ओवैसी कृष्ण भजन गातानाचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

Altered राजकीय | Political

‘एआयएमआयएम’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा कृष्ण भजन गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यासपीठावरून ते ‘अरे द्वारपालो’ गाताना दिसतात. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  

पडताळणीअंती कळले की, हा व्हिडिओ बनावट आहे. ओवैसी यांच्या भाषणाला एडिट करून त्यात गाणे लावण्यात आले आहे. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये ओवैसी व्यासपीठावरून कृष्ण भजन गात आहेत. सोबत त्यांचे समर्थकही गाताना दिसतात. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना लिहितात की, “ओवेसी यांनी गायलेल्या श्रीकृष्ण भजनाचा आनंद घ्या.” 

मुळ पोस्ट – आर्काइव्ह | ट्विटर

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट असून या एडिट करून आवाज टाकण्यात आला आहे. 

‘एमआयएम’च्या अधिकृत युट्युब चॅनलवर ओवैसी यांचे मूळ भाषम उपलब्ध आहे. त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील विजापूर येथे केलेल्या भाषणाची ही क्लिप आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, ते कृष्ण भजन गात नाहीत. कर्नाटकमधील काँग्रेसचे 15 आमदार भाजपात गेल्याबद्दल ओवैसी बोलत होते. 

या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

व्हायरल व्हिडिओमध्ये ओवैसी आणि त्यांच्या समर्थकाच्या ओठाची एडिटिंग करून हालचाल करण्यात आली आहे. 

मूळ भाषण आणि व्हायरल व्हिडिओ यांची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, ओवैसी व्यासपीठावर कृष्ण भजन गातानाचा व्हिडिओ बनावट आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:ओवैसी कृष्ण भजन गातानाचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Altered