मधुमेहावरील इलाज म्हणून व्हायरल होत असलेला तो मेसेज फेक; वाचा सत्य

False Medical
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मधुमेह (Diabetes) असेल तर अद्रक, पुदीना आणि डाळिंबाची चटणी खाणे उपायकारक असते, असा मेसेज व्हायरल होत आहे. गुजरातच्या राजकोटमधील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील डॉ. प्रीती दवे यांनी असा सल्ला दिल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रीती दवे नामक डॉक्टरच्या नावे हा फेक मेसेज व्हायरल होत आहे. 

काय आहे दावा?

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी अद्रक, पुदीना आणि डाळिंब (प्रत्येकी 50 ग्रॅम) चटणी दिवसातीन तीन वेळा खावी. कितीही जुना मधमेह असला किंवा अगदी अवयव कापण्याचा सल्ला दिला गेला असला तरी ही चटणी प्रभावी ठरते. ही सर्व माहिती राजकोट येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमधील प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. प्रीती दवे यांनी दिल्याचे नमुद करण्यात आले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

या मेसेजमधील माहिती खरी आहे का, हे तपासण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम राजकोटमधील स्टर्लिंग हॉस्पिटलशी संपर्क साधला.

स्टर्लिंग हॉस्पिटल ग्रुपचे विभागीय संचालक घनश्याम गुसानी यांनी हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे सांगितले.

“मागच्या चार-पाच वर्षांपासून हा मेसेज फिरत आहे. केवळ राजकोट नाही तर संपूर्ण स्टर्लिंग ग्रुपमध्ये कोणीही प्रीती दवे नाम आहारतज्ज्ञ नाही. आमच्या हॉस्पिटलच्या नावे चुकीच्या माहितीसह हा मेसेज पसरविला जातो. कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये,” असे ते म्हणाले.

संपूर्ण देशात हा मेसेज पसरल्याने त्यांना या मेसेजबद्दल विचारणा करणारे फोन येत असतात. त्यांनी या मेसेजविरोधात कायदेशीर तक्रारसुद्धा दिली आहे.

मग अद्रक, पुदीना आणि डाळिंबाची चटणीचे काय?

हे तिन्ही घटक अतिशय आरोग्यदायी असून, त्यांचे सेवन तब्येतीसाठी चांगलेच आहे. परंतु, त्यांची चटणी करून खाल्ली म्हणजे त्याने मधुमेह बरा होईल असा दावा करता येत नाही. 

याबाबत शोध घेतला असता कुठेही शास्त्रीय माहिती आढळली नाही की, अशी काही चटणी मधुमेहावर प्रभावी ठरते.

निष्कर्ष

स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रीती दवे नामक कोणीही डॉक्टर नसून, त्यांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे वाचकांनी अशा मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.

Avatar

Title:मधुमेहावरील इलाज म्हणून व्हायरल होत असलेला तो मेसेज फेक; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •