई यांना कोरोना होणे ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. मात्र, नेहमी चर्चेत राहणाऱ्या गोगोई यांच्याबद्दल अशी कोणतीही अधिकृत बातमी आढळून आली नाही.

रंजन गोगोई यांचे कोणतेही अधिकृत सोशल मीडिया अकाउंटदेखील नाही. 

विधीविषयक बातम्या देणाऱ्या बार अँड बेंच नामक वेबसाईटने गोगोई यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे वृत्त दिल्याचे आढळले. गोगोई यांच्या हवाल्याने त्यांनी हे वृत्त दिले होते.

अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट रंजन गोगोई यांच्या कार्यलयाशी संपर्क केला. त्यानंतर गोगोई यांनी स्वतः फॅक्ट क्रेसेंडोला माहिती दिली की, “मला कोरोना झाल्याची बातमी पूर्णतः खोटी आहे. मला कोरोनाची लागण झाली नसून, मी माझ्या घरी एकदम सुखरुप आहे.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रंजन गोगोई यांना कोरोना संक्रमण झाल्याची बातमी खोटी आणि निराधार आहे. सोशल मीडियावरील अशा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या शेयरदेखील करू नये.

(वाचकांना जलद आणि अचूक माहिती देण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सुरू केली आहे चॅटबॉटची सुविधा. 9049053770 हा क्रमांक सेव्ह करा आणि पाठवा तुमची फॅक्ट-चेक रिक्वेस्ट)

Avatar

Title:माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False