दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन हे जगातील पाणी विरहित शहर आहे का? : सत्य पडताळणी

False आंतरराष्ट्रीय

सोशल मीडियावर सध्या पाणी प्रश्न किती गंभीर बनत चाललाय या आशयाची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर जगातील पहिले पाणी विरहित शहर असल्याचे म्हटले आहे. जगात फक्त 2.7 टक्केच पिण्यायोग्य पाणी आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच पाणी भरण्यासाठी हातात रिकाम्या कॅन आणि पाणी बॉटल्स घेऊन रांगेत उभे असणारे लोक दिसत आहेत. फॅक्ट क्रेसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत या पोस्टला फेसबुकवर तुफान या पेजवर 5 हजार शेअर, 3 हजार 400 लाईक्स आणि 295 कमेंटस् मिळाले आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

ही पोस्ट सोशल मीडियावर इतर फेसबुक अकाउंट आणि पेजवरुन व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दक्षिण आफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 14 एप्रिल 2019 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे. त्याचप्रमाणे या पोस्टमध्ये लोकं हातात रिकाम्या पाणी कॅन आणि रिकाम्या पाणी बॉटल्स घेऊन रांगेत उभे असा फोटो आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्ट संदर्भात सत्य शोधण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडो टीमने गुगलवर रिव्हर्स ईमेज केले. त्यानंतर व्हायरल होणारा फोटो हा केपटाऊनमधील नागरिकांचाच आहे हे समोर आले.

केपटाऊन शहरात मागच्या चार वर्षांपासून पाऊस कमी पडल्याने, दुष्काळ परीस्थिती नियंत्रणाच्या उद्देशाने स्थानिक लोकांना पाणी वापर जागरुकतेसाठी डे झिरो ही संकल्पना पुढे आली. डे झिरो म्हणजे सार्वजनिक पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची तारीख. या संदर्भात अंदाजे तारख्या केपटाऊन सरकारकडून ठरवण्यात येत होत्या. केपटाऊन शहरातील धरणातील पाणी लेवल कमी होत असल्या कारणाने जसा जसा पाणी साठा कमी होत गेला तस तसे पाणी वापरावर लेवल 1 पासून लेवल 6 पर्यंत नागरिकांना पाणी वापरासाठी निर्बंध घालण्यात आले.

या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सीक्यु न्यूजअर्काईव्ह

नॅशनल जिओग्राफिकअर्काईव्ह

लोकांच्या पाणी वापर संदर्भातील जागरुकतेमुळे हळूहळू झिरो डे याची तारीख पुढे पुढे ढकलण्यात आली.

स्काय मेट वेदरअर्काईव्ह

झिरो डे च्या चर्चेने केपटाऊन शहरातील नागरिकांनी पाणी बचत करत, सरकारच्या प्रयत्नांना साथ देत पाणी जपून वापरले. त्यामुळे झिरो डे लांबत जात पुढे ढकलण्यात सरकारला यश आले. त्यामुळे आता केपटाऊन धरणांतील पाणी लेवलमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केपटाऊन सरकारने केपटाऊन शहरासाठी असणाऱ्या धरणातील पाणी पातळी वाढली आहे याबद्दल डाटा शहराच्या सरकारी ऑफिशिअल वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर डाटा आणि माहिती वाचू शकता.

सिटी ऑफ केपटाऊनअर्काईव्ह
वॉटर डॅशबोर्ड केपटाऊन सरकारी अधिकृत वेबसाईटअर्काईव्ह

साऊथ आफ्रिकेच्या सरकारी अधिकृत पाणी व्यवस्थापन वेबसाईटवर देखील धरणातील पाणी पातळी वाढल्याचा मीडिया रिपोर्ट खाली देण्यात येत आहे.

साऊथ आफ्रिका मीडिया रिपोर्टअर्काईव्ह

साऊथ आफ्रिका मीडिया रिपोर्टअर्काईव्ह

सर्व प्रयत्नानंतर आता केपटाऊन शहरातील पाणी प्रश्न संदर्भातील डे झिरो ही परिस्थिती सुधारत गेली. आता वर्तमान काळात सध्या तरी 14 एप्रिल नंतर केपटाऊनमध्ये डे झिरो लागू होणार नाही. या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

न्यूज 24अर्काईव्ह

ऑल अफ्रिकाअर्काईव्ह

क्वॉर्टस् अफ्रिकाअर्काईव्ह

REUTERS l अर्काईव्ह  

खबऱ्याअर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या संपुर्ण पोस्ट दक्षिण आफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 14 एप्रिल 2019 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल. पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं. जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे. या विषयाबद्दल संशोधन केल्यानंतर 14 एप्रिल 2019 नंतर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर जाहीर झालेले नाही. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर हे तथ्य खोटे आहे.

जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे हे का?

जगात सध्या 2.5%  पाणी पिण्यायोग्य पाणी आहे असा रिपोर्ट नॅशनल जिओग्राफिक वेबसाईट माहिती देण्यात आली आहे.

नॅशनल जिओग्राफिकअर्काईव्ह

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट दक्षिण आफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 14 एप्रिल 2019 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे यामधील केपटाऊन जगातील पहिलं शहर पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे हे तथ्य खोटे आहे. तसेच जगात फक्त 2.7 % टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे हे तथ्य खोटे असून जगात फक्त 2.5 % पिण्यायोग्य पाणी आहे.

Avatar

Title:दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन हे जगातील पाणी विरहित शहर आहे का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False