कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का?

True आंतरराष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत. महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आला की शिवभक्त नतमस्तक होतात. परंतू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, भारताबाहेर साता समुद्रापार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथील ग्वाडालुपे पार्कमध्ये आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सन जोन्स या पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे असा दावा करण्यात आलेला आहे. सोबतच या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅलिफोर्नियातील सन जोन्स येथील ग्वाडालुपे रिव्हर पार्क येथील पुतळ्याचा फोटो देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी मराठा साम्राज्याची केलेली उभारणी याविषयी माहिती दिलेली आहे. याशिवाय या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या भागावर इंग्रजी भाषेच छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देणारा एक फलकही लावण्यात आलेला आहे असे म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती आणि फोटो असणाऱ्या पोस्टबद्दलची सत्यता शोधण्यासाठी फॅक्ट क्रिसेंडोने गुगलवर कॅलिफोर्नियामधील सन जोन्स शिवाजी महाराज फोटो असे सर्च केले.

यानंतर आम्हांला कॅलिफोर्नियामध्ये असणाऱ्या सन जोन्स या पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे असे आढळले. ट्रिप एडव्हिजर इंडिया या वेबसाईटवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सन जोन्स येथील ग्वाडालुपे पार्कमधील फोटो बघू शकता.

ट्रिप एडव्हिजर इंडियाअर्काईव्ह

गुगल मॅपवर जेव्हा आपण कॅलिफोर्निया ग्वाडालुपे रिव्हर पार्क असे टाकतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आढळतो. पोस्टमध्ये दाखविण्यात आलेला पुतळा आणि प्रत्यक्षात असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा हे दोघेही सारखेच दिसून येतात.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये कॅलिफोर्नियातील सन जोन्स येथे असणारा ग्वाडालुपे रिव्हर पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दाखविण्यात आलेला फोटो सत्य आहे.

Avatar

Title:कॅलिफोर्नियामधील सन जोन्स येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे का?

Fact Check By: Amruta Kale 

Result: True