
एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिवकुमार एक पुस्तक फाडताना दिसतात.
या व्हायरल व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, “मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकातील भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात छापलेले ‘वीर सावरकर’ यांच्यावरील पुस्तक फाडले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये डी. के. शिवकुमार यांनी सावरकरांचा धडा असलेले पाठ्यापुस्तक फाडले नाही. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये डी. के. शिवकुमार एक पुस्तक फाडताना दिसतात.
युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भाजप सरकारने कर्नाटक शालेय अभ्यासक्रमात सावरकरांवरील पुस्तक प्रकाशित केले आणि आमचे काँग्रेसचे सिंह डी.के. शिवकुमारांनी तो धडा पूर्ण केला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, टीव्ही-9 कन्नडाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ 18 जून 2022 रोजी अपलोड केला होता.
या व्हिडिओसोबत दिलेल्या महितीनुसार कर्नाटकातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी सुधारित पाठ्यपुस्तकाची प्रत फाडली होती.
अर्थात हा व्हिडिओ सध्याचा नसून मागिल वर्षीचा आहे.
इंडिया टूडेच्या बातमीनुसार 2020 मध्ये कर्नाटकमधील भाजप सरकारने पाठ्यपुस्तकात सुधारना करण्यासाठी समिती स्थापन केली. त्या समितीने वर्ग सहावी ते दहावी पर्यंतचे सामाजिक विज्ञान आणि वर्ग पहिली ते दहावी पर्यंतचे कन्नड भाषाचे पाठ्यपुस्तकात सुधारना केली. नंतर सुधारित पाठ्यपुस्तकाची छपाई करण्यात आली.
परंतु, या पुस्तकात स्वतंत्र सैनिक भगत सिंग, टिपू सुल्तान, लिंगायत समाजाचे सुधाकर बासवन्न, द्रविड आंदोलनाचे प्रमुख पेरियार, सुधाकर नारायण आणि स्वामी विवेकानंद यांचे धडे पाठ्यापुस्तकातुन कथितरित्या वगळण्यात आले होते.
त्यामुळे डी. के. शिवकुमार यांनी पाठ्यपुस्तकाची प्रत फाडून आपला विरोध दर्शवला होता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये डी. के. शिवकुमार यांनी वीर सावरकर यांच्यावरील पाठ्यपुस्तक फाडले नव्हते. 2020 मध्ये कर्नाटक पाठ्यपुस्तकात काही स्वतंत्र सैनिक आणि प्रमुख व्यक्तीचे धडे वगळण्यात आल्याने त्यांनी प्रत फाडून विरोध दर्शवला होता.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सावरकरांचा धडा असलेले पाठ्यपुस्तक डी. के. शिवकुमार यांनी फाडले नाही; जुना व्हिडिओ व्हायरल
Written By: Sagar RawateResult: MISSING CONTEXT
