सत्य पडताळणी : एड्सने ग्रासलेला हा अभिनेता झाला आहे का बेघर?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

(फोटो सौजन्य : मिरर डॉट युके आणि बीबीसी)

एड्सने ग्रासलेल्या या अभिनेत्याजवळ जगण्यासाठी आहेत कमी दिवस, सध्या आहे बेघर असे शीर्षक असलेले वृत्त लोकमत या दैनिकाच्या संकेतस्थळाने प्रसिध्द केले आहे. या वृत्ताची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

एगहेड्स क्विज शोचा स्टार सीजे डि मूई गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स या आजाराने पी़डित आहे आणि आता त्याच्याकडे पैशांची कमतरता असल्याचे आम्ही याबाबतच्या माहितीचा शोध घेतला असल्याचे आम्हाला दिसून आले. याबाबतचे मुळ वृत्त www.mirror.co.uk या संकेतस्थळाने प्रसिध्द केले आहे. या वृत्तात मूई या बेघर होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे म्हणजेच तो अद्याप बेघर झालेला नाही. त्याच्यासाठी निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त देताना येत्या काही दिवसात मुई बेघर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

क्विंट हिंदीनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. मैं एड्स से मर रहा और बेघर होने वाला हूं : मूई असे शीर्षक या वृत्ताला देण्यात आले आहे. अब तो नौबत यह है कि उन्हें अपने घर से भी हाथ धोना पड़ सकता है, असे या वृत्तात म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

एबीपी न्यूजनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्ताच्या शीर्षकातच एड्स से मर रहा है अमेरिकन टीवी स्टार, बताया- जल्द ही बेघर होने वाला हूं असे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

एगहेड्स क्विज शोचा स्टार सीजे डि मूई याच्याबद्दल वृत्त देताना एड्सने ग्रासलेल्या या अभिनेत्याजवळ जगण्यासाठी आहेत कमी दिवस, सध्या आहे बेघर असे शीर्षक दिले आहे. प्रत्यक्षात एगहेड्स क्विज शोचा स्टार सीजे डि मूई हा बेघर नसून बेघर होण्याची शक्यता आहे. तो बेघर होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत आढळून आले आहे. त्यामुळे लोकमतच्या संकेतस्थळाने त्या वृत्ताला दिलेले शीर्षक चुकीचे आहे.  

Avatar

Title:सत्य पडताळणी : एड्सने ग्रासलेला हा अभिनेता झाला आहे का बेघर?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False Headline


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •