महाराष्ट्र सरकारने ई-पास रद्द केलेला नाही; वाचा सत्य

False सामाजिक

महाराष्ट्र शासनाने ई-पास रद्द केला असून, जिल्ह्यात प्रवेश करताना केवळ तुमचे तापमान तपासले जाईल, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, ई-पास रद्द करण्यात आलेला नाही.

काय आहे पोस्टमध्ये?

screenshot-www.facebook.com-2020.08.05-09_23_27.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

दैनिक लोकसत्ताने 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले की, गणेशोत्सवात कोकणात एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना ई-पासची गरज नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य आहे. 

लोकसत्तासंग्रहित

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले खाली दिलेल्या व्हिडियोच्या 3.06 मिनिटांपासून पुढे हे पाहू शकता. 

संग्रहित

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ट्विटर खात्यास भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही ई-पासची गरज भासणार नाही, असे म्हटले असल्याचे दिसून येते. म्हणजे हा निर्णय केवळ कोकणातील गणेशोत्सवापूरता मर्यादित आहे.

संग्रहित

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ट्विटरवर सांगितले की, 5 ते 12 ऑगस्ट दरम्यान कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना ई-पास ची गरज नाही. 12 ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांनी स्वब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे.

संग्रहित

निष्कर्ष 

महाराष्ट्र सरकारने ई-पास रद्द केलेला नाही. केवळ कोकणात गणेशोत्सवानिमित्त एसटीने जाणाऱ्यांना ई-पास लागणार नाही. खासगी वाहनांसाठी ई-पास हा अनिवार्य आहे.

Avatar

Title:महाराष्ट्र सरकारने ई-पास रद्द केलेला नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False