Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

Mixture राजकीय | Political

गुजरातमधील भाजप नेते अजय राजपूत यांनी शाळेत शिरुन एका महिला शिक्षिकेसोबत काय करत आहेत, हे आपण स्वत: पाहा आणि जगालाही दाखवा, असे म्हणत Shubham Waghchaure Patil यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive 

भाजप नेते अजय राजपूत यांचा हा व्हिडिओ असल्याचे अनेक जण फेसबुकवर पोस्ट करत असल्याचेही आम्हाला दिसून आले.  

तथ्य पडताळणी

भाजप नेत्याकडून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही भाजप नेते अजय राजपूत यांच्याकडून शिक्षिकेचा विनयभंग असा शब्दप्रयोग केला. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यामुळे आम्ही वेगवेगळे शब्दप्रयोग करत याचा आणखी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला पंजाब केसरी आणि वन इंडिया हिंदी या संकेतस्थळावरील 2015 मधील वृत्त दिसून आले. या ते स्वयंसेवी संस्था चालवत असल्याचे म्हटले आहे.

Punjab kesariArchive
Oneindia.comArchive 

विविध माध्यमांनी 2015 मध्ये दिलेल्या वृत्तात ते भाजप नेते अजय राजपूत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आम्ही आणखी शोध घेतला असता गुजराती भाषेत प्रसिध्द होणाऱ्या दिव्य भास्कर या दैनिकाच्या संकेतस्थळावरील खालील वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, ही व्हिडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत अजय राजपूत यांचा भाजपशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते भाजपचे असल्याचे खोटे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप करत आहे.  

  DIVYABHASKAR | ARCHIVE

ARCHIVE

गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पंडया यांच्याशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी खालील माहिती दिली.

या पडताळणीतून ही बाब स्पष्ट झाली की अजय राजपूत नावाच्या व्यक्तीने आदिवासी महिला शिक्षिकेचा विनयभंग केला ही बाब सत्य आहे. ते भाजपचे नेते आहेत ही बाब मात्र असत्य आढळली आहे. 

निष्कर्ष 

गुजरातमध्ये 2015 मध्ये अजय राजपूत नावाच्या व्यक्तीने आदिवासी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. तो एक स्वयंसेवी संस्था चालवत होता. राजपूत भाजप नेते असल्याचे भाजपने नाकारले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्थसत्य मांडणारी आणि संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False