पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले नाही; खोट्या दाव्यासह टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल

Altered राजकीय

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले होते, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होते आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील चक्रीवादळ बनावट आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

चक्रीवादळाचा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “ बीपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात पोहोचले आहे.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर rtsarovvideo या नावाच्या टिकटॉकवर अकाउंटवर व्हायरल व्हिडिओ आढळला. 

हा व्हिडिओ बनावट चक्रीवादळ आणि वादळाच्या आवाजाच्या साह्याने तयार केला आहे.

आर्काइव्ह

तसेच खालील फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ प्रमाणे  या टिकटॉक अकाउंटवर असे कॉम्पुटर ग्राफिकद्वारे तयार करण्यात आलेल्या वादळांचे अनेक व्हिडिओ आहेत.

बीपरजॉय चक्रीवादळ

राज्यात मान्सूनचे आगमन होत असतानाच भारतीय आणि पाकीस्तानात ‘येलो अलर्ट’ जारी केले आहे. 15 जूनपर्यंत संपूर्ण गुजरातमध्ये बिपरजॉयचा तडाखा होणार आणि पाकीस्तानमधील कराचीच्या किनारी भागातदेखील धुळीचे वादळ व मुसळधार पावसाचे वातावरण होते. सध्या पाकीस्तानमध्ये परिस्थिती सामान्य असून सध्या बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानमध्ये दाखल झाले आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत आसलेला व्हिडिओ पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाल्याचा नाही. या व्हिडिओमधील चक्रीवादळ बनावट असून कॉम्पुटर ग्राफिकद्वारे हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तानमध्ये बीपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले नाही; खोट्या दाव्यासह टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Altered