लंडन जाण्यापुर्वी विजय माल्ल्याने भाजपला 35 कोटी रुपये दिले होते का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, किंगफिशर कंपनीचा प्रमुख विजय माल्ल्या याने लंडनला जाण्यापुर्वी भारतीय जनता पार्टीला 35 कोटी रुपयांचा चेक दिला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर स्वाती माने या महिलेच्या अकाउंटवरुन व्हायरल झालेली आहे. या पोस्टला फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून पडताळणी होईपर्यंत 1 हजार 500 शेअर, 51 लाईक्स आणि 36 कमेन्टस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

फेसबुकवर विविध अकाउंटवरुनही अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे.

या विषयावर सत्य शोधण्यासाठी आम्ही या चेकच्या फोटोला गुगलवर रिव्हर्स इमेज केली.

  • या विषयावर सत्य शोधण्यासाठी आम्ही एक्सिस बॅंकेच्या अ‍ॅपवर चेकमध्ये नमूद करण्यात आलेल्या अकाउंटनंबरवर शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, चेकमध्ये नमूद केलेला अकाउंटनंबर बंद असल्याचे आढळून आले.
  • विजय माल्ल्या यांच्या चेकमध्ये नमूद करण्यात आलेला बॅंक अकाउंट नंबर 916020029429703 दिला आहे. तसेच चेक नंबर 119289 देण्यात आला आहे. असाच अकाउंट नंबर असणारा चेक आम आदमी पार्टीसाठी देण्यात आल्याची पोस्टही व्हायरल होत आहे. याचा अर्थ हा चेक फोटोशॉपद्वारे करण्यात आलेला आहे.
  • चेकमध्ये नमूद करण्यात आलेले भारतीय जनता पार्टीचे स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहे. विजय माल्ल्या यांनी दिलेल्या चेकमध्ये भारतीय जनता पार्टीचे स्पेलिंग Bhartiya Janata Parti च्या ऐवजी Bhartiya Janta Parti असे म्हंटले आहे.
  • याशिवाय विजय माल्ल्या यांची चेकवर दिलेली स्वाक्षरी आणि विजय माल्ल्या यांची मुळ स्वाक्षरी यामध्ये तफावत जाणवते.

ट्विटरअर्काईव्ह

  • विजय माल्या हे भारत सोडून लंडनला 02 मार्च 0216 ला गेले आहेत. तर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील चेकमध्ये दिलेली तारीख ही 08 नोव्हेंबर 2016 दिलेली आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण याविषयीची सविस्तर बातमी वाचू शकता.

द हिंदूअर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विजय माल्याने लंडनला जाण्यापुर्वी 35 कोटी रुपयांचा चेक भारतीय जनता पार्टीला दिला या पोस्ट संदर्भात संशोधन केल्यानंतर अशा प्रकारचा चेक हा फोटोशॉपद्वारे केला आहे असे आढळून आले.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारी विजय माल्या हे लंडनला जाण्यापुर्वी भारतीय जनता पार्टीला 35 कोटी रुपयांचा चेक देवून गेले या आशयाच्या पोस्ट मधील दाखविण्यात आलेला चेकचा फोटो हा असत्य आहे. हा चेक फोटोशॉपद्वारे करण्यात आलेला आहे.  

Avatar

Title:लंडन जाण्यापुर्वी विजय माल्ल्याने भाजपला 35 कोटी रुपये दिले होते का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False