पोलिसांनी लॉकडाऊन उघडल्यावर गुन्हे वाढतील असा इशारा दिलेला नाही. वाचा सत्य

False सामाजिक

मुंबई पोलिसांच्या नावाने सध्या समाजमाध्यमात सध्या एक संदेश व्हायरल होत आहे. या संदेशात लॉकडाऊन संपल्यावर गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त  करण्यात आली आहे. महागड्या किंवा सोन्याच्या वस्तू जवळ बाळगू नयेत, लहान मुले, वयोवृध्द व्यक्तींची काळजी घ्या, आवश्यकतेपेक्षा अधिक रोकड बाळगू नका, अशा अनेक बाबी या संदेशात आहे. 

मुंबई पोलिसांनी खरोखरच असा काही संदेश जारी केला आहे का? याची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

FB.png

फेसबुकअर्काइव्ह  

तथ्य पडताळणी 

मुंबई पोलिसांनी खरोखरच असा काही संदेश जारी केला आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. 

मुंबईतील गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, असा कोणताही संदेश मुंबई पोलिसांनी अथवा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जारी केलेला नाही. हा संदेश बनावट आहे. मुंबई पोलीस अधिसूचनेद्वारेच असा अधिकृत संदेश जारी करतात. नागरिकांनी समाजमाध्यमात पसरणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

असाच संदेश बंगळुरु पोलिसांच्या नावाने समाजमाध्यमात फिरत असल्याचेही दिसून आले. यावर बंगळुरु पोलिसांनीही हा संदेश बनावट असल्याचे ट्विट करुन सांगितले आहे. 

अर्काइव्ह

निष्कर्ष

मुंबई आणि बंगळुरु पोलिसांनी लॉकडाऊन उघडल्यावर गुन्हे वाढतील असा इशारा देणारा कोणताही संदेश जारी केलेला नाही. हा संदेश असत्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमात पसरत असलेल्या असत्य माहितीपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:पोलिसांनी लॉकडाऊन उघडल्यावर गुन्हे वाढतील असा इशारा दिलेला नाही. वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False