डीन कुन्ट्झ या लेखकाने 40 वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती का? वाचा सत्य

Coronavirus Partly False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

प्रतिभावान लेखक काळाची पाऊले ओळखून लिखाण करीत असतात. कथा-कादंबऱ्यांमध्ये इतिहास आणि वर्तमानाच्या घडामोडींवरून भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधत असतात. मग सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत जर एका लेखकाने 40 वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते असे सांगितले तर? सोशल मीडियावर असाच दावा केला जात आहे.

व्हायरल पोस्टनुसार, डीन कुन्ट्झ या लेखकाने 1981 साली प्रकाशित केलेल्या ‘द आईज् ऑफ डार्कनेस’ नावाच्या कादंबरीत कोरोना व्हायरससारख्या विषाणूबाबत लिहिले होते. त्याची प्रचिती आज 2020 मध्ये येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या माहितीची सत्यता तपासण्याची विनंती केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही माहिती अर्धसत्य असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

युजरने ‘द आईज् ऑफ डार्कनेस’ या पुस्तकातील एका पानाचा फोटो शेयर करून म्हटले की, 1981 मध्ये “दि आयज ऑफ डार्कनेस” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यांचे लेखक नाव डीन कोंट्ज आहे. पृष्ठ page 353 मध्ये ज्याचे पृष्ठ. असे लिहिले गेले आहे की “कोरोना व्हायरस” चीनने त्याच्या मूळ गावी वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केला होता आणि नंतर चीनने त्याचा उपयोग गरीब लोकांची लोकसंख्या कमी करण्यासाठी जैविक शस्त्राच्या रूपात केला जेणेकरून ती एक सुपर पॉवर बनू शकेल. हो, अजीब इत्तफाक म्हणजे कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातीलही आहे आणि हळूहळू या विषाणूने संपूर्ण जगाचा ताबा अगदी चीनपर्यंत नेला. आणि या पुस्तकात कोरोना विषाणूचे नाव “वुहान 400” असे ठेवले गेले आहे. या पुस्तकात असे आधीच सांगितले गेले आहे की चीन नंतर या विषाणूचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून करेल. आणि चीनने ही अंमलबजावणी 2020 मध्ये केली आहे, ज्याचं दु:ख जग आज भोगत आहे.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक

तथ्य पडताळणी

डीन कुन्ट्झ यांच्या पुस्तकात खरंच असे लिहिले आहे काय याचा शोध घेतला. गुगल बुक्स येथे उपलब्ध असणाऱ्या मर्यादित प्रीव्ह्युवमध्ये कळाले की, ‘द आईज ऑफ द डार्कनेस’ (1981) पुस्तकात खरंच Wuhan-400 नावाच्या विषाणूचा उल्लेख आहे. ही कथा आहे एका आईची. क्रिस्टिना इवान्सच्या मुलाचा कॅम्पिंग ट्रीपमध्ये रहस्यमयी मृत्यू होतो. यानंतर तिला परलौकिक भास होऊ लागतात की, तो जिवंत आहे. मग ती शोध घेणे सुरू करते. तेव्हा तिला कळते तिच्या मुलाला एका अत्यंत धोकादायक विषाणूची (Wuhan-400) लागण झाली असून, तो विषाणू चीनमधील वुहान शहरात तयार करण्यात आला होता. अशी साधारणपणे ही गोष्ट आहे.

वुहान-400 व कोरोना व्हायरस वेगवेगळे

कांदबरीतील वुहान-400 आणि सध्या पसरत असेलेला कोरोना व्हायरस यांच्यामध्ये फरक आहे. कादंबरीतील विषाणू हा मानवनिर्मित होता. कोराना व्हायरस हा मानवनिर्मित नसल्याचे 27 आघाडीच्या आरोग्य संशोधकांनी पत्र काढून सांगतिले आहे. कादंबरीतील विषाणूमुळे मृत्यू होण्याचा दर 100 टक्के होता. कोरोना व्हायरसचा मृत्यूदर 3 ते 5 टक्के आहे. तसेच वुहान-400 विषाणूची लागण झाल्यावर केवळ 4 तास वेगले राहावे लागायचे. परंतु, कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर 14 दिवसांचा विलगीकरण काल आहे.

याचाच अर्थ की, डीन कुन्ट्झ यांच्या कादंबरीत वुहान-400 हा विषाणू जैविक हत्यार म्हणून विकसित करण्यात येते. कोरोना व्हायरस हा नैसर्गिकरीत्या तयार झाला असून, तो केवळ वुहान येथे प्रथम आढळला एवढाच काय योगायोग म्हणावा लागेल.

कादंबरीत आधी वुहान-400 नव्हता

ही कादंबरी सर्वप्रथम 1981 साली प्रकाशित झाली होती. या कादंबरीच्या सुरवातीच्या आवृत्त्यांमध्ये विषाणुचे नाव “Gorki-400” असे होते. आधी या कादंबरीमध्ये हे जैविक अस्त्र रशियामध्ये तयार झाल्याचे म्हटले होते. कादंबरीमध्ये इलया पोपरिपोव्ह नावाचा शास्त्रज्ञ रशियातून पळून अमेरिकेत येतो तेव्हा हा विषाणू सोबत घेऊन येतो.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ऐंशीच्या दशकाच्या शेवटी अमेरिका आणि रशियातील शीत युद्ध कमी होऊन दोन्ही देशांचे संबंध सुधारू लागले होते. त्यामुळे 1988-89 साली या पुस्तकाच्य नव्या आवृत्तीमध्ये रशियाला वाईट देश दाखवणे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी सयुक्तिक नव्हते. त्यामुळे कदाचित या कादंबरीत रशिया ऐवजी चीनमध्ये हा विषाणू तयार करण्यात आल्याचा बदल केला गेला. म्हणून Gorki-400 बनला Wuhan-400.

मूळ लेख येथे वाचा – साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट

हा धागा पकडून जेव्हा गुगल बुक्सवर या पुस्तकाची जुनी आवृत्ती तपासली असता कळाले की, डीन कुन्ट्झ यांनी टोपण नाव (Leigh Nichols) वापरून ही कादंबरी लिहिली होती.  नंतरच्या आवृत्त्यांमध्ये मात्र डीन कुन्टझ् यांनी स्वतःचे खरे नाव लावले. 

मूळ पोस्ट येथे पाहा – गुगल बुक्स

ABE Books नावाच्या पुस्तक विक्री वेबसाईट विक्रीस असलेल्या या पुस्तकाच्या विवरणामध्येदेखील म्हटले आहे की, काही आवृत्तामध्ये Gorki-400 नावाच्या रशियन जैविक अस्त्राचा उल्लेख आहे तर, अमेरिकेतील आवृत्त्यांमध्ये विषाणूचे नाव आणि जागा बदलण्यात आले. 

मूळ माहिती येथे पाहा – ABE Books |रायफल रेंज बॉय

निष्कर्ष

डीन कुन्ट्झ या लेखकाच्या द आईज ऑफ डार्कनेस या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेल वुहान-400 हा विषाणू जैविक अस्त्र तयार करण्यासाठी निर्माण करण्यात आल्याचे म्हटले आहे. आधी या पुस्तकात या विषाणूचे नाव Gorki-400 होते जो कि, रशियामध्ये तयार करण्यात आला होता. यावरून कळते की, लेखकाने कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली नव्हते. दोन्ही ठिकाणी वुहानचे नाव येणे हा योगायोग आहे. तसेच चीनने हा जगाला हानी पोहचविण्यासाठी विषाणू तयार केल्याचा कोणताही पुरावा नाही. प्राथमिक संशोधनानुसार, हा विषाणू नैसर्किगरीत्या तयार झाला आहे.

Avatar

Title:डीन कुन्ट्झ या लेखकाने 40 वर्षांपूर्वीच कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: Partly False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply