
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मुस्लीम कुराणानुसार चालणार असे वक्तव्य केल्याची एक पोस्ट Ajay Dongre यांनी १ करोड राजसाहेब समर्थकांचा फेसबुक ग्रुप- १ॲड झाल्यास त्याने १०समर्थक ॲड करा या ग्रुपवर शेअर केली आहे. ही मूळ पोस्ट Alok Mani Tripathi यांची आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कुराणाबद्दल काही वक्तव्य केले आहे का, याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आम्हाला महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाने दिलेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी याप्रकरणी कुराण जे म्हणेल तेच मान्य असेल, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र टुडे / Archive
कुराणमध्ये जे लिहिलंय त्यालाच माझ्या पक्षाचा पाठिंबा असे आझम खान यांनी म्हटल्याचे वृत्त दैनिक लोकसत्तानेही दिले आहे. द सियासत डेली ने दिलेल्या वृत्तानुसार आझम खान यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर बोलताना हा मुस्लिमांचे अंतर्गत प्रकरण असल्याचे म्हणत याप्रकरणी कुराण जे म्हणेल तेच मान्य असेल, असे म्हटले आहे. महिलांविषयी सहानुभूती असणारे सबरीमालाच्या वेळी कुठे गेले होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भारत हा जगातील एक उत्कृष्ट देश आहे त्याला तसेच राहु द्या, असेही त्यांनी म्हटलंय.
डेली हंटने दिलेल्या वृत्तानुसारही आझम खान यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर बोलताना, याबाबत कुराणमध्ये जे लिहिले आहे तीच आपल्या पक्षाची या मुद्दयावर भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे.
न्यूज 18 इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत आझम खान यांनी या विषयावर नेमके काय म्हटले आहे हे आपण खालील व्हिडिओत 2 मिनिटे 10 सेकंद ते 2 मिनिटे 41 सेकंद या कालावधीत पाहू शकता.
निष्कर्ष
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी तिहेरी तलाकच्या मुदद्यावर प्रतिक्रिया देताना मुसलमान कुराणानुसार चालणार असे म्हटले आहे. त्यांनी कुठेही संविधानाला विरोध केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य आढळून आली आहे.

Title:Fact Check : आझम खान यांनी मुस्लीम कुराणानुसार चालणार असं म्हटलंय का?
Fact Check By: Dattatray GholapResult: Mixture
