ऑस्ट्रेलियात बीफ विकणाऱ्या ‘Brahman Pies’ हॉटेलचा भारतीय ब्राह्मणांशी काही संबंध आहे का?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भारतात गाईला पवित्र म्हणणारे ब्राह्मण विदेशात गोमांसापासून तयार केलेल्या व्यंजनाचे हॉटेल चालवितात अशा दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ‘Brahman Pies’ नामक एका हॉटेलचा फोटो शेअर करून भारतीय ब्राह्मणांचा दुटप्पीपणा उघडकीस आल्याचे म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सोशल मीडियावरील दावे असत्य आहेत. या हॉटेलचा भारत किंवा ब्राह्मणांशी काही संबंध नाही.

काय आहे दावा?

‘Brahman Pies’ नावाच्या हॉटेलचा फोटो शेअर करून म्हटले की, “ब्राह्मण हे गोमांस खात असत; पण मूळनिवासी लोकांचा रोष नको म्हणून त्यांनी गोमांस सोडले. पण आताही 97% लोक चोरून गोमांस खातात.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

विशेष म्हणजे गेल्या वर्षी राजरत्न आंबेडकर यांनी फेसबुकवर व्हिडिओद्वारे हाच दावा केला होता. 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शोधले की, ऑस्ट्रेलियामध्ये असे हॉटेल कुठे आहे. तेव्हा कळाले की, तेथील क्वीन्सलँड प्रांतामधील बुंडामा शहरातील मॉलमधील ‘ब्राह्मण पाईज’ नावाचे हॉटेल आहे. त्याचा हा फोटो आहे.

मग आम्ही या हॉटेलच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. तेथील About Us सेक्शनमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ब्राह्मण पाईज नावाचे हे हॉटेल पूर्णतः ऑस्ट्रेलियन मालकीचे आहे.

हॉटेलसंबंधी सोशल मीडियावर दावे व्हायरल होऊ लागल्यानंतर ‘Brahman Pies’ व्यवस्थपनाने फेसबुकवर खुलासा केला होता की, सर्व दावे खोटे आहेत. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

“Brahman Pies ही शंभर टक्के ऑस्ट्रेलियन कंपनी असून, आमचा भारतातील ब्राह्मण (Brahmin) जातीशी काही संबंध नाही. आमच्या हॉटेलचे नाव Brahman असून, भारतातील ब्राह्मणांची स्पेलिंग Brahmin आहे. दोन्ही वेगळ्या आहेत,” असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

या हॉटेलचे नाव ‘Brahman Pies’ असे का ठेवण्यात आले याचेदेखील कारण त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये विपुल प्रमाणात आढळणाऱ्या Brahman प्रजातीच्या गोवंशावरून हॉटेलचे नाव ठेवण्यात आले आहे.

Brahman गोवंश मूळतः विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत विकसित करण्यात आला होता. भारतातून आणलेल्या गोवंशातून तो तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्याला Brahman असे नाव पडले.

मूळ वेबसाईट – ऑस्ट्रेलियन ब्राह्मण

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ऑस्ट्रेलियातील ‘Brahman Pies’ नावाच्या हॉटेलशी भारतीय ब्राह्मणांशी काही संबंध नाही. केवळ नावाशी साधर्म्य असल्यामुळे सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविली जात आहे.

[आपल्याकडेदेखील असेच संशयास्पद मेसेज असतील तर पडताळणीसाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) फॉरवर्ड करा किंवा या क्रमांकावर ‘Hi’ मेसेज पाठवून लेटेस्ट फॅक्ट-चेकसुद्धा वाचा – तेसुद्धा आपल्या आवडीच्या 8 भाषांमध्ये !] 

Avatar

Title:ऑस्ट्रेलियात बीफ विकणाऱ्या ‘Brahman Pies’ हॉटेलचा भारतीय ब्राह्मणांशी काही संबंध आहे का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •