सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पत्रकाराला धमकी देत आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात प्रश्न विचारल्यास जीव गमवावा लागेल’ दावा केला जात आहे की, धमकी देणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडियो अर्धवट आहे. या मुलाखातमधील व्यक्ती भाजपचा पदाधिकारी नाही. तसेच त्याने पत्रकाराला धमकी दिली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती म्हणते की, पंकज जी, “तुमच्या प्रश्नावरून आम्हाला असे वाटते की, तुम्हाला तुमच्या घरातील सदस्यांची भीती वाटत नाही का? आम्ही तुम्हाला एक सल्ला देतो, भाजप सरकारच्या विरोधात प्रश्न विचाराल तर मारले जाल.”

युजर्स हा व्हिडिओ शअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भाजपच्या राजवटीत भाजप पदाधिकारी थेट पत्रकारांना मारण्याच्या धमक्या देत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे.

इंडिया टू डेने 17 नोव्हेंबर 2019 रोजी ही मुलाखत आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केली होती. व्हिडिओसोबत “मोदी- योगींना घाबरलेल्या बनारसचे मिश्राचे वादग्रस्त वक्तव्य” असा असा मथळा होता.

वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे नाव हरीश मिश्रा असून ते या ठिकाणी सुरूवातीपासूनच भाजप सरकारवर कडाडून टीका करत होते.

या व्हिडिओमध्ये 11:40 मिनीटावर पत्रकार प्रश्न विचारतात की, 'शेतकरी सातत्याने आत्महत्या करत आहेत; भाजप सरकार शेतकऱ्यांबाबत काय विचार करत आहे?'

त्यावर प्रत्युतर देताना मिश्रा म्हणतात की, “पंकज जी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही नक्कीच उत्तर देऊ, परंतु, तुमच्या प्रश्नावरून असे वाटते की, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चिंता वाटत नाही का? तुम्ही कोणाच्या राजवटीत आणि कोणाच्या विरुद्ध प्रश्न विचारता आहात, हे तुम्ही विसरले असाल, पण मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही बदलत्या भारतात राहत आहात. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच राज्य आहे. आपण आपल्या परिवाराची विचार करा. सरकार विरोधात प्रश्न विचारनारे लोक मारले जातात.”

पुढे व्हिडिओच्या 16:33 मिनिटांनी पत्रकाराने हरीश मिश्रा यांना आपण 2022 मध्ये कोणत्या पक्षाकडून निवडणुक लढवणार, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, “भाजपविरूद्ध जो कोणता पक्ष असेल त्यांच पक्षाकडून मी निवडणूक लढवणार.”

संपूर्ण मुलाखात पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, व्हिडीओमध्ये भाजप सदस्याकडून पत्रकारांना धमकी देण्यात आलेली नाही, तर काँग्रेस सेवादलाच्या सदस्याने भाजपवर टीका करताना केलेली टिप्पणी दाखवण्यात आली आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडियो अर्धवट आहे. या मुलाखातमधील व्यक्तीचे नाव हरीश मिश्रा असून भाजपचा पदाधिकारी नाही. तसेच त्यांनी पत्रकाराला धमकी दिलेली नाही. चुकीच्या दव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भाजप पदाधिकाऱ्याने पत्रकाराला ठार मारण्याची धमकी दिली का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading