तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

पश्चिम तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी भागात गेल्या शुक्रवारी (30 ऑक्टोबर) 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तडाखा दिला. आतापर्यंत 64 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे. 

सध्या सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो फिरत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, हा फोटो तुर्कीमध्ये नुकतेच आलेल्या भूकंपाचा नाही.

काय आहे दावा? 

ढीगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीजवळ बसलेल्या कुत्र्याचा फोटो शेयर करून म्हटले की, “तुर्कस्थानमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर प्राण्यांचा माणसाप्रती असलेला जिव्हाळा दर्शविणारी छायाचित्रे.”

Turkey images.png

Facebook | Archive

तथ्य पडताळणी

तुर्कीतील भुकंपाची ही छायाचित्रे आहेत का, याचा शोध घेण्यासाठी ही दोन्ही छायाचित्रे रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी ही छायाचित्रे नुकत्याच झालेल्या भूकंपाची नसल्याचे दिसून आले.

ही दोन्ही छायाचित्रे 18 ऑक्टोबर 2018 पासून अ‍ॅलेमी या स्टॉक फोटो वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते जारोस्लाव नोस्का नावाच्या याचित्रकाराने ती टिपलेली आहेत.

अ‍ॅलेमीArchive

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, तुर्कस्थानात 30 ऑक्टोबर 2020 आलेल्या भुकंपानंतरची ही छायाचित्रे असल्याचा दावा असत्य आहे. ती 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

Avatar

Title:तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False