तथ्य पडताळणी : काश्मीर खोऱ्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर पडसाद उमटले नाहीत का?

False राजकीय | Political

मी एक भारतीय आहे, मला लाज वाटते की एका तीन वर्षाच्या मुलीवर रमजान महिन्यात बलात्कार झाला आहे आणि त्यावर कठुआच्या घटनेनंतर जशी प्रतिक्रिया उमटली तशी कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने खरंच या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली की नाही, याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

काश्मीर खोऱ्यात नेमकी बलात्काराची अशी कोणती घटना घडली आहे. ज्या घटनेत ताहीर अहमद मीर याला अटक करण्यात आली आहे. हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला द वायर या संकेतस्थळावरील खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात ताहीर अहमद मीर या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आला असून त्याला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे दिसून येते. याच वृत्तात आणि या वृत्ताच्या शीर्षकात या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर निर्दशने सुरु असल्याचे म्हटलं आहे.

अक्राईव्ह

काश्मीर खोऱ्यातील या घटनेचे वृत्तांकन मराठी माध्यमांनीही मोठ्या प्रमाणावर केले असल्याचे दिसून येत आहे. यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून काश्मीर खोऱ्यात तीव्र आंदोलन सुरू असल्याचे म्हटले आहे. न्यूज 18 लोकमतने याबद्दलचे दिलेले वृत्त तुम्ही खाली पाहू शकता.

अक्राईव्ह

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप असून समाजातील सर्व घटकांनी याचा निषेध केला असल्याचे वृत्त स्क्रोल या संकेतस्थळाने दिले आहे. याच वृत्तात या घटनेनंतर समाजमाध्यमांमध्ये याबाबतचे विविध चुकीचे आणि खोटे व्हिडिओ पसरविण्यात येत असल्याचेही स्पष्टपणे म्हटले आहे.

अक्राईव्ह

न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तात पोलिसांनी या घटनेबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई केल्याचे म्हटल्याचे सांगितले आहे. नागरिकांची मागणी मात्र अधिक कडक कायदा करण्याची गरज व्यक्त केल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ 13 मे 2019 रोजीचा असून त्यानंतर काश्मीर खोऱ्यात या घटनेनंतर होणारी निदर्शने कमी झाल्याची शक्यता आहे.

https://lokmat.news18.com/national/protest-against-the-rape-of-a-3-year-old-girl-in-pulwama-update-rd-373023.html

जम्मू काश्मीरमधील विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला असल्याचे दिसून येते.

निष्कर्ष

काश्मीर खोऱ्यात 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत नराधमाने दुष्कृत्य केल्यानंतर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही, हा पोस्टकर्त्याने केलेला दावा असत्य आहे. या घटनेनंतर या नराधमाविरोधात तीव्र स्वरुपाची निदर्शने काश्मीर खोऱ्यात झाली आहे. यात नागरिकांनी या घटनेचा निषेध करताना आरोपीला कडक शासन करण्याची मागणी केली आहे. याबाबतच्या कायद्यात अधिक सुधारणा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत पोस्टकर्त्याचा दावा असत्य सिध्द झाला आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : काश्मीर खोऱ्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कारानंतर पडसाद उमटले नाहीत का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False