FACR CHECK: या मुलीने IAS टॉपर झाल्यावर वडिलांना हातरिक्षात बसवून शहरभर फिरवले का?

False सामाजिक
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

सोशल मीडियावर हातरिक्षा ओढत असलेल्या एका मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, आयएएस टॉपर झाल्यानंतर या मुलीने आपल्या हातरिक्षाचालक वडिलांना त्यांच्याच हातरिक्षात बसवून स्वतः ओढत शहरभर फिरवले. ही प्रेरणादायी घटना कोलकाता शहरातील असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. कष्टकरी बापाच्या मेहनतीला मुलीने फळ मिळवून दिल्याची भावना व्यक्त करीत प्रतिभा कधीच वाया जात नसल्याचा संदेश याद्वारे देण्यात आल. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची तथ्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये म्हटले की, कलकत्ता शहर में खींचने वाले (पुलर) रिक्शा हैं. रिक्शा में जो व्यक्ति बैठा है और रिक्शा जो खींच कर रही हैं, वो उसकी प्यारी बेटी हैं. जिसने बाप की कमाई से पढाई करके करंट IAS टॉपर बनी है. उस बेटी ने अपने इस सफलता पर अपने पापा को रिक्शा में बिठा कर पुरे कलकत्ता शहर में घुमाया और जनता में यह संदेश दिया कि मेरे पिताजी कितने महान है. टॅलेंट किसी का मोहताज नहीं है.

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर IMGUR आणि रेडिट वेबसाईटवर 24 मे 2018 रोजी अपलोड केलेला फोटो आढळला. Spreading joy in Kolkata नावाच्या या फोटोखाली एका रेडिट युजरने लिहिले की, हा फोटो शरमोना पोद्दार नावाच्या एका मुलीचा आहे. तिच्या अकांउटचे नाव  Mishti and Meat आहे.

मूळ रेडिट थ्रेड येथे पाहा – रेडिटअर्काइव्ह

गुगलवर सर्च केल्यावर शरमोना पोद्दार हिचे इन्स्टाग्राम अकाउंट मिळाले. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शोध घेतला असता 25 एप्रिल 2018 रोजी पोस्ट केलेला एक फोटो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. हाच फोटो सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे. या फोटोसोबत शरमोनाने लिहिलेल्या माहितीनुसार, ती कोलकाता शहरात फिरायला गेली होती. तिला एक हातरिक्षाचालक दिसल्यावर तिने त्याच्याकडे रिक्षा ओढू देण्याची विनंती केली होती. तेव्हा तिने हा फोटो घेतला होता. वाईल्डक्राफ्ट कंपनीने तिची ही ट्रीप पुरस्कृत केली होती. त्यांनीदेखील हा फोटो शेयर केला होता. तो येथे पाहा.

View this post on Instagram

Repost from @wildcraftin So here goes the story behind this. Since childhood, whenever I used to visit the north and central part of Calcutta essentially, I would feel sympathetic everytime I would spot a hand pulled rickshaw, thereby choosing not to use them. Until recently when my sympathy coincided with the realization that we're helping to earn their bread and butter only when we're taking a ride. So last time I was in Calcutta, the #wildcraftwildling in me decided to pull a handpull rickshaw instead, to see how difficult and strenuous it really is. I asked the rickshaw uncle to have a seat while I pulled him around on the streets of Shobhabazar, tickling the bell at intervals while the whole street stood and watched in awe. I realized though there's a lot of mechanism involved, it wasn't a piece of cake at all. All my years of inquistiveness transpired to salutation for the extreme precision and relentless efforts that go in during each trip made. Yet each day they wake up with the same enthusiasm to battle the odds. This spirit is what inspires me to be #ReadyforAnything. #GoStreet #kolkata #calcutta #calcuttacacaphony #travel #handpullrickshaw #wildcraft #adventure #kolkatatourism #MishtiAndMeatftWildcraft Photo by @bhaskar_0007

A post shared by Shramona Poddar (@mishti.and.meat) on

शरमोना पोद्दार आणि वाईल्डक्राफ्ट कंपनीच्या पोस्टमधील माहितीवरून हे स्पष्ट होते की, शरमोना ही कोणी आएएस टॉपर नाही आणि हातरिक्षात बसलेली व्यक्ती तिचे वडिलही नाही. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर असून, तिने कोलकाता ट्रीपच्या वेळी हा फोटो घेतला होता.

मग आयएएस टॉपर मुलीची अफवा कशी पसरली?

तमिळनाडूतील काँग्रेसचे नेते डॉ. जे. अस्लम बाशा यांनी 4 ऑक्टोबर 2018 रोजी शरमोनाचा हा फोटो ट्विट करून आयएएस टॉपर मुलीने वडिलांना हातरिक्षात फिरवल्याचा दावा केला होता. यानंतर या फोटो खूप गाजला. ते ट्विट तुम्ही खाली पाहू शकता.

अर्काइव्ह

डॉ. बाशा यांचे हे ट्विट काँग्रेस नेते शशी थरून यांनीदेखील रिट्विट केले होते. फोटोवरून गैरसमज पसरल्यानंतर वाईल्डक्राफ्ट कंपनी ट्विट करून या प्रकरणी खुलासा केला होता. खोट्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

वडिलांना हातरिक्षातून फिरवणाऱ्या आयएएस टॉपर मुलगी म्हणून पसरविला जाणारा फोटो मूळात शरमोना पोद्दार नावाच्या ट्रॅव्हल ब्लॉगरचा आहे. कोलकाता येथे फिरायला गेलेली असताना तिने एका हातरिक्षाचालकाला विनंती करून हा फोटो घेतला होता. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:FACR CHECK: या मुलीने IAS टॉपर झाल्यावर वडिलांना हातरिक्षात बसवून शहरभर फिरवले का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •