53 देशांच्या अध्यक्षांमध्ये मोदी महाअध्यक्ष झाले का?

False राजकीय

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या अध्यक्षांमध्ये ‘महाअध्यक्ष’ झाले असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने केलेली ही सत्य पडताळणी

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये 200 साल तक हमे गुलाम बनानेवाले ब्रिटेनमे कल 53 देशो के अध्यक्षो के बीच ‘मोदी महाअध्यक्ष’ थे  असे लिहिले आहे. पोस्टमध्ये कल असे लिहिल्यामुळे फॅक्ट क्रिसेंडो टीमने सर्वात आधी हे तपासले की मोदी ब्रिटनमध्ये दौऱ्यावर कधी गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर कधी गेले होते?

2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर 12 नोव्हेंबर 2015 ते 16 नोव्हेंबर 2015 या काळात नरेंद्र मोदी हे युनायटेड किंगडम आणि तुर्की या देशांच्या दौऱ्यावर गेले होते. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

PMO OFFICE l अर्काईव्ह

त्यानंतर 16 एप्रिल 2018 ते 20 एप्रिल 2018 या काळात नरेंद्र मोदी स्वीडन, यु.के. आणि जर्मनी या देशांच्या दौऱ्यावर गेले होते.

PMO OFFICE l अर्काईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 फेब्रुवारी 2019 ते 22 फेब्रुवारी 2019 यानंतर कोणताही परदेशी दौरा केलेला नाही अशी माहिती पीएमओ कार्यालयाच्या वेबसाईटवरुन मिळते.

PMO OFFICE l अर्काईव्ह

यानंतर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला रिव्हर्स इमेज केल्यानंतर खालील रिझल्ट समोर आले.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाच्या वेबसाईटवर माहिती घेतली. नरेंद्र मोदी हे 22 जानेवारी 2018 ते 23 जानेवारी 2018 पर्यंत दावोस (स्वित्झर्लंड) येथे गेले होते.

PMO OFFICE l अर्काईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दावोस दौऱ्याबद्दल 21 जानेवारी 2018 रोजी ट्विट अपलोड केले आहे. हा दौरा वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी करण्यात आलेला होता.

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदींच्या सभोवताली अनेक मान्यवर उभे असून, त्यांच्यामध्ये मोदी हात जोडून सर्वांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत. पोस्टमध्ये हा फोटो ब्रिटनचा सांगण्यात येत आहे. परंतू हा मुळ फोटो दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममधील बैठकीचा आहे. या फोटो संदर्भात ANI या वृत्तसंस्थेची बातमी प्रसिद्ध झालेली आहे.  

ANIअर्काईव्ह

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील 23 जानेवारी 2019 रोजी अपलोड केलेले ट्विट आहे.

अर्काईव्ह

व्हायरल पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला फोटोसंदर्भात न्युज नेशन या वृत्तपत्रात दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरम विषयी फोटोसह बातमी 24 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला फोटो हा ब्रिटन मधील नसून दावोस येथील आहे.

NEWS NATION l   अर्काईव्ह  

निष्कर्ष : व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये झालेल्या 53 देशांच्या अध्यक्षांमध्ये ‘महाअध्यक्ष’ झाले असा दावा असत्य आहे. तसेच पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला फोटो हा ब्रिटनमधील नसून दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीचा आहे.

Avatar

Title:53 देशांच्या अध्यक्षांमध्ये मोदी महाअध्यक्ष झाले का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: False