इंदिरा गांधी यांच्या पार्थिवासमोर राजीव गांधी यांनी कलमा पढला होता का?

False राजकीय

इंदिरा गांधी यांच्या पार्थिवासमोर कलमा पढताना राजीव व राहुल गांधी असा दावा करत समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र पसरत आहे. शशांक परब यांनीही असाच दावा करत हे छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र इंदिरा गांधी यांच्या अंत्यविधीच्या वेळेचे आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ते रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला द वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाच्या संकेतस्थळावरील 4 नोव्हेंबर 1984 रोजीचे वृत्त दिसून आले. या वृत्तात इंदिरा गांधी यांचा अंत्यविधी हिंदू धार्मिक पद्धतीने करण्यात आल्याचे म्हटले आहे.

washingtonpost.png

द वॉशिंग्टन पोस्ट / Archive

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अंत्यविधीचा व्हिडिओही युटूयूबवर उपलब्ध आहे. यातूनही त्यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

इंदिरा गांधी यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने करण्यात आल्याने आम्हाला प्रश्न पडला की मग हा फोटो नेमका कधीचा आहे. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला खालील ट्विट दिसून आले. यानुसार हा फोटो खान अब्दुल गफ्पार खान यांच्या अंत्यविधीचा आहे. त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते.

राजीव गांधी त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित होते अशी, लॉस एजल्स टाईम्सच्या 21 जानेवारी 1988 रोजीच्या बातमीत म्हटले आहे.

latimes.png

लॉस एजल्स टाईम्स /  Archive

युटूयूबवर उपलब्ध असलेल्या एका व्हिडिओतही आपण सरहद्द गांधी यांच्या अंत्यविधीस राजीव गांधी व भारतीय नेते उपस्थित असल्याचे आपण पाहू शकता.

निष्कर्ष 

या संशोधनातून हे सिद्ध होत आहे की, राजीव गांधी कलमा पढत असल्याचे हे छायाचित्र इंदिरा गांधी यांच्या अंत्यविधीचे नाही. हा फोटो सरहद्द गांधी यांच्या अंत्यविधीचा आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:इंदिरा गांधी यांच्या पार्थिवासमोर राजीव गांधी यांनी कलमा पढला होता का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False