हरियाणात अलिकडे झालेल्या आंदोलनाच्या नावे तीन वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल; वाचा सत्य

Partly False सामाजिक

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांविरोधात हरियाणातील शेतकऱ्यांनी कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे 10 सप्टेंबर 2020 रोजी आंदोलन केले. या आंदोलनाची विविध छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. 

यातील एका छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता कळाले, ते तीन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनाचे आहे.

काय आहे दावा?

Haryana claim.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी 

पोस्टमधील दोन्ही छायाचित्रांनी गुगल रिव्हर्स इमेज व की-वर्ड्सच्या सहाय्याने सर्च केले असता पुढील प्रमाणे तथ्य समोर आले.

छायाचित्र क्र. 1

पत्रिका या संकेतस्थळाने 4 सप्टेंबर 2017 रोजी दिलेल्या वृत्तानुसार राजस्थानमधील सीकर येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या किसान रॅलीचे हे छायाचित्र आहे. या रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. 

screenshot-www.patrika.com-2020.09.12-18_51_49.png

पत्रिका संकेतस्थळाचे वृत्त ।  संग्रहित

छायाचित्र क्र. 2

द इंडियन एक्स्प्रेसने (संग्रहित) 11 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या वृत्तानुसार हरियाणातील कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे 10 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या आंदोलनाचे हे छायाचित्र आहे. पत्रकार अनिता जोशूआ यांनी हे छायाचित्र दिल्ली-चंदीगड महामार्गावरील पिपली येथील शेतकरी आंदोलनाचे असल्याचे ट्विट 10 सप्टेंबर 2020 रोजी केल्याचेही आपण खाली पाहू शकता. 

संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, पहिले छायाचित्र हरियाणात 10 सप्टेंबर रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनाचे नसून 2017 मधील राजस्थानातील शेतकरी आंदोलनाचे आहे. दुसरे छायाचित्र हे हरियाणात झालेले शेतकरी आंदोलनाचे आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळली आहे.

Avatar

Title:हरियाणात अलिकडे झालेल्या आंदोलनाच्या नावे तीन वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False