रशियामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी रस्त्यावर सिंह सोडण्यात आले का? वाचा सत्य

Coronavirus False वैद्यकीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना व्हायरसनिमित्त एक-एक अजब गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रशियामध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून राष्ट्रपती पुतीन यांनी रस्त्यावर 500 पेक्षा जास्त सिंह सोडून दिले आहेत. सोबत रस्त्यावर सिंह फिरत असल्याचा एक फोटोदेखील शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हाट्सअपवर (90490 43487) हा फोटो पाठवून त्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे पोस्टमध्ये?

टीव्ही बातमीच्या स्क्रीनशॉटमध्ये शहरातील भर रस्त्यावर एक सिंह फिरताना दिसतो. सोबत लिहिले की, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी कोरोनाची साथ सुरू असताना लोक घराबाहेर पडू नये म्हणून रस्त्यावर पाचशेपेक्षा जास्त सोडले आहेत.

तथ्य पडताळणी

कोरणा विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी भारतामध्ये रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी सात वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांनी घरांमध्ये राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

रशियामध्ये असा उपक्रम राबवायला सिंह सोडले असतील असं वाटत नाही. व्हायरल फोटोचे नीट निरीक्षण केले तर दिसेल की, ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या वाहिनीचे नाव अथवा लोगो त्यावर नाही.

या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी यांडेक्स रिवर्स इमेज सर्च केले. त्यातून हा फोटो जुना आणि रशियामधील नसल्याचे कळाले.

द सन यूके या वेबसाईटवर हा फोटो उपलब्ध आहे. या वेबसाईटने 19 मे 2016 रोजी दिलेल्या बातमीनुसार, हा फोटो दक्षिण आफ्रिकेतील जोहानसबर्ग शहरातील आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगचा हा फोटो आहे. या सिंहाचे नाव कोलंबस असून, तो विविध चित्रपट आणि जाहिरातीमध्ये झळकलेला आहे. शुटिंगच्या वेळी या परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.

मूळ बातमी येथे वाचा – द सन यूके

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना वाटले होते की  जंगलातील सिंह शहरात फिरत आहे. परंतु तसे नव्हते. या शूटिंगच्या वेळी काढलेले इतर फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सिंहाचा हा फोटो रशियामधील नाही. हा फोटो चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत जोहानसबर्ग शहरात झालेल्या फिल्म शूटिंगमधील आहे. त्याचा कोरोना विषाणुशी काही संबंध नाही.

Avatar

Title:रशियामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी रस्त्यावर सिंह सोडण्यात आले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •