मेट्रोचा पुल कोसळल्याची ही छायाचित्रे मुंबई, पुण्यातील आहेत का? वाचा सत्य

False सामाजिक

पुण्यातील विमाननगर चौक, पिंपरीतील फिनोलेक्स चौक, मुंबईतील लोअर परळ,  गुजरातमधील अहमदाबाद येथे मेट्रोचा पुल कोसळल्याची म्हणून सध्या समाजमाध्यमात काही छायाचित्रे व्हायरल होत आहे. यापैकी कोणत्या शहरात अशी काही घटना घडली आहे का? ही छायाचित्रे नेमकी कुठली आहेत, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

पुण्यातील विमाननगर चौकातील मेट्रोचा पुल कोसळल्याचे म्हणून व्हायरल होत असलेला छायाचित्र आणि संदेश आपण खाली पाहू शकता.

screenshot-web.whatsapp.com-2020.08.26-09_28_25.png

तथ्य पडताळणी

पुणे किंवा मुंबई येथील मेट्रोचा पुल पडल्याची ही छायाचित्रे आहेत का, याचा शोध घेतला. त्यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी ही छायाचित्रे पुण्यातील नसल्याचे स्पष्ट केल्याचे दिसून आले.

संग्रहित 

त्यानंतर पुणे मेट्रोच्या नगर रोडवरील पुलाचे काम सध्यस्थितीत म्हणजेच 25 ऑगस्ट 2020 रोजी कसे सुरू आहे, हे स्पष्ट करणारा एक व्हिडिओ देखील युटूयूबवर दिसून आला. 

संग्रहित

एमएमआरडीएचे सहआयुक्त, डॉ. बापू गोपीनाथराव पवार यांनी अशी कोणतीही घटना कोणत्याही साईटवर घडलेली नाही. एमएमआरडीएचे दक्षिण मुंबईत असे कोणतेही काम सुरू नाही. नागरिकांनी याबाबत एमएमआरडीएला ट्विट करुन विचारणा केल्यावर त्याला उत्तर देताना एमएमआरडीएने हे सत्य नसल्याचे स्पष्ट केले. 

संग्रहित

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही छायाचित्रे 22 ऑगस्ट 2020 रोजी ट्विट करत ही घटना सोहना रोड, गुरूग्राम येथे घडल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित 

एएनआय या वृत्तसंस्थेने आणि हिंदूस्थान टाईम्सने याबाबत केलेले ट्विटही तुम्ही पाहू शकता. दैनिक जागरणने त्यांच्या युटूयूब चॅनलवर याबाबत दिलेले वृत्तही आपण पाहू शकता.

संग्रहित

निष्कर्ष 

पुणे आणि मुंबई येथील मेट्रोचा पुल कोसळल्याचा ही छायाचित्रे असल्याचा दावा असत्य आहे. ही छायाचित्रे गुरूग्राम येथील निर्माणाधीन पुल कोसळल्याची आहेत. 

Avatar

Title:मेट्रोचा पुल कोसळल्याची ही छायाचित्रे मुंबई, पुण्यातील आहेत का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False