
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका जेष्ठ महिलेच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, त्या वहिदा रेहमान आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील नृत्य करणारी महिला वहिदा रेहमान नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये जेष्ठ महिला ‘आज फिर जीने का तमन्ना है |’ या हिंदी गाण्यावर नाचताना दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “वयाच्या ८५ व्या वर्षी वहिदा रेहमान यांचा क्लासिकल डान्स.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हड सर्च केल्यावर ‘मायोखा’ नावाच्या चॅनेलने व्हायरल व्हिडिओ 2 जानेवारी 2022 रोजी अपलोड केलेला आढळला. हे चॅनल सुनिला अशोक नावाच्या महिलेचे आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मायोखा – आज फिर जीने की तमन्ना है | (डान्स कव्हर)”
आपला डान्सचा व्हिडिओ ‘वहिदा रेहमान’च्या नावाने व्हायरल झाल्यावर 27 सप्टेंबर रोजी त्यांनी तोच व्हायरल व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या डान्सचा व्हिडिओ वहिदा रेहमानच्या नावाने व्हायरल होत आहे, हे माला माझ्या मित्र-परिवारांकडून कळाले. माझी तुलना वहिदा रेहमानशी केली गेली ही माझासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. तसेच प्रेक्षकांकडून मला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मी भारावून गेलो आहे.”

तसेच बजाज अलियान्झ लाइफच्या निवृत्तीनंतर सुपरस्टार नावाच्या रिअॅलिटी शोचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिकवणीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा डान्स कसे सुरू केले याबद्दल बोलत आहेत.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमध्ये डान्य करणारी महिला वहिदा रेहमान नसून सुनिला अशोक आहे.

वहिदा रेहमान
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी आपली निवड झाल्यावर वहिदा रेहमान यांनी आनंद व्यक्त केला आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये डान्स करणारी महिला वहिदा रेहमान नसून सुनिला अशोक आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:व्हायरल व्हिडओमध्ये नृत्य करणारी महिला खरंच वहिदा रहेमान आहे का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
