Fact Check : जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये होणार बंद?

False राजकीय

जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याची पोस्ट सध्या Local Broadcast या पेजवरुन शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये बंद होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम न्यूज 24 हिंदी या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर गेलो. त्याठिकाणी असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर news24online.com या ठिकाणीही असे वृत्त आम्हाला दिसून आले नाही. जास्त भ्रष्टाचारामुळे RTO ऑफिस बंद होणार  नितीन गडकरी असे टाकून आम्ही गुगलवर या बातमीचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला. 

या परिणामानुसार नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य जुलै 2019 मध्ये नव्हे तर 2014 साली केले असल्याचे दिसून येत आहे. आज तक या वृत्तवाहिनीने 19 ऑगस्ट 2019 रोजी याबाबतच्या वृत्ताचा व्हिडिओ युटूयूबवर अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. 

दैनिक जागरणने 19 ऑगस्ट 2019 रोजी याबाबतचे वृत्त दिले असल्याचे दिसून येते. या वृत्तातही नितीन गडकरी हे याबाबत एक विधेयक आणणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक जागरण / Archive 

NMF News ने 12 डिसेंबर 2015 रोजी दिलेल्या वृत्तानुसार नितीन गडकरी यांचे याबाबतचे विधेयक कॅबिनेटच्या मंजुरीअभावी अडकून पडले आहे. महाराष्ट्र टाईम्सने नितीन गडकरी यांनी प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओबाबत वेळोवेळी केलेली वक्तव्ये प्रसिध्द केली आहेत. या दोन वक्तव्यातील एक वक्तव्य 2014 मधील तर दुसरे 2017 मधील आहे. नितीन गडकरी यांनी नुकतेच प्रादेशिक परिवहन विभाग बंद करण्याबाबतचे कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. मग प्रश्न उरतो न्यूज 24 ने हे वृत्त कधी कसे आणि कधी दिले. खाली दिलेला न्यूज 24 चा स्क्रीन शॉट नीट पाहिल्यास एका कोपऱ्यात 19-04-2014 अशी तारीख आपल्याला दिसून येते. सकाळी सव्वादहाच्या सुमारास हे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचे हा व्हिडिओ नीट पाहिल्यास लक्षात येते. 

निष्कर्ष

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालये बंद करण्याबाबतचे वक्तव्य हे 2014 साली केलेले आहे. त्यांनी याबाबत कॅबिनेटची मंजुरी मिळत नसल्याचेही 2015 मध्ये स्पष्ट केले होते. नुकतेच त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालये बंद करण्याबाबतचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:जास्त भ्रष्ट्राचारामुळे RTO कार्यालये होणार बंद?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False