बिर्याणीत थुंकल्याचा हा व्हिडियो 2 वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Coronavirus False

जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्येने आता पाच लाखाचा टप्पा पार केला आहे. देशातही रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई ही शहरे तर हॉटस्पॉट ठरली आहेत. दरम्यान, दिल्लीतील तब्लिगी मर्कझ सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

याच पार्श्वभूमीवर समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती बिर्याणीत थुंकताना दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, देशात कोरोना पसरविण्यासाठी हे लोक मुद्दामहून थुंकत आहेत. या व्हिडियोवरून सांप्रदायिक प्रतिक्रिया उमटत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे समोर आले.

फेसबुकवरील मूळ पोस्ट 

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोतील की-फ्रेम्सला रिव्हर्स इमेज केल्यावर कळाले की, हा व्हिडियो 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

हा व्हिडियो युटुयूबवर 15 डिसेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. या व्हिडियोखाली मल्याळम भाषेत लिहिले आहे की, ज्यांना इस्लाममधील बरकत समजत नाही, त्यांनी अन्नावर थुंकलेला आहार घ्यावा.

निष्कर्ष

जगात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील हुबई येथे 17 नोव्हेंबर 2020 रोजी आढळला तर, भारतात 30 जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. परंतु हा व्हिडियो त्यापूर्वीचा आहे. यावरुन हे स्पष्ट झाले की, हा व्हिडियो सध्याचा नसून दोन वर्षापुर्वीचा आहे. त्याचा विद्यमान स्थितीशी कोणताही संबंध नाही.

Avatar

Title:बिर्याणीत थुंकल्याचा हा व्हिडियो 2 वर्षांपूर्वीचा आहे. त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False