प्लेट-चमचे चाटण्याचा हा व्हिडियो जुना आहे. त्याचा कोरोना किंवा निजामुद्दीन मर्कझशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये पार पडलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा देशभरात शोध घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काही लोक प्लेट, चमचे चाटून पुसत असल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडियो निजामुद्दीन मर्कझमधील असल्याचा दावा केला जात असून, अशा प्रकारे भारतात कोरोना पसरविला जात असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमध्ये हा दावा खोटा आढळला असून, हा व्हिडियो जुना असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

व्हायरल व्हिडियोमध्ये पारंपरिक वेशभुषेतील लोक ताट, चमचे, वाट्या चाटून पुसत असल्याचे दिसते. अशा प्रकारे एक समुदाय कोरोना व्हायरस पसरवित असल्याचा दावा याद्वारे करण्यात येत आहे.

Fbdlfkjsdlfksjf.png

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडियो नेमका काय आहे याचा शोध घेतला. त्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा Vimeo या व्हिडियो शेयरिंग वेबसाईटवर सर्वात आधी 31 जुलै 2018 रोजी हा व्हिडियो शेयर करण्यात आल्याचे आढळले. असगार वासनवाला नामक युजरने हा व्हिडियो अपलोड केला होता.

युजरने व्हिडियोसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो दाऊदी बोहरा समाजातील एका प्रथेचा आहे. समाजाचे प्रमुख सैयदना डॉ. मुफद्दल सैफुद्दीन यांनी अन्न नासडी न करण्याचे आवाहन केले होते. काही लोक अत्यंत टोकाच्या पद्धतीने या सूचनेचे पालन करीत आहेत. अन्न वाया जाऊ नये म्हणून ताटातील एक-एक कण चाटून पुसून खात आहेत.

मूळ व्हिडियो येथे पाहा – व्हिमियो

बोहरा समजाची अन्न नासडीविरोधात मोहिम

दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख सैयदना डॉ. मुफद्दल सैफुद्दीन यांनी अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देण्याचा संदेश दिला आहे. दाऊदी बोहरा समाज जरी आर्थिक संपन्न असला तरी अन्नाची नासडी त्यांना मान्य नाही. म्हणून एका थाळीत जेवण्याची प्रथा त्यांच्यामध्ये आहे. लागेल तितकेच अन्न ताटात घेण्याचा नियम घराघरात आहेत. 

bohra-12.png

अधिक सविस्तर येथे वाचा – The Dawoodi BohrasYRE Global । 

कोण आहेत दाऊदी बोहरा?

बोहरा हे शियांच्या इस्माइली पंथाच्या एका उपपंथाचे अनुयायी आहेत. ज्यांनी या दाऊद बिन कुत्बशाह यांचे अनुयायित्व पत्कारले, ते लोक तेव्हापासून ‘दाऊदी बोहरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बोहरांपैकी बहुसंख्य लोक दाऊदी बोहराच आहेत. बहुसंख्य बोहरा हे शियापंथी व व्यापारी असले, तरी काही बोहरा हे सुन्नी असून ते प्रामुख्याने शेती करतात. (संदर्भ – मराठी विश्वकोशनवभारत टाईम्स)

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोचे गेल्या वर्षी जून महिन्यात हिंदी आणि इंग्लिश भाषेतून फॅक्ट चेक केले होते होते.

निष्कर्ष

याचाच अर्थ की, हा व्हिडियो एक तर जुना म्हणजे 2018 सालातील आहे. अन्नाची नासडी होऊ नये म्हणून हे लोक असे करीत आहेत. यामागे कोणताही दुष्ट हेतू नाही. दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझने आयोजित केलेला धार्मिक कार्यक्रम 13 ते 15 मार्चदरम्यान पार पडला होता. हा व्हिडियो तेथील नाही. कोरोनाचा प्रसार करण्याचा हा कट नाही.

Avatar

Title:प्लेट-चमचे चाटण्याचा हा व्हिडियो जुना आहे. त्याचा कोरोना किंवा निजामुद्दीन मर्कझशी काही संबंध नाही. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •