पंजाबमधील NRC विरोधी रॅली म्हणून जुन्या आंदोलनाचा व्हिडियो व्हायरल

False सामाजिक

पंजाबमध्ये झालेल्या एनआरसी-विरोधात रॅली काढण्यात आली, अशा दाव्यासह एक व्हिडियो सोशल मीडियावर पसरविला जात आहे. या रॅलीच्या ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याचे पोस्टमध्ये म्हटले जात आहे. अनेक युजर्सने हा व्हिडियो शेयर करून उत्तर पोलिसांप्रमाणेच यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

NRC Protest in Uttar Pradesh And Panjab FB Claim.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी

सदरी व्हिडियोतील की-फ्रेम निवडणू गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर चार वर्षांपूर्वीचा एक व्हिडियो मिळाला. खालसा गाटका ग्रुप नावाच्या युट्यूब अकाउंटवर 25 मे 2016 रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. म्हणजे हा व्हिडिओ जुना आहे. हा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता. 

हिंदुस्थान टाईम्सच्या 25 मे 2016 रोजीच्या बातमीनुसार, शिवसेनेच्या ललकार रॅलीविरोधात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, असे म्हटले आहे. 

image1.png

हिंदूस्थान टाईम्सचे सविस्तर वृत्त / Archive

खालसा गाटका समुहाचे प्रशासक भुपिंदर सिंह यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ही रॅली एनआरसीशी संबंधित नाही. हा व्हिडिओ चार वर्ष जुना आहे. शीख समाजाने शिवसेनेच्या ललकार रॅलीविरोधात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरली व्यास नदीच्या पुलावर हे आंदोलन केले होते. 

ग्लोबल पंजाब टीव्हीने याबाबत सविस्तर वृत्त दिलेले आहे.

Archive 

निष्कर्ष 

यातून स्पष्ट होते की, पंजाबमध्ये काढण्यात आलेल्या एनआरसी विरोधातील रॅलीचा हा व्हिडियो नाही. हा व्हिडियो 2016 साली शीख समाजाने शिवसेनेच्या ललकार आंदोलनाविरोधात काढलेल्या रॅलीचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:पंजाबमधील NRC विरोधी रॅली म्हणून जुन्या आंदोलनाचा व्हिडियो व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False