केरळ किनारपट्टीवरून दिसलेले सूर्यग्रहण म्हणून दक्षिण अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य

False आंतरराष्ट्रीय सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी झाले. भारतातील विविध शहरातून हे ग्रहण दिसले. कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. अशाप्रकारचे ग्रहण दुर्मिळ असल्याने याबाबत खूप उत्सुकता होती.

सकाळपासूनच सोशल मीडियावर सूर्यग्रहणाचे अनेक फोटो आणि व्हिडियो पसरू लागले. त्यापैकी एक म्हणजे केरळच्या किनारपट्टीवरून दिसलेल्या सूर्यग्रहणाचा व्हिडियो प्रंचड गाजतोय. यामध्ये ग्रहण लागल्यावर एका क्षणात अंधार पडल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसोंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

30 सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये किनारपट्टीवर उभे राहून लोक सूर्यग्रहण पाहत आहेत. ग्रहण लागल्यावर एका क्षणात सगळीकडे अंधार पडतो. काहीजण हा व्हिडियो केरळमधील असल्याचे म्हणत आहेत तर, काही जण तो भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील असल्याचे सांगत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता सत्य वेगळेच असल्याचे समोर आले. 

मूळ पोस्ट येते पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

26 डिसेंबर रोजी झालेले सूर्यग्रहण सकाळच्या वेळी झाले. तसचे ते कंकणाकृती होते. 

केरळ किनारपट्टी पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी किनारपट्टीवरून समुद्रावर सूर्य दिसणार नाही. तसेच सदरील व्हिडियोत दिसणारे ग्रहण खग्रास सूर्यग्रहण आहे. यावरून या व्हिडियोची सत्यता शंकास्पद वाटते.

व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडियो दक्षिण अमेरिकेत 2 जुलै 2019 रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा आहे.

हा व्हिडियो युट्यूबवर जुलै महिन्यात अपलोड करण्यात आल्याचे आढळले. व्हिडियोच्या शीर्षकानुसार हा दक्षिण अमेरिकेमध्ये चित्रित करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

ट्विटरवरदेखील 3 जुलै रोजी हा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. ट्विटमध्ये म्हटले की, ग्रहणाचा हा व्हिडियो दक्षिण अमेरिकेत चित्रित करण्यात आला आहे. सुमारे दोन मिनिटे हे ग्रहण चालले होते.

याचाच अर्थ की, हा व्हिडियो पाच महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. बिझनेस इनसायडरच्या बातमीनुसार, दक्षिण अमेरिकेच्या चिली व अर्जेटिना देशातील काही भागातून 2 जुलै रोजी सायंकाळच्या वेळी खग्रास ग्रहण दिसले होते. हे ग्रहण केवल याच भागात दिसले. चिलीच्या पश्चिम किनारपट्टीवरील ला सेरेना शहरात सर्वप्रथम अंधार पडण्यास सुरुवात झाली होती.

मूळ बातमी येथे वाचा – बिझनेस इनसायडरगार्डियन

या ग्रहणाचे इतर व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता

निष्कर्ष

यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो केरळ किंवा भारतातील नाही. हा व्हिडियो दक्षिण अमेरिकेत 2 जुलै 2019 रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा आहे. 

Avatar

Title:केरळ किनारपट्टीवरून दिसलेले सूर्यग्रहण म्हणून दक्षिण अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •