उज्जैनमध्ये हिंदू जमावाने मशिदीसमोर पाकिस्तान समर्थकांना विरोध दर्शविण्यासाठी नारे दिले होते का ? वाचा सत्य

False Social

उज्जैनमध्ये एका कथित मिरवणुकीदरम्यान काही लोकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारे दिल्यावर दुसऱ्या दिवशी मोठ्यासंख्येने हिंदू मशिदीसमोर जमले आणि “ज्यांना पाकिस्ताना पाहिजे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे” असे नारे देत निषेध केला, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. अशी कोणतीही घटना उज्जैनमध्ये घडली नव्हती.

काय आहे दावा ?

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “उज्जैन शहरात नुकत्याच निघालेल्या मुक्करम मिरवणुकीत मुस्लिमांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. दुस-या दिवशी शहरातील तमाम हिंदू भगवे झेंडे घेऊन मशिदीसमोर जमले, ज्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायचे त्यांनी इथे राहू नये, पाकिस्तानात जा,’ असा निषेध केला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडाताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर युट्यूबवर हा व्हिडिओ 2018 सालच्या राम नवमीचा असल्याचे आढळले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा गुलबर्गामधील राम नवमी उत्सव आहे.” 

मूळ पोस्ट – युट्यूब

वरील व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, या ठिकाणी “ज्यांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणायचे असेल त्यांनी इथे राहू नये.” असे नारे दिण्यात आले नाही. अर्थात व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

वरील माहितीच्या आधारे सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मशिद कर्नाटकमधील कलबुर्गी शहरातील बारगाह-ए-कादरी चमन दर्गा आहे.

गुगल मॅप्सवर सर्च केल्यावर या जागेचा शोध लागला. खालील मॅपमध्ये आपण बारगाह-ए-कादरी चमन दर्गा हे नाव पाहू शकतात.

मूळ पोस्ट – गुगल मॅप

खाली दिलेल्या मॅपमध्ये आपण तीच दर्गा पाहू शकतो. हा फोटो कलबुर्गी शहरातील बारगाह-ए-कादरी चमन दर्ग्याचा आहे.

मूळ पोस्ट – गुगल मॅप

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील मशिदी आणि मॅपमध्ये दिसणारी बारगाह-ए-कादरी चमन दर्गा ही एकच आहे.

कलबुर्गी येथे रामनवमी

अनेक वर्षांपासून या ठिकाणी बारगाह-ए-कादरी चमन दर्गा समोरुन रामनवमीची मिरवणूक जाते. या वर्षीदेखील 30 मार्च रोजी मिरवणूक काढण्यात आली होती. ज्यामध्ये शेकडो तरुण भगव्या टोप्या परिधान करून आणि झेंडे घेऊन सहभागी झाले होते.

तसेच या धार्मिक उत्सवात मुस्लिम तरुणांनी राम भक्तांना रस वाटप केल्याने हा उत्सव जातीय सलोख्याचे उदाहरण ठेवला. अधिक माहिती आपण येथे पाहू शकतात.

उज्जैनमधील घटना

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात कथित रित्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’सह देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केले होते. परंतु, ही घटना 2021 मध्ये घडली होती. अधिक माहिती आपण येथे पाहू शकतात.

तेव्हापासून याच मिरवणुकीच्या व्हिडिओसोबत हा दावा व्हायरल होता आहे.

परंतु, सध्या अशी कोणतीही घटना उज्जैनमध्ये घडलेली नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्घ होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळात हा व्हिडिओ कलबुर्गीतील राम नवमीचा आहे. या ठिकाणी कोणतेही ‘पाकिस्तान विरोधी’ नारे देण्यात आले नव्हते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होता आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उज्जैनमध्ये हिंदू जमावाने मशिदीसमोर पाकिस्तान समर्थकांना विरोध दर्शविण्यासाठी नारे दिले होते का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False