दिल्ली दंगलीमध्ये केजरीवाल सरकार केवळ मुस्लिमांना मदत करण्यासंबंधीची जाहिरात खोटी. वाचा सत्य

False राजकीय | Political

दिल्ली दंगलीमध्ये नुकसान झालेल्या पीडितांना मदत करण्याची दिल्ली सरकारने घोषणा केली आहे. यासंबंध पेपरमध्ये जाहिरातदेखील देण्यात आली होती. अशाच एका जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये केवळ मुस्लिम पीडितांनाच सरकार मदत करणार असल्याचा दावा या फोटोद्वारे केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले.

काय आहे पोस्टमध्ये?

दिल्ली सरकारने दंगली पीडितांसाठी सहाय्यता म्हणून निधी घोषित केल्याची जाहिरात पेपरमध्ये दिली होती. या जाहिरातीच्या फोटोमध्ये हा निधी केवळ मुस्लिमांसाठी असल्याचे दाखविण्यात आले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर हा फोटो फिरत आहे. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो फोटोशॉप केलेला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी मूळ फोटो शेयर केलेला आहे. 

दोन्हींची तुलना खाली पाहू शकता.

दिल्ली सरकार तर्फे दैनिक जागरणमध्ये याविषयी 29 फेब्रुवारी 2020 रोजी पान क्र. 12 वर जाहिरीत देण्यात आली होती. ती तुम्ही खाली पाहू शकता.

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याची माहिती देण्यात आली होती. सोबत दिले की, दंगलीच्या पीडितांना दिल्ली सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या मदतीचे हे विवरण आहे. दिल्ली दंगलीतील पीडितांपर्यंत ही माहिती पोहचविण्यात मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. 

‘आप’च्या फेसबुकवरून देखील हा फॉर्म देण्यात आला होता. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

निष्कर्ष

यावरून लक्षात येईल की, दिल्ली सरकारने केवळ मुस्लिम पीडितांना मदत जाहीर केलेली नाही. तो फोटो एडिट केलेला आहे. दिल्ली सरकारने धर्माच्या आधारावर सहाय्यता निधी दिलेला नाही. 

Avatar

Title:दिल्ली दंगलीमध्ये केजरीवाल सरकार केवळ मुस्लिमांना मदत करण्यासंबंधीची जाहिरात खोटी. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False